STORYMIRROR

Minakshi Bansode

Others

3  

Minakshi Bansode

Others

रांगोळी

रांगोळी

2 mins
270

सकाळी लवकर उठून अंगणात सड़ा टाकायचा मग त्यावर छानशी रांगोळी काढायची असा दिवस सुरू व्हायचा...

तेव्हा आजीला विचारले का ग आजी सड़ा रांगोळी करायची ? तेव्हा आजीने सांगितले ....

या कृतीतच संसारचे सार दड़लेल आहे ग.... आश्चर्याने मी विचारले कस ?

तशी आजी म्हंटली ते मी सांगते. पण तू मला सांग, सड़ा रंगोळीचे अंगण पाहिले तर तुला काय वाटते?

मी म्हंटल काय वाटणार? छान वाटते. प्रसन्न वाटते. अजून काय?

आजी म्हंटली, बर आता मी सांगते बर का! सकाळी उठून जेव्हा बाई आधी अंगण झाड़ते ना....तेव्हा कालची मनातलि घाण , रुसवे फुगवे, कुरबुरि यांचा कचरा ती बाहेर फेकून देते. नंतर जेव्हा पाण्याने ती सड़ा टाकते ना .... तेव्हा आपल्याच मनावर ती समजूतिचि , सामंजस्याची शिंपण करीत असते आणि सगळी नकारात्मकता ती दाबून टाकत असते. मग जेव्हा ती या दाबलेल्या मनावर अर्थात साड्या टाकलेल्या अंगणावर रांगोळी काढते ना तेव्हा सगळी सकारात्मकता त्यात येते. माझे अंगण चांगले दिसावे माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मी सुख द्यावे याकडे तिचे चित्त जाते मग कोणासाठी काय काय करायचे कसे करायचे याचे नियोजन ती रांगोळी काढताना करते. मग असे सकारात्मक ऊर्जेने भरलेलं मन तिला दिवसभर सळसळत ठेवतं तिच्याकडून घरातील सदस्यांना सुख होण्याचा आटोकाट प्रयत्न करतं पर्यायाने तिच्या बाजूने घरातील शांतता प्रसन्नता टिकवण्याचा प्रयत्न होत असतो तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जवा सुंदर रांगोळी पाहते तेव्हा ती पण प्रसन्न होते जरी वाईट विचार मनात घेऊन आली असेल तरी त्याचाही काही अंशी निचरा होतो पर्यायाने त्याचा या घराला मोठा फायदाच होतो. अशाप्रकारे सकारात्मकतेचा एक स्त्रोत सध्याच्या काळात आपणच बंद केला आहे सध्या अंगणातच नाही तर त्यापुढे रांगोळी तरी कशी येणार पण असा विचार करण्यापेक्षा दारात जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेतच छोटीशीच रांगोळी काढू या .सगळी नकारात्मकता घालून जेवढे सकारात्मकता घेता येईल तेवढी घेऊ या दिवसाची सुरुवात चला निर्मळतेने करु या.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷


Rate this content
Log in

More marathi story from Minakshi Bansode