Anjana Bhandari

Others

3  

Anjana Bhandari

Others

स्पर्धेसाठी... कथा

स्पर्धेसाठी... कथा

9 mins
575


बंगल्याच्या गॉलरीत श्रीधरपंत आराम खूर्चीत बसून आराम करीत होते. खूर्ची मागेपुढे करून झोके घेण्याच्या आनंदात मग्न होते. सकाळचा मॉर्निंग वॉक आणि नंतर हास्यक्लबमध्ये जाऊन आले होते. आजचा पेपर आला का? म्हणून त्यांनी सिधूताईला आवाज दिला.

सिंधूताईने पेपर आणून श्रीधरपंताच्या हातात दिला व म्हणाल्या "आजकाल सर्व गोष्टी हातात लागतात." पण श्रीधरपंत गप्प राहून पेपर वाचण्याच्या नादात मग्न झाले.एकना एक बातमी काळजी पूर्वक वाचत होते. महत्वाच्या बातमीचे कात्रण काढून ठेवणे ही त्यांची जुनी सवय. आज ही कसल्याशा बातमीला त्यांनी कात्रीत पकडले होते.


सिंधूताईने नाश्त्याची प्लेट हातात आणून दिली. व पाण्याचे भांडे ठेऊन आत जात असतांनाच श्रीधरपंत सिंधूताईला म्हणाले "तुझी प्लेट घेऊन ये मिळून नाश्ता करूत ". 

सिधूताई प्लेट घेऊन बाहेर येऊन बसल्या व दोन घास खात नाही तोच बंडोपंताची स्वारी तेथे हजर झाली.बंडोपंत म्हणजे श्रीधरपंताचे लहानपणापासूनचे मित्र .


बंडोपंत म्हणाले, "मी चूकीच्या वेळी आलो कि काय ?"

 

"तस नाही रे ये बस आमच्या बरोबर नाश्ता कर."


सिधूताई ऊठल्या आत गेल्या कढईतले पोहे घेऊन बंडोपंताला दिले.

दोघांच्या आध्यात्मिक विषयावर गप्पा रंगत आल्या होत्या.बराच वेळ गप्पा मारल्या नंतर बंडोपंत म्हणाले,"तुला पाच वाजता वेळ आहे का?"


श्रीधरपंत म्हणाले,"कशाला?"


बंडोपंत म्हणाले,"अरे गीताश्रमात आध्यात्मावर व्याख्यान आहे म्हटल येतोस का, विचारावे."


श्रीधरपंत म्हणाले,"माझा आवडीचा विषय आहे मी नक्की येईल.लहानपणी मी आईबरोबर मठात याच विषयाची व्याख्याने ऐकत होतो.परंतू तेंव्हा कांही कळायचं नाही. आणि पुढील काळात नौकरी लग्न संसार मुलबाळ व त्यांचे शिक्षण यात आयुष्य कसे गेले ते कळले नाही. मुले मोठी झाली. दोघांना ऊच्च शिक्षण देतांना खूप तारांबळ उडे. त्यात माझी नौकरी म्हणजे सततची बदली , पण मला सिंधूची साथ उत्तम मिळाली. दोन्ही मुलं उच्च शिक्षित, आपापल्या पायावर ऊभी राहीली लग्न झाले त्यांचे संसार सुखात सुरू झाले. दोघे ही परदेशात स्थाईक झाले.त्यांच्या बायकाही तिकडच्याच आहेत. त्या ईकडे यायला तयार नाहीत, त्यांना भारतीय संस्कार माहीत नाहीत. मुले दिवाळीच्या सणाचे निमित्य करून येऊन भेटून जातात.

मुलांचे शिक्षण कुठे तरी एका ठिकाणी सुरळीत व्हावे म्हणुन पुण्यात फ्ल्याट घेतला होता. आता रिटायर झालो. पेंशन लाईफ आनंदाने जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. रोज मॉर्निंग वॉक, हास्य क्लब दुपारी वामकुक्षी केल्यावर एखाद व्याख्यान किंवा फेरफटका मारतो." श्रीधरपंतांनी थोडक्यात आपला दिनक्रम सांगीतला.


