स्वप्नातला पाऊस
स्वप्नातला पाऊस
1 min
208
मला पाऊस खूप आवडतो. आपल्यातील अनेकांना आवडत असेल. रखतखत्या उन्हाळ्या नंतर हवेत निर्माण झालेला तो गारवा, मध्येच हळूच येणारी थंड वाराची झुळुक, आकाशी पसरलेले ते काळे ढग, रिमझिम करत आलेली पावसाची ती पाहिली सर, आसमंतात दरवळलेला तो मातीचा सुगंध, क्षणभर रस्त्यात ऊभे राहून, डोळे बंद करून, अंगावर पडणा-या त्या थंड थेंबाचा अनुभव, आणि त्यांच्या स्पर्शाद्वारे चेह-या उमटलेले ते हास्य, आणि अगदी थोड्याच वेळात सुरू झालेला तो मुसळधार पाऊस.
अशा ह्या पावसात मग घरी गेल्यावर, घराच्या गच्चीत बसून, कपात गरम गरम चहा, बशीत कांंद्या ची भजी, घराच्या छप्प्पंरावरून पडणा-या पाऊसाची धार पाहत, संंध्याकाळचा आनंद लुटण्यास कोणाला आवडणार नाही? हेेे तर आपणा सर्वांचे स्वप्नचं नव्हे काय.