सुदामाची मैत्री
सुदामाची मैत्री
1 min
163
बागेतील बाकावर बसलेल्या आईने बघितले, आपला दहा वर्षाचा मुलगा फुगे विकणाऱ्या मुलांसोबाबत खेळतो आहे. तिने त्याला बोलावून सांगितले, "बाळ मैत्री बरोबरीच्या लोकांसोबत करायची. त्याच आणि तुझं स्टेटस मॅच होत नाही." मुलगा म्हणाला " आजी कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीची चुकीची गोष्ट सांगते. घरी जाऊन आजीला सांगावं लागेल." आईला तिची चूक समजली.