दुपारचे चार वाजले तसे श्रीधरपंत व्याख्यानाला जाण्याच्या तयारीला लागले. तसे सिंधूताई म्हणाल्या फार ऊशीर करू नका. रात्रीच्या वेळी गाड्याची खूप ये जा असते. सर्व ऑफिसेस सुटतात. प्रत्येकाला जाण्याची घाई झालेली असते. तुम्ही आपलं सांभाळून जा आणि सांभाळून या. बोलत बोलत सिंधूताईनी आपली आवरासावर सुरु केली. श्रीधरपंत गेल्यावर त्याही कांही किराणा व भाजी आणण्यासाठी घराला कुलूप लाऊन बाहेर पडल्या. जाता जाता गणपतीच्या मंदीरात जाऊन दर्शन घेतले तिथे पाच मिनिट बसून मग त्या आपल्या कामासाठी निघाल्या. रस्त्यावरची वर्दळ आणि मंडईतील गर्दी सिंधूताईना नकोशी वाटे. भाजी किराणा घेतल्यावर रिक्षा करून त्या थेट घरी आल्या. कुलूप उघडून लाईट लावला व सामानाच्या पिशव्या बाजूला ठेवल्या, हातपाय धुऊन देवापाशी व तुळशीपाशी दिवा लावला, व नमस्कार केला.


रात्री जेवणासाठी खिचडी लाऊन टिव्हि पहात बसल्या. टिव्ही पहात पहात आणलेल्या सामानातून भाजी, किराणा वेगळा केला नंतर भाजी निवडायला घेतली तोपर्यंत खिचडी झाली मग त्यानी पापड भाजले डायनींग टेबलवर खिचडी पापड लोणच व तुप नेऊन ठेवलं. त्या पुन्हा सिरियल पहात बसल्या पण त्यांच लक्ष कांही लागेना, नऊ वाजले यांना जेवायला ऊशीर झालेला चालत नाही मग आजून कसे आले नाहीत म्हणून त्या आधिक काळजी करू लागल्या होत्या. ईतक्यात दारावरची बेल वाजली आले वाटत हे... म्हणतच त्या उघडण्यासाठी गेल्या. दार उघडता उघडताच म्हणाल्या , "एवढा का ऊशीर केला?"

श्रीधरपंत म्हणाले ,"अग मला घरात तर येऊ दे. बाहेर पडल कि चार माणस भेटतात बोलतात मग ऊशीर होणारच ना!"


श्रीधरपंतानी कपडे बदलून पायजमा घातला व हातपाय धुऊन जेवायला येऊन बसले. सिधूताईनी दोघांची पाने वाढून घेतली आनंदाने गप्पा मारीत जेवणे उरकली.जेवणानंतर सर्व आवरा सावर करून सिंधू ताई पण झोपण्यास गेल्या.


श्रीधरपंताच्या जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या त्यात हायगाई चालत नसे. ते म्हणत "जो लवकर निजे अन् लवकर ऊठे त्याला आरोग्य धनसंपदा मिळे". 


अशाप्रकारे पेन्शन लाईफ व्यवस्थित चालू होते. दुपारची वामकुक्षी झाल्यावर आध्यात्म्यावरची पुस्तक वाचीत व महत्वाची टिपणी काढत दिवस मजेत जात असे. वाचनाची आवड म्हणुन त्यांनी वाचनालय लावले आठवड्यातून दोन वेळा पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयातून माणूस येत असे. तो नवीन पुस्तक देऊन जात असे म्हणुन वाचनात सातत्य राही. नवनवीन विषया वरील पुस्तके वाचनात येत.


अशातच गुरू महाराजांच्या व्याख्यानाचा प्रभाव श्रीधरपंतांवर फार पडला होता. ते नेहमी सिंधूला म्हणत, "तु या देहाची फार चोचले करतेस.हा देह नश्वर आहे. एक ना एक दिवस तो सोडून आपल्याला जाणे आहे. ज्याप्रमाणे झाडावरची पाने पिकली की, गळून पडतात तसेच हा देह थकला की तो आत्म्याला सोडून जाणार आहे.

गीतेच्या दुसऱ्या आध्यायात सांगितले आहे की,


*वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृन्हाति नरो$पराणि! तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही!!*


माणूस मेला म्हणजे काय? "तर हा देह सोडून आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो अन् हा देह निष्क्रिय होतो."

