परिक्षेवरुन वाद विवाद
परिक्षेवरुन वाद विवाद
1 min
183
परीक्षे वरून वाद-विवाद
आज मात्र सुरूच आहे
विद्यार्थी लढतोय न्याय हक्कांसाठी
अन् सरकार मात्र त्यांच्या निर्णयावरच ठाम आहे
विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणाराच
आज खरंच गुन्हेगार ठरत आहे
अन् प्रतिष्ठित ही जनता सारी
विद्यार्थ्यांची बाजू कुठे मांडत आहे?
काकुळतीला येऊन विद्यार्थी
ऑनलाईन परिक्षेची मागणी करत आहे
परंतु गप्प बसलय बोर्ड सरकार कारण;
ते ऑफलाईन परिक्षेवरच ठाम आहे
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे
गांभिर्याने कुणी पाहतच नाही
अन् विद्यार्थी आलेत आता रडकुंडीला
परंतु त्यांची दयाच या सरकारला येत नाही
आंदोलन करुन सुध्दा आता
ना मागण्यांना काही महत्व आहे
विद्यार्थी उतरलाय रस्त्यावरती
तरीही सरकार मात्र हे गप्प आहे...
