STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Children

2  

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Children

सिंह आणि छावा

सिंह आणि छावा

3 mins
86

एका जंगलात सिंह आणि त्याची पत्नी राहत होती..त्यांना दोन मुलं होती. त्यातला एक छावा थोडासा वात्रट होता नेहमीच काही तरी पराक्रम करता असायचा.. सिंहाला त्याची ही सवय चांगलीच माहित होती.पण तो लहान असल्यामुळे तो त्याला काहीच बोलत नव्हता, त्याच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत असायचा,सिहांची पत्नी म्हणजेच त्याची आईचा दोन मुलां पैकी हा लहान असल्यामुळे जास्त लळा होता आणि त्याचं ही आईशी खूप चांगलं जमायचं आई शिकारीला गेली की याचं वात्रटपणा चालू व्हायचा,त्याला आईने शिकारीला जाणे अजिबात आवडत नव्हते,त्यामुळे त्याला आपल्या बाबांचा म्हणजेच सिंहांचा खूप राग यायचा पण लहान असल्यामुळे काही करू शकत नव्हता,काय करायचं आईला शिकारीला न जावं म्हणून काय करता येईल हा प्रश्न त्याला नेहमी सतावत असायचा. बाबांना या विषयी बोलावं असं वाटतं होतं पण मनात बाबांची दहशत असल्यामुळे तो त्यांच्याशी काही बोलू शकत नव्हता.

       एक दिवस आई त्याला न उठवता व काही खायला प्यायला न देता अशीच सकाळी शिकारीला गेली..जेव्हा तो झोपून उठला पाहतो तर आई कुठेच दिसली नाही म्हणून इकडे तिकडे शोधू लागला आणि बाबांना विचारू लागला..."बाबा आई कुठे आहे"सिंह म्हणाला "आई शिकारीला गेली" त्यावर तो काहीच बोलला नाही..रागाने लाल लाल झाला होता...त्याला खूप राग येत होता..शेवटी त्याला राहवलं नाही आणि तो सिंहाला म्हणाला "बाबा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही का हो"सिंह म्हणाला "कशा बद्दल बोलतोस तू"तुम्ही आईला शिकारीला पाठवता आणि स्वतः मात्र इथे राहून फक्त झोपा काढता...काहीच वाटत नाही असं घरी राहून आयते खायला"रागा रागाने सिंहाचा मुलगा सिंहाला म्हणाला... त्यावर सिंह काहिच बोलला नाही ..ते पाहून तो अधिकच चिडला आणि बोलला.. दिवसभर कशा कशा तुम्हाला झोपा येतात..फक्त खायचं आणि झोपायच...गर्जना द्यायची या पलीकडे तुम्हाला काहीच येत नाही का?.. असं गर्जना देऊन काय सिद्ध करायचं असतं ओ तुम्हाला...काय केलंय तुम्ही आमच्या साठी ...माझी आई बिचारी शिकार करून आणते आणि तुम्ही आयते बसून खाता याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का?..तुम्ही काय कमावलं ते तर सांगा...आई आमच्या साठी शिकार करून आणते आणि खाऊ घालते तुम्ही काय करता आमच्या साठी...यावे सिंह न रागावता शांत उभा होता...त्याने मुलाला काहीच न बोलता...शिकारीला सिंह निघतो अशी जोराने गर्जना केली..सिंहाने गर्जना केल्याबरोबर संपूर्ण जंगल हादरून गेलं.. जंगलातले इतर प्राणी...घाबरले. आणि जो..तो...मिळेल तिकडे धावत पळत सुटले...कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता नदी नाले ओलांडू लागले..ज्याला त्याल आपला जीव वाचवन एवढंच त्यावेळी सुचत होते कोणी कोणाची पर्वा करत नव्हते...जी वाट दिसेल त्या वाटेकडे धावत सुटत होते...हे सगळं दृश्य जवळच असलेल्या झेब्रे..व रान गवे यांच्या कळपा मुळे सिंहाच्या मुलग्याला पाहता आले..ते कळप जिथे मिळेल तिकडे पळत होते..सिंह म्हणाल पाहिलंस..मला विचारत होता ना तू की तुम्ही काय कमावलं...बघ ही साऱ्यांना जी दहशत आहे ना ही माझ्या मुळे आहे......हे मी कमावलं..आज तुझी आई जी बिन्धास्त निडर शिकार करू शकते ती मी निर्माण केलेल्या दहशतीमुळे...हा तुझी आई मेहनत जरूर करते पण आपली दहशत असल्यामुळे तिला शिकार करायला सोपं जातं...ती निडर कुठे ही फिरू शकते..तुम्ही ही कुठेही बिन्धास्त फिरू शकता ..आता हे जंगल आपलं आहे..येथे आपलं राज्य आहे...का तर ही दहशत मी बनवून ठेवली आहे...आणि माझ्या पश्चात तुम्ही दोघे भाऊ येथे राज्य करणार...हेच मी कमावून ठेवलं आहे...

         सिंहाच्या मुलाला त्याचे म्हणणे पटते आणि तो वडिलांना म्हणतो तुम्ही माझ्यावर रागावले बाबा.. मला माफ करा ..मी चुकलो...त्यावर सिंह म्हणाला नाही बेटा मी रागावलो नाही पण वाईट वाटलं..कारण आईवडील तुमच्यासाठीच सर्व करत असतात पण ते मुलांना दिसत नसत त्या मगाचे कारण कळत नसते...आणि तसं तू मला न समजून घेता.........चुकला बाबा माझं खरचं चुकलं..पुन्हा असं मी कधीच नाही बोलणार...मला माफ करा... असं बोलून तो सिंहाच्या जवळ जातो आणि डोक्याला डोकं लावून रडतो.

तात्पर्य: आयुष्यभर आईवडील मुलांसाठी झटत असतात त्यांना सुख मिळावं हा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो..त्यासाठी काबाड कष्ट करून मुलांचे संगोपन करत असतात..पण मुलं मात्र मोठे झाले की त्यांनाच जाब विचारतात काय केलं आमच्यासाठी ...काय करून ठेवलं आमच्या साठी तेव्हा त्यांना फार दुःख होतं...काय मांडणार हिशोब संगोपन करण्याचा आणि निमूटपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतात...आपण आई वडीलानी केलेले त्याग आजची मुलं विसरतात हाच मोठा खंत आहे..


Rate this content
Log in

More marathi story from सचिन विश्राम कांबळे