सहलीचा प्रवास
सहलीचा प्रवास
एके दिवशी आमच्या शाळेतून शैक्षणिक सहल निघाली होती.
मलाही सहलीला जाण्याची खूप इच्छा झाली होती आणि मी सहलीला निघालो होतो. माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जाम बाजार! आम्ही सर्वप्रथम शेगावला गजानन महाराज दर्शन घेतलं आणि त्यानंतर तेथील आनंद सागर बघितला आणि तिथेच आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही औरंगाबादला गेलो होतो आणि तिथे आम्ही वेरूळ अजिंठा लेणी पाहिली होती.
त्यानंतर आम्ही भद्रामारूती बघितला आणि समोरचा प्रवास हा अहमदनगर जिल्ह्यात आलो होतो. तेथील आम्ही भुईकोट किल्ला, चांदबिबीचा महल, दमडी मस्जिद, पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार आदर्शगाव बघितले आणि नंतर आम्ही राळेगणसिद्धीला गेलो होतो. तेथे अण्णा हजारे यांचा आदर्श गाव बघितलं. असाच हा आमच्या शैक्षणिक सहलीचा प्रवास खूप आनंदाचा आणि आठवणीत राहणारा होता...