म्हणून देह नसून आत्मा अमर आहे. या आणि अशा विचाराने जीवना कडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सिंधू ताई पेक्षा वेगळा होता. व्यक्ती तितक्या प्रकृती. सिंधू ताई चारचौघी सारखं सामान्य जीवन जगणाऱ्या. त्या मुळे श्रीधरपंतांचे हे तत्व ....

त्यांना समजत नसे. त्यातच आता सकाळी तीन वाजताच्या ब्रह्म मुहुर्तावर उठून स्नान करून श्रीधरपंत ध्यानस्थ बसू लागले. हळूहळू त्यांची ध्यान धारणाची वेळ वाढू लागली. वज्रासन घालून एकाग्रचित्त होऊन ध्यान मग्न होत होते. कांही दिवसांनी सिंधूताईला एकटेपणा जास्त जाणवू लागला. इतके दिवस दोघे गप्पा मारत हसत खेळत जीवन जगत होते. आता तर यांची वेगळीच समाधी लागत आहे. काय करावे कांही सुचत नव्हते. एकटेपणा मुळे घर खायला ऊठले होते. बोलण्या चालण्यास कोणीच नाही घरातील काम यंत्रवत पार पडू लागली. सारख्या विचारतंद्रित राहू लागल्या. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतिवर झाला. नैराश्यातून बाहेर येणे आवघड झाले , बी.पी. शुगर सारखे आजार जडले. हळू हळू या आजाराने आणि नैराश्याने त्यांना पुरते घेरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. बायको गेली, पंत एकाकी पडले.


मुलं परदेशात होती कळवून देखील आले नाहीत त्या मुळे तर त्यांना आधिकच एकाकी पणा जाणवला. बायकोची अंतक्रिया करून श्रीधरपंत आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले खरे पण *आता पुढे काय?* हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर ऊभा राहिला.


पुढे काय करता करता ते आत्म्याशी संवाद साधू लागले. शिवाय आता तर घरात ते एकटेच त्यामुळे पाहिजे तेवढा वेळ त्यांना आत्म्याशी संवाद करायला वेळ मोकळा मिळाला.

हळू हळू त्यांचे बाहेर जाणे पण कमी होऊ लागले.

एक दिवस बंडोपंत श्रीधरपंताकडे आले आणि त्यांनी आवाज दिला "अरे मित्रा आहेस का घरी ? का कुठे बाहेर गेलास ? " परंतू आतून आवाज आला नाही कांही वेळ दारा बाहेर वाट बघून बंडोपंतानी दार जरा ढकलले तर ते सहज उघडले. आत जाऊन पाहिले तर काय हे महाराज ध्यान आवस्थेत देवासमोर मग्न होते बंडोपंत कांही वेळ परत थांबले नंतर त्यांनी श्रीधरपंतांचे आपल्या कडे लक्ष जावे म्हणुन प्रयत्न केले पण छे . नंतर मात्र बंडोपंतास राहवले नाही ते म्हणाले, "मित्रा मी आलो बघ जरा". पण एक नाही दोन नाही म्हणून बंडोपंतानी खांद्यावर हात ठेऊन जागे केले.

श्रीधरपंताची समाधी भंग झाली. ते ताडकन ऊठले कांही क्षण सर्वत्र भयान शांतता पसरली. बंडोपंतास काय बोलावे सुचेना ते स्तब्ध उभे राहिले मग श्रीधरपंतच म्हणाले " हां बोल काय काम काढले आहे?"


बंडोपंत म्हणाले "माझे कांही काम नाही. तुझीच विचारपुस करायला आलो होतो, वहिनीना जाऊन महिना झाला माझा मित्र कसा आहे ते बघून यावे म्हणुन आलो."

श्रीधरपंत म्हणाले, "मी ठीक आहे. आता काय मी व माझा देव. मी देवाशी बोलतो व देव माझ्याशी बोलतो. आत्म्याशी संवाद चालू आहे.शिवाय आता मला टोकायला कोणी नाही. मनसोक्त मी देवाजवळ ध्यानस्थ बसून गप्पा मारतो. ध्यान धारणेत फार शक्ती आहे. हे तुला नाही कळायचे.ज्याला अनुभव आला तोच खरा सुखी आहे. *तुकारामाचे शब्द खरे असल्याचा प्रत्यय येतो "येणे सुखे वाटे,एकांताचा वास,!नाही गुण दोष,अंगा येत "* 


बंडोपंत म्हणाले,"ते सर्व मला कळण्या बाहेरचे आहे.ते सोड जेवणाचे काय करतोस रोज? ते सांग."

 श्रीधरपंत म्हणाले "काय म्हणजे? मला ज्यावेळी वाटले त्यावेळी वरण भात किंवा खिचडी करतो ज्या वेळी करावसं वाटत नाही त्यावेळी फळ खातो व दुध पितो माझे छान चालू आहे." 


कांही वेळ बाकीच्या गप्पा मारून बंडोपंत म्हणाले ,"मग येतो मी " 

आणि बंडोपंत निघून गेले.


बंडोपंतामुळे का होईना पण आज खूप दिवसांनी श्रीधरपंत कोणाशी तरी बोलले घरच्या गप्पा निघाल्या म्हणुन त्यांना मुलांची आठवण आली, मुलाकडील कांहीच खबर नाही ते सुखात असवेत, अशी त्यांनी मनाची समजूत करून घेतली.

दिवसामागून दिवस जात होती. काळ कोणा साठी थांबत नाही. एके दिवशी दोन्ही मुलांना एकसारखे स्वप्न पडले. आणि स्वप्नात दोघांनाही बाबा आपल्याला कांही तरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसले. दोघ एकमेकांशी बोलले तेंव्हा दोघांना सारखेच स्वप्न एकाच दिवशी पडले म्हणुन दोघेही गोंधळले. मग त्या दोघांना वाटले "बाबा आजारी नसतील ना ? आई गेली आपण गेलो नाहीत आणि बाबाला ही भेटायला गेलो नाहीत. एकदा तेथे जाऊन बाबाची भेट घ्यावी आणि तेथील सर्व विकून बाबाला येथे घेऊन lयावे.एक महिना बाबा तुझ्याकडे राहतील व एक महिना माझ्याकडे राहतील झाल त्या दोघांचे असे बोलणे झाले.आणि ठरल्या प्रमाणे एक दिवस बाबाच्या भेटीला दोघे यायला निघाले.


इकडे श्रीधरपंताची ध्यान धारणा चालूच होती त्यात आता मनमानी कारभार, वेळेचे भान नाही, जेवणाची शुध्द नाही याचा व्हायचा तो परिणाम होत गेला एके दिवशी ते आजारी पडले, अंगात खूप ताप भरला होता. योगायोगाने बंडोपंत तेथे आले, म्हणुन त्यांना कळले. कळल्या बरोबर बंडोपंत त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. औषध उपचार सुरू केले पण ताप कमी होत नव्हता बंडोपंतांना तर काय करावे सुचेना. शेवटी त्यांनी डॉक्टर बदलला अजून मोठ्या व चांगल्या दवाखाण्यात दाखवले. तेथे वेगवेगळया तपासण्या सुरू झाल्या. श्रीधरपंत या सर्व गोष्टीला कंटाळले होते.ते म्हणायचे "मला दवाखाना नको, घरी न्या, माझा देव मला बरे करील. माझ्या शरीराला खूप यातना होत आहेत. सुया टोचून माझ्या शरीराची चाळणी झाली आहे.या यातना आता मला सहन होत नाहीत." बोलता बोलताच ते शांत होत कुठलीच हालचाल होत नसे मग कांही वेळाने परत त्यांच्या बोलण्याचा आवाज येई पण या वेळी ते परमेश्वराशी संवाद साधत असल्याचे दिसून येई .ते म्हणत " देवा आता अंत पाहू नको.मला हे सहन होत नाही. मला तुझ्या भेटीची आस लागली आहे ." आणि मग आजून मोठ्या आवाजात तुकारामाचे अभंग म्हणत, 

*"भेटी लागे जीवा, लागलीस आस ! पाहे रात्रंदिवस, वाट तुझी!!"*


डॉक्टर त्यांना वाचविण्याची पराकाष्टा करीत होते.सलाईन मधून वेग वेगळ्या प्रकारची इंजेक्शनस दिली जात होती. आय.सी.यु.मध्ये ठेऊन विशेष काळजी घेण्यात येत होती.पण कोणत्याच औषधाचा मनासारखा परिणाम होत नव्हता.


श्रीधरपंतांची दोन्ही मुले भारतात आली. ते घरी गेले तेंव्हा त्यांना शेजाऱ्यांनी सर्व हकीकत सांगितली. ते तसेच दवाखाण्यात गेले. बंडोपंत तिथे होतेच. त्यांच्या कडून प्रकृती विषयी आधिक माहिती मिळाली. बाबा डॉक्टराच्या उपचारास प्रतिसाद देत नव्हते इतकेच काय ते आता कोणाशी बोलत ही नव्हते मधे मधे फक्त थेट देवाशी बोलल्या सारखे बोलत.मुलांनी बाबाला पाहिले पण बाबाशी बोलता आले नाही.

डॉक्टर पेशंटला वाचविण्याची नेहमीच पराकाष्टा करीत असतोे. आपले सर्व उच्च शिक्षण आणि वैद्यक शास्त्रातील ज्ञान वापरून पेशंटला बरे करण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे मात्र श्रीधरपंत सतत देवाशी बोलत होते हे शरीर सोडण्याचा आग्रह करीत होते. देवा मला तुझ्या कडे यायचे आहे.हे शरीर मी आता त्यागतो आहे तू मला तशी परवानगी दे अस म्हणुन ते देवाला विनवीत होते.

हळू हळू डॉक्टरचा नाईलाज झाला त्यांचे सर्व प्रयत्न संपले आणि श्रीधरपंतांनी खरेच आपले शरीर सोडून ते इहलोकी निघून गेले.

डॉक्टरानी मुलांना बोलवून ही दुखद वार्ता दिली. "आता आपल्या हाती कांही नाही दवाखान्याच्या इतर बाबी ची पूर्ती करा आणि प्रेत ताब्यात घ्या" डॉक्टर असे म्हणताच दोघांनी एकमेकाकडे पाहिले.जाणारा गेला दवाखाण्याचे बील कोणी भरायचे? दवाखाना खाजगी होता. बीलाचा आकडा मोठा होता. दोन्ही मुलांनी खोटेच सांगितले आमचे नातेवाईक येणार आहेत तो पर्यंत आम्ही बाकीची व्यवस्था करतो आणि परत प्रेत घेण्यास येतो असे सांगून दोघांनी दवाखान्यातून काढता पाय घेतला ते थेट विमान तळावर पोचले.

डॉक्टर जेंव्हा दोन्ही मुलांना सांगत होते तेंव्हा एका कोपऱ्यात उभे राहून बंडोपंत हे सर्व ऐकत होते.मुलं तिथून निघून जाताच त्यांच्या डोळ्या तील आसवे टपटप खाली ओघळली.त्वरेने त्यांनी ती पुसली.व ते पुढच्या तयारीला लागले.दवाखान्याचे बील देऊन प्रेत ताब्यात घेतले. श्रीधरपंतांच्या घरी त्यांच पार्थिव आणलं पण मुलं आली नाहीत. बंडोपंत अंत विधीच्या तयारीला लागले.आणि ते म्हणून गेले


 *"विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले"*


श्रीधरपंतानी शरीराचा त्याग केला आत्मा मुक्त झाला त्याच वेळी आसमंतात कोणी मोठ्या आवाजात व मुक्त कंठांने गीतेतील श्लोक म्हणत होते ..........


*"नैनं छिन्दन्ति शश्त्राणि नैनं दहति पावकः!"*


रिती रिवाजाप्रमाणे कांही लोकांच्या मदतीने प्रेत अंत विधी साठी स्मशानात आणल्या गेले. इकडे शरीर सरणावर जळत होते तर तिकडे लॉऊडस्पिकर सुरेश भटांची गझल गात होते.


*सरणावर जळतांना, ईतुकेच वाटले होते !!*

*मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते !!*


*आत्म्याच्या सत्याचा प्रवास येथे सुरू होतो....................*


*मेन मे कम, मेन मे गो*

*बट आय गो फॉर ऐव्हर !!*


Rate this content
Log in