स्वयंप्रकाशित व्हा
स्वयंप्रकाशित व्हा


आज संपूर्ण जगामध्ये एक न दिसणारा विषाणू इतकी दहशहत निर्माण करतोय कि ज्याची आपण कधी कल्पना पण केली नसेल पण या सगळ्या गोष्टींना मनुष्यच जबाबदार आहे आपण म्हणतो कि विषाणू दिसत नाही पण आतापर्यंत मनुष्याला फक्त दिसणाऱ्या गोष्टींची भीती होती पण आता न दिसणाऱ्या गोष्टींना पण घाबरलेला आहे आणि आपण तितकच सतर्क असायला पण हवं काही दिवस फक्त आपण यातून मुक्त राहुयात या साठी एक छोटीशी गोष्ट मी तुमच्या सोबत शेअर करतोय.
एक राजा त्याच्या मुलाला सगळ्या सुख सोयी देतो त्या युवराजला प्रत्येक ऋतू प्रमाणे (हिवाळा उन्हाळा पावसाळा )प्रमाणे महाल बनून देतो कि याच्या आयुष्यात कुठल्याच प्रकारचं दुःख यायला नको किंवा दुःख काय असत हे कळायलाच नको, पण एक दिवस अचानक ते युवराज जेव्हा त्यांच्या राज्यात फीरायला निघालेत तेव्हा एक वृद्ध म्हातारा त्यांना रस्त्यावर दिसला युवराजानी आपल्या सारथीला विचारले की मी पण असाच म्हातारा होणार का कारण युवराज दिसायला सुंदर आणि तेजस्वी होते त्यावर सारथी म्हणाला प्रत्येक व्यक्ती हा काही कालांतराने म्हातारा होतोच, पुढे गेल्यानंतर त
्यांना रस्त्याच्या कडेला एक रोगी व्यक्ती दिसला त्यांनी सारथीला प्रश्न केला की हा व्यक्ती इतका वेदनेने का तडफडत आहे तेव्हा सारथीने सांगितले तो एका महाभयंकर रोगाने ग्रासलेला आहे (कारण दुःखाचं पहिले कारण मनुष्याचं शरीर आहे) त्याही पुढे गेल्यावर एक प्रेत नेतानाचे दृश्य त्यांच्या नजरेस पडले त्यांना हे समजलंच नाही की हे नेमकं आहे तरी काय त्यावर सारथी त्यांना म्हणाला की जीवनाचं अंतिम सत्य आहे यालाच मृत्यू असं म्हणतात.
ते राजमहालात आल्यावर त्यांना हे सगळे प्रश्न विचलित करत होते आणि याच सत्याच्या शोधात ते आपलं सगळं वैभव सोडून एकाग्र चित्ताने जंगलामध्ये अन्नाचा एकही कण न खाता एकाच ठिकाणी ध्यानस्थ झाले व स्वतःला एकाग्र केलं तेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ते होते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. म्हणून आपल्याला हे जे २१ दिवस मिळालेले आहेत त्याचा स्वतःसाठी वापर करा, स्वतः ला वेळ द्या. आपल्या परिवाराला वेळ देण्यासाठी तुम्हाला वेळ मिळालेला आहे फक्त घरी रहा. स्वतःला आणि इतरांनापण जपा. कारण आयुष्य हे एकदाच मिळतं याचा चांगला उपयोग करा.