Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

निरज शेळके

Others


1  

निरज शेळके

Others


सोशल मीडियावरील अफवा व परिणाम

सोशल मीडियावरील अफवा व परिणाम

2 mins 247 2 mins 247

आजच्या या स्मार्टफोनच्या जमान्यात सारं काही अगदी क्षणात होतंय नाही का? पूर्वी आपल्याला एखादी महत्वाची बातमी (आनंदी किंवा दुःखी ) दुसऱ्या ठिकाणी पोचवायची असेल तरी किती कष्ट करावे लागायचे आणि ती बातमी संबंधित व्यक्तीकडे पोचेपर्यंत उशीरही झालेला असायचा, पण आता काळ खूप बदलला आहे, खूप पुढे आला आहे. बदलत्या परिस्थितीसोबत माणसंही बदलत चालली आहेत. नवनवीन शोध लागले आहेत त्यातच या स्मार्ट फोनची आणि त्यावर असणाऱ्या सोशल मीडियाचीही भर पडली आहे.  


सोशल मीडिया चांगली की वाईट हे आपण कधीच ठरवू शकणार नाही, कारण की याच सोशल मीडियामुळे आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळतात. पण तसंच काही वाईट, चुकीच्या गोष्टीसुद्धा असतात. सोशल मीडिया सध्या जास्त बदनाम होऊ लागली आहे त्याच कारण आहे त्यावर पसरणाऱ्या 'अफ़वा'. या अफवांमुळं कधी कधी लोकांना खूप त्रास होतो आणि त्याचे वाईट परिणामही होतात. मधल्या काही काळात बॉलीवूडमधल्या मोठमोठ्या हस्तींचे मृत्यू झाल्याचे याच सोशल मीडियावर फोटोसहित बातम्या पसरवण्याचं काम काही मंडळी करत होती, पण तेव्हा त्या हस्तीं आणि त्यांच्या चाहत्यांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्या हस्तींच्या चाहत्यांनी त्यांच्या दिर्घआयुसाठी मोठ मोठे नवस केले होते, कुणी यज्ञ केले होते, कुणी कुणी स्वतःला काहीतरी करून घेतले होते अन यामुळेच शेवटी त्या हस्तींनाच पुढे येऊन त्यांच्या मृत्यूच्या त्या अफ़वा आहेत असं जाहीर करावं लागलं होतं. आजही आपल्या आजूबाजूला असे अनेक किस्से घडतात की ज्या असतात वेगळेच पण सोशल मीडियावर भलतंच पसरवतात आणि या गोष्टीचा सामाजिक जीवनावर खूप भयंकर परिणाम होतो. त्यामुळेच सुज्ञ माणसानी या अशा 'अफवा' पसरवनाऱ्या सोशल मीडियाचा आपल्याला हवा तेवढाच वापर केला तर आपले आरोग्यही उत्तम राहील आणि आपला समाजही. शेवटी जाता जाता 'सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफ़वासाठी काही ओळी... 


"अफ़वा "


सोशल मीडियाच्या अफवांवर नका देऊ लक्ष,

कारण यांचा नसतो कधीच कोणताही पक्ष !!


कोणीतरी काही लिहून सोशल मीडियावर टाकतो,

आपणही वेड्यासारखे खात्री न करता पुढे पाठवतो !!


कितीतरी लोकांचे गैरसमज या अफवांमुळंच होतात,

एकमेकांवर प्रेम करणारे या अफवांमुळंच दूर जातात !!


म्हणूनच सांगतोय हा 'नीरज' तेव्हा ऐका माझं म्हणणं,

'अफ़वावर' विश्वास नका ठेवू मगच सुखी होईल हे जगणं !!
Rate this content
Log in

More marathi story from निरज शेळके