शाळा
शाळा


लहान असतानां जे दिवस गेले ते खूप रमणीय होते. किती सुंदर होती ती शाळा. चिमण्यांचा तो प्रेमळ आवज एखांदे संगीत होते. मला आतापर्यंत भरपूर शिक्षक शिकून गेले पण पण सुरवातीचे दोन शिक्षक माझ्या हद्द्याला स्पर्श करून गेले. मनाला नविन प्रेरना देऊन ते गेले. ममतेच्या सागरात जाऊन डूबाव असा जिव्हाळा देऊन गेले. माझ्या आतार्यंतच्या आयुष्यात ते देव होऊन गेले.
मी जगत होतो ज्या वाटेत त्या सुकलेल्या फुलांना नवीन कोंब आले. मी जेव्हा लहान होतो तेव्हा काहीच कळत नव्हते. पुष्कळ विद्यार्थी शिक्षक सागतानीच उत्तर देत होते. मी मात्र त्यांच्याकडे फक्त बघत असे. त्या विद्यार्थ्यांचे उत्तर ऐकून मला लाज वाटत असे. आमच्या पहिल्या वर्गातले काही विद्यार्थी अभ्यासात तत्पर होते, विद्वान होते. मूर्ख फक्त मीच होतो.
आमच्या वर्गात ऐकून तेरा विद्यार्थी १० मुले व ३ मुली. माझा माझ्या वर्गात स्कालर बनण्यामध्ये . ऐका कोपऱ्यात जाऊन बसत होतो मी त्यावेळेस कारण मझ्यायेवढे मूर्ख कोणीच नव्हते.
मी या मातीमधून उगवलेले ऐक झाड होतो त्याला फळे येण्याचे लांबच मी मुळातच सुकलेला होतो. या झाडाला नविन पालव्या याव्यात यासाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. वेगवेगळे खते या झाडाला नविन पालव्या याव्यात यासाठी वापरत. या झाडाला हे दोन जीव रोज पाणी घालत. ऐका सुकलेल्या झाडाला पालव्या येऊ लागल्या. नविन जीव या झाडामध्ये या शिक्षकांनीच तयार केला.
आई-वडील मुलांना जन्म देतात जगवतात वाढवतात पण शिक्षक या मुलांना जगण्यासाठी नविन प्रेरणा देतात. नवीन अस्तित्व घडवून देतात.
*तुम्हाला जगण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे शिक्षक. माय बापाच्या भरवश्यावर मुले किती दिवस जगतील. स्वतःच्या बळावर कसे जगावे हे सांगणारे फक्त शिक्षकच असतात. नवीन प्रेरणा, जगण्याच्या नवीन वाटा फक्त शाळेतच सापडतात.*