स्वर्गाहुनी सुंदर माझं गाव
स्वर्गाहुनी सुंदर माझं गाव
आपलं गाव हे नेहमीच आपल्यासाठी आकर्षणाने भरपूर असत. कर्मभूमी जरी आपली वेगळी असली तरी जन्मभूमीसाठी असणारी ओढ ही काही वेगळीच असते
तर माझं गाव आहे कोकणात . तळ कोकणामध्ये कणकवली या शहरापासून १४ किलोमीटर लांब आमचा कळसुली गाव आहे कोकण म्हटलं की हिरवीगार वन नारळी पोफळीच्या बागा आणि आंबा फणसा सारखी गोड माणसं . होळी गुढीपाडवा गणपती महाशिवरात्र नागपंचमी या सारख्या सणांची मज्जा घ्यायची असेल तर कोकणासारखी मज्जा कुठेच मिळणार नाही. निसर्गाने वेढलेला गाव माझा शेजारी पाजारी वाडीतील सोन्यासारखी माणसं निस्वार्थी मनाने नेहमी आम्हा चाकारमान्यांचे स्वागत करतात.
कोकणामध्ये माणूस उपाशी राहणे शक्यच नाही . निसर्गाने सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत पाण
्यासाठी जास्त वन वन फिरावे लागत नाही घराजवळ पाण्याचा झरे आहेत विहिरी सुद्धा बांधल्या गेल्या आहेत एखादा भुकेलेला व्यक्ती घराशेजारील बागेतून काही फळ सुद्धा तोडून खाऊ शकतो . आलेला पाहूना जेवल्याशिवाय काधीच घराबाहेर जाणार नाही. निदान चहा तरी पिऊन जाईल अशी या कोकणातली माणुसकी आहे.
आजही कोकणातली लोक माणुसकी जपतात .एकमेकांची ओढ आजही त्यांना आहे . पूर्वी जेव्हा पत्रव्यवहार होत असे तेव्हा नाती गोती लांब असून देखील जवळ असल्यासारखी होती .
आजची परिस्थिती अशी आहे की मोबाइल असून देखील नाती गोती लांब गेली
सांगायचं तात्पर्य एवढंच की पूर्वीसारखें नाते संबंध पुन्हा एकदा निर्माण होऊदेत रे महाराजा माझ्या कोकणची मान अशीच उंचावत राहूदे रे महाराजा