Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Lina Lichade

Others


3  

Lina Lichade

Others


रक्षाबंधन

रक्षाबंधन

2 mins 496 2 mins 496

रक्षाबंधनाच्या निमित्याने मी राखी बांधायला भावाकडे जात होते .पुण्यात स्वारगेटवरून मला ठाणेसाठी बस घ्यायची होती म्हणून मी बसस्टँडवर पोहचले. (सगळ्या ट्रेन्स पावसामुळे रद्द करण्यात आल्या होत्या म्हणून) मी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि शिवनेरीच्या दिशेने जायला निघाले तेवढ्यात एक अंध मुलगी (जवळपास २६-२८) एक बॅग डाव्या हातात आणि उजव्या हातात काठी घेऊन रस्त्याच्या मधोमध उभी होती.


तिला सुद्धा बससाठी पुढे जायचं होत पण ती इतक्या आवाजामुळे गोंधळून गेली होती. ती एक पाऊल पुढे उचलणार तेवढ्यात तिच्या दोन्ही बाजूला दोन बसेस येऊन थांबल्या. त्यावर तर ती थोडी घाबरली पण थोडासा धीर धरून ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती.


मी हे सगळं मागून चालत येताना बघत होती .तिला मदत करावी या उद्देशाने ने तिच्या दिशेने मी वळत होतेच तेवढ्यात तिच्या मागच्या बाजूने बस आली बघतच क्षणी मी मागून धावत सुटले आणि तिचा हात धरून बाजूला करणार तेवढ्यात एका माणसाने तिला बाजूला केले आणि ओरडला क्या दीदी, क्या कर रहे हो, दिखता नही क्या? (जवळपास २९-३०, पांढरा सदरा, हातावर राखी आणि डोक्यात टोपी) तेवढ्यात त्याला लक्षात आले की तिला दिसत नाही आणि त्यांनी तिची विचारपूस चालू केली की कुठे जायचयं? ती कोल्हापूर बोलली. त्यानंतर त्यांनी तिला थोड पुढे सोडून दिलं आणि तो परत यायला लागला.


तेवढ्यात ती बस समोर आली आणि तो भैया परत तिच्या मागे धावला आणि तिला घेऊन आला आणि बोलला चलो दीदी मै आपको अंदर छोड देता हूँ. बस थोड्याच पुढे होती तरीही त्याने तिला ऑटोमध्ये बसवलं आणि तिला बसपर्यंत नेऊन सोडलं आणि बसमध्ये सुद्धा बसवलं. हा सगळा प्रकार घडेपर्यंत माझी बस यायची होती. इतका सगळा प्रकार बघून मला खूप प्रसन्न वाटलं आणि एकच विचार आला की इतकी माणसं तिच्या आजूबाजला होती पण रक्षा करण्याचं हे बंधन कुठलंही बंधन (नातं) नसताना या भैयानेच निभावलं होत!


Rate this content
Log in

More marathi story from Lina Lichade