Krishna Jogdand

Others

3  

Krishna Jogdand

Others

प्रतिबंध

प्रतिबंध

1 min
1.4K


मनाच्या उत्तरार्धात प्रतिबंधित झालेलं प्रेम भावनेच्या स्वच्छंद सावलीत विश्राम घेतं याची बाजु एखाद्याला स्पष्टपणे दिसणं म्हणजे अवघडचं , पण जे दिसतं नाही समजतं नाही आणि मांडता ही येत नाही खरतर हेच ते आहे ज्याच्या परिभाषेशी तुम्ही जाणुन सुद्धा त्याच्याशी अन्नभिन्न आहात.

 

कुणाच्या कोमलतेची सौन्दर्य़क छटा मला मांडायची होती पण त्याच्या मुळ निरागसतेशी त्याच संबंध दाखवल्याशिवाय तो भाव स्पष्ट होणार नव्हता. म्हणुनचं मला त्याच्या अविभावाची जाचकता माझ्या शब्दात मला मांडावी लागली.

एवढं काही मांडल पण त्या मागचा अर्थ समजला नसेल की मी कुणाबद्दल बोलतं आहे ,

वैचारिक स्तरावर पाहायला गेलं तर तो अगदी एका शब्दात बोलुन मोकळा ही होईल पण

खरतर ही ती धारा आहे जी एका स्थानावर एका ठिकाणी एका प्रवाहात राहुच शकतं नाही.

मुक्त होऊन जगणं आपल्या अस्तित्वाला विसरून त्याच्या अस्तित्वाला महत्त्व देणं हे त्याच्या नियती शी ठरलेलं आहे.

कधी ती एका ठिकाणावर राहतं नसेल तर त्या परिभाषीत केलेल्या निरागसतेला स्वतःशी एवढं का जखडुन ठेवावं.

ज्यात त्याचा जीवच निघुन जाईल.


Rate this content
Log in

More marathi story from Krishna Jogdand