Ashwin Chavhan

Others

3  

Ashwin Chavhan

Others

प्रेमात फसलेल्या आलियाची गोष्ट

प्रेमात फसलेल्या आलियाची गोष्ट

4 mins
15.9K


रात्रीची वेळ असल्याने राजेशला आलीयाच्या घराकडे जान शक्य नव्हते त्यामुळे तो संदिपला मेसेज करून

बोलावुन आलीयाच्या घराकडं निघुन जातात ठरल्या प्रमाने तिही वेळेतच तेथे आली होती चंद्राच्या साक्षिने दोन्ही जिव आपल्या भेटीत मग्न होवुन जातात . पण संदिपला कुणीतरी येत असल्याचा भास होताचं तो राजेशला सावध करतो , पण संदिपच्या मनात एक व्दंद चालु असते की एवढ्या रात्री हा भेटला . पण त्याला तीथ आलेला अत्तराचा सुगंध ओळखीचा वाटला , मग राजेश विचारना करतो तर राजेश कडुन त्याला माहिती मिळते तसं तो त्याच्या कानाखाली लगावतो आणि पुन्हा आपल्याला ह्या कामाकरता बोलवायचं नाही याची समज देवुन घराकडं निघुन जातो .

दिड महिना आलीया आणि राजेश एकमेकांना भेटतात ,

पण अचानक एक दिवस आलीया कॉलेजला जाते तर घरी येतच नाही , सर्व नातेवाईकांना विचारना होते परंतु

ती कुणाकडेचं गेलेली नव्हती , मग एकदिवस कुणीतरी

नुर चाचाला सांगत की राजेश आणि संदिप रात्री बाराच्या सुमारास तुमच्या घराकडे मी पाहिले , नंतर सर्व सर्व मोर्चा राजेशच्या घराकडं वळतो तर तिथं त्यांना मोबाईल नंबर व्यतिरिक्त काहिच मिळत नाही आणि तोही बंद असतो ,

नंतर सर्व जमाव कॉलेजात गेलेला संदिपला रस्त्यावर गाठतात , त्याला नुर चाचा मोठ्या संयमाने विचारतात आणि त्याचा मोबाईल चेक केला जातो परंतु त्या दिवशीच्या मेसेज शिवाय काहीच मिळत नाही , नुर चाचाला येता जाता आदाप करनारा संदिप आज संशयाच्या घेरात असतो , त्याच्या प्रत्येक हालचालीवर गाव लक्ष ठेवुन असतो याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणात होतो ,

या गोष्टीला पंधवाडा उलटुन जातो एकदिवस संदिपला

राजेश घराकडं येत असल्याचा दिसताच तो त्याला गाठतो.

" काय कुठं होतास एवढ्या दिवस" .

" काही नाही भावाकडं गेलतो इंदोरला ".

" तुझा मोबाईल सुध्दा बंदआहे". का ?

" तु ज्या दिवसा पासुन गावात नाहीस , तेव्हा पासुन ती सुध्दा हरवली आहे ". काय झालं खरं खरं सांग

तुमच्या प्रेम प्रकरणाची गाव भर चर्चा आहे .

या गोष्टी मुळ राजेश त्याला वेड्यात काढतो ,

" अरे कुठं ती काळीशार आलीया कुठं मी ", मी नव्हतो प्रेम करत तिच्यावर . तिला खुप वेळ समजावले मी

की हे चुकीचं आहे म्हणून , मी लोकांच्या मुलीवर लक्ष ठेवायला आहे का , गेली असेल कुणा बरोबर पळुन मला काय माहित ,

आलीच्या घरचे सुध्दा राजेशला विचारतात पण त्यांनाही तो असाच मार्गी लावतो शेवटी आलीयाच्या घरचे नजकच्या स्टेशनला आलीया हरवल्याची तक्रार देतात ,

राजेश गावात आल्यानंतर एका महिन्यांने आलीय पोलासांना कुठं तरी बेशुद्ध अवस्थेत सापडते , तिच्यावर उपचार सुरू असतात हळुहळु ती सुध्दीवर येते पण तिच्या डोळ्यात अश्रू शिवाय काहिच नसतं , तिचे ते मौन डोळ्यातील अश्रू माप बापाचे काळीज कापत होते आलीया कोणाला काहीचं सांगायला तयार नव्हती ती एक जिवंत पुतळाच होवुन जाते खचलेली असते ,

दोन दिवसा नंतर आलीया राजेशच्या जवळचा मित्र रोशनला मेसेज करून भेटन्याची ईच्छा व्यक्त करते , आणि ही गोष्ट ते कोनाला सांगनार नाही हेही बजावते ,

रोशन नंतर संदिप कडे येतो आलीयाच्या आलेल्या मेसेज बद्दल सांगतो परंतु संदिप पुन्हा या प्रकरणात पडनार नाही आस म्हणतो पण या गोष्टी विषयी नुर चाचा ची परवानगी

असेल तर ती येