STORYMIRROR

Sangita Mahajan

Others

3  

Sangita Mahajan

Others

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

4 mins
256

   ‘ न स्त्री स्वातंत्र्यम् अहर्ति ‘ असे मनूने सांगितले आहे.पुराणकालीन सनातन, कर्मठ संस्कृतीमुळे स्त्रीचे स्वातंत्र्य लयाला गेले. आणि तिचे परावलंबीत्व सुरु झाले. पुरातन काळात डोकावले तर तेव्हाची स्त्री ही वेदशास्त्र संपन्न आढळते. तिला शास्त्रांस्त्राचे शिक्षण दिले जात असे. गार्गी, मैत्रेयी यांसारख्या वेदशास्त्रनीपुण कैकेयीसारख्या युद्धशास्त्रात कुशल असणार्या स्त्रिया सर्व प्रकारच्या विद्याकलांत पारंगत होत्या.


     आज आपण बघतच आहोत की जगात सर्व क्षेत्रात स्त्रियांचे स्थान , नोकरी, व्यापार व व्यवसायास योगदान खुप मोलाचे आहे तसेच साहीत्य क्षेत्रात ही असे अनेक स्त्रीयांनी मोलाचे योगदान दिलेले आहे . याची सुरुवात मी सावित्रीबाई फुले यांच्या पासून करते. 


सावित्रीबाई फुले


मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला, ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. सावित्रीबाई फुले यांनी स्वत: शिक्षण घेऊन घराबाहेर निघाल्या . तेव्हा लोकांच्या शिव्या दगडशेणाचा मारा खाऊन हे सहन करुन या अडचणीतुन मात करत आपले ध्येय गाठले . शाळा सुरु केल्या . मुलींना शिकवले . कविता -लेख लिहून शिकवून शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली 

अश्या "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत" भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका..... महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. , साहीत्य क्षेत्रात सावित्रीबाई फुलेंचे सर्वात महत्वाचे मोलाचे योगदान आहे .


   स्त्रीवरील अन्याय हा सनातन विषय होता . भारतीय स्त्रीवरील अन्याय ,विषमता , गुलामगिरी यावर निंदानालस्ती केली जात होती . स्त्रीयांची बुध्दीमत्ता ही निसर्गातच असते असे महाकवी कालिदासानं म्हटलं आहे . तरी बायकांना काय कळतं ? त्यांना अक्कलंच नाही असे बोलणारे अनेक लोक समाजात आहे .  पुरुषांच्या बरोबरीने समाजात अनेक क्षेत्रात स्थान घेणारी स्त्री हल्ली ती जन्मासाठीच स्त्रीभ्रुण हत्या यासाठी लढताना दिसते . गर्भाशयात असल्यापासुन ते जन्म होईपर्यत एवढेच काय ती आयुष्यभर ती लढतच आहे . भारतीय स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे, शिक्षणाचे महत्व पटू लागले . स्त्रीमध्ये बदल घडू लागला . स्त्रीयांच्या मनातील वेदना , विद्रोह त्याचे वाड:मयीन रुप म्हणजे " स्त्रीवादी साहीत्य " 

मराठी साहीत्यात स्त्रीयांचे स्थान महत्वाचे याकडे लक्ष दिले केले .

नोकरी, व्यापार व व्यवसायास मोठया प्रमाणात स्रीया करु लागल्या स्त्रीकडे माणूस म्हणून पाहतांना स्त्रीला स्वत्वाची व अन्यायाची जाणीव होऊन स्वत:च्याच अस्मितेसाठी ती संघर्ष करते . स्त्रीयांच्या अतिरिक्त बंधनामुळे तिचा श्वास गुदमरु लागला . स्त्री शिक्षित झाली . अर्थाजन करु लागली . तेव्हा तीने मोकळ श्वास घेतला . तरी तीला घर संसार,मुले सांभाळून नोकरी, व्यापार, व्यवसाय सांभाळणे तीची तारेवरची कसरत चालूच आहे . स्त्री पुढे दु:खी जीवनाचा अनुभवातून बाहेर पडते. हसत अनेकांना ही प्रोत्साहन देते . अनेक संघर्षाचे सामने करत असे भारतीय समाजजातीला अश्या भावनिक गुंता-गुंतीचे चित्र आज ही दिसून येते .          


    आजची स्त्री – जीवन सुखी व समृद्ध होण्याची गरज. आज भारतात मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. तिच्या साठी नोकरीत राखीव जागा ठेवल्या आहेत. संपत्तीचा वारशा हक्क तिलाही देण्यात आलेला आहे. समान वेतनाचा व समान नागरिकत्वाचा दर्जा देऊन सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव विकसित झालेली आहे. अश्या घरातील मुलींनाही स्वत:चे छंद, आरोग्य, ध्येय इत्यादी जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व तिचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  स्त्रीच्या स्वत:च्या कार्य शक्तीला, बुद्धीला, आणि कर्तुत्वाला पूर्ण वाव मिळावा आणि समाजात स्त्रीला समान सामाजिक दर्जा मिळावा म्हणून स्त्री-मुक्ती चळवळ निर्माण झाली. विविध स्त्री-मुक्ती संघटनांच्या माध्यमाद्वारे समाजात आणि विशेषत: स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. यासाठी स्त्रियांना त्यांच्या हिताच्या कायद्यांचे ज्ञान व मदत दिली जात आहे. घटस्पोटीत, परित्यक्ता, विधवा आणि निराधार स्त्रियांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून आर्थिक मदत केली जात आहे. रोजगार मिळवून दिला जात आहे. 

       आजची स्त्री हि डॉ, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, वा आमदार अश्या महत्वाच्या पदांवर काम करीत अाहे. आज काही प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांच्या नैसर्गिक शक्तींना व गुणांना वाव मिळत आहे. पण अश्या स्त्रियांची संख्या खूप कमी आहे कोणाच्याही वयक्तिक स्वातंत्र्यावर हे भाष्य नाही .पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा हि असतेच आणि जेव्हा ती मर्यादा ओलांडली जाते तेव्हा मात्र समाज बोट दाखवायला मोकळा होतो मग ती स्त्री असो वा पुरुष.आपल्या समोर अनेक आदर्श असताना नाउमेद होवून चालणार नाही. किरण बेदी, कल्पना चावला, इंदिरा गांधी,अंजली भागवत,पी.टी.उषा, डॊ.राणी बंग, डॊ. अनिता अवचट, सुनिता आमटे,इ अशा अनेक क्षेत्रात भरारी मारलेल्या स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्धकरुन दाखवल आहे.


“या देवी सर्व भूतेषू शक्तीरुपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:”


हे वचन सिद्ध करुन दाखवले आहे. प्रत्येक स्त्री कडे मग ती ग्रामिण असो,किंवा शहरी असो, तिच्यात एक अशी सुप्त शक्ती असते,की कोणत्याही येणा-या संकटाशी दोन हात करु शकेल. निसर्गानेच तिला ही शक्ती दिली आहे. आज स्त्रिला असेच स्वातंत्र्य हवे आहे.


"अबला नहीं सबला है तू, नारी नहीं चिंगारी है तू"

 स्त्री ही माणूस आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Sangita Mahajan