रात्रशाळेची किमया
रात्रशाळेची किमया
शाळेच्या पहिल्या दिवसापासून मानव आणि आदित्य यांच्यामध्ये क्षुल्लक कारणांसाठी कुरबूर होत असे. त्यांच्यामधील वाद-विवाद नित्याचे झाले होते तसेच दोघातील वैर सर्वज्ञात होते जसे साप आणि मुंगूस.
दोघेही आपापल्या परीने समोरच्यास लहान कसे दाखविता येईल याची योजना करत असे कारण दोघेही मोठ्या, म्हटले तर अगदी धनाढ्य आणि हातात पावर असलेल्या घरात जन्मलेले होते.
मानव होता शाळेच्या संस्थापकाचा मुलगा तर आदित्य चे वडील नगरसेवक म्हणून कार्यरत होते. दोघांनाही आपापल्या श्रीमंतीचा अतिशय गर्व तर होताच पण ती श्रीमंती दाखविण्यात दोघेही कुठे कमी पडत नसत. पैशाच्या जोरावर ते इतर मुलांना त्यांची चमचेगिरी करण्यास भाग पाडत असे. एकाकडे नवीन एक वस्तू आढळून आल्यास त्या पेक्षा चांगली दुसरा आणणारच हे ठरलेलेच.
या परिस्थितीची एकंदरीत माहिती सर्वांना होती.
शाळेमध्ये टु-व्हिलर आणण्यास विद्यार्थ्यांना परवानगी नव्हती म्हणून सायकल वापरावी लागत असे. मानव आणि आदित्य यांची पार्किंग ठरलेली असे पण एके दिवशी मानवने दुसऱ्याच गोष्टीचा राग मनात धरून आदित्य ची सायकल हटवून स्वतः सायकल पार्क केली मग काय! आदित्य ने मानव च्या सायकलची अशी मोडतोड केली की कोणीही मध्ये हस्तक्षेप करण्याची हिंमतच केली नाही. आणि काय परत तेच भांडण आणि त्याच तक्रारी!!
या सर्वांना सर्व शिक्षक,प्राचार्य आणि स्वतः त्यांच
े पालक सुद्धा वैतागलेले होते. यावरून प्राचार्यांनी दोघांचाही पालकांना सल्लागार कडे जाण्यास सांगितले. सल्लागार (कौन्सिलर) सर्व प्रकार ऐकून एक युक्ती सुचविली, या दोघांनाही रात्रशाळेत (नाईट स्कूलमध्ये) शिकण्यासाठी पाठवा आणि तेथील विद्यार्थ्यांसोबत राहण्यास सांगा.
आदित्य आणि मानव तेथे जाऊन राहू लागले. त्या दोघांनाही तिथे वेगळे चित्र दिसून आले दिवसभर काम करून रात्री शाळेत जावे लागत असे. समूह इन मुलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी धडपड करावी लागत असे ज्या गोष्टी त्यांना सहजपणे आपल्या घरी प्राप्त होत असे. त्या लोकांची धडपड, त्यांचे कष्ट बघून प्रत्येक गोष्टीची किंमत त्यांना कळून येत होती. तेथील काही मुलांमध्ये तर शाळेत येण्याची इच्छा असूनही घरातील पालक काम करण्यासाठी पाठवत असे बाकीच्या गोष्टी तर दूरच!!
त्यांना त्यांची चूक उमजली आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत असे आश्वासन त्यांनी सर्वांना दिले.
या घटनेमुळे आदित्य आणि मानव यांच्या जीवनात तसेच दोघांच्या संबंधांमध्ये पण परिवर्तन झाले.
त्यांना जाणीव झाली की आपण ज्या गोष्टीचा गर्व करत होतो ज्या गोष्टी आपल्याला सहजपणे मिळत होत्या त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना किती धडपड करावी लागते. जसे की मिळालेल्या वस्तूंची किंमत न करता मोडतोड करणे, श्रीमंतीचा दिखाऊपणा करण्यासाठी विनाकारण पैसे खर्च करणे.