समाजकारण
समाजकारण


काल माझ्या मैत्रिणीने सहज बोलता बोलता बोलुन गेली, हजार लोकांनी पसंत केलेला मानुस तो आपल्या गळ्यात बांधला जातो, त्याचे विचार एक टक्का ही आपल्या विचारांशी जुळत नाही, तरी त्यांच्याशी आपण जुळवून घेतो, आणि संसार करतो, विशेष म्हणजे कळूही देत नाही की हा आपल्याला पसंत नाही, माझं जुळत नाही, अगदी सगळ्या इच्छा मनातल्या मनात दाबून टाकतो, म्हणजे तिलांजली देतो, सगळा त्याग करून एक प्रकारे आहुतीच देतो, मग आलंच कुणी आपल्या आयुष्यात एखादी मैत्रीण किंवा
मित्र अगर त्याचे विचार किंवा त्याचे विचार 100 टक्के नाही, पण 70 टक्के जरी जुळत असतील तर पवित्र मैत्री करायला काय हरकत आहे, मला तेव्हा तिचं म्हणणं पटलं नाही,
पण घरी गेल्यावर मी विचार केला, समजा झालाच एखादा जिवलग मित्र, जो आपल्याला समजुन घेतो, धावत येतो संकटावर मात करायला शिकवतो, चांगलं वाईट काय हे दाखवतो, सुख-दुःखात साथ देतो तर हरकत काय, पण माझं म्हणणं तुम्हाला पटेलच असं नाही, कारण आलंच त्या मागे तुमची नीतिमत्ता, बुद्धीमत्ता, मूल्य, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, घरातील काय म्हणतील, नातेवाईक, शेजार काय म्हणेल, मुलं काय म्हणतील, यातील कोणी म्हणजे कोणीही स्वीकार करणार नाही, पाप लावून मोकळे होतील, काहीतरी नक्कीच आहे, हे लफडं आहे, प्रेम आहे, हिला या वयात शोभलं का असंही म्हणतील.
अजूनही आपला देश आपला समाज सुधारलेला नाही, असं मला तरी वाटते, आज काल मुली-मुले सगळं बघुनच लग्न करतात, पण काही ठिकाणी आजही विचारले जात नाही, मुली मुले जन्म देत्या आई बापालाच बळी पडतात, निमूटपणे ज्याला ही गळ्यात बांधले त्याच्याशी जुळवून घ्यायचे, पूर्ण आयुष्य कुढत कुढत काढायचे, या जगात चांगली माणसंही आहेत, वाइटही आहेत, पण निघू द्या ना स्त्रीला घराबाहेर पडु द्या, वेळ बदलली काळ बदलला, या जगाबरोबर तिला उडू द्या, सगळेच वाईट नाही ना...
एक पवित्र नातंही असू शकते, फसलीच तरी तिचं तिला सावरू द्या, सगळ्यांना पटेल असं नाही, मी फक्त मत व्यक्त केले, काय वाटते तुम्हाला, मलाही कळले पाहिजे,
एका स्त्रीने एका पुरुषाशी मैत्री करायची किंवा नाही, खरंखरं उत्तर हवं आहे, आपली मतं अवश्य मांडा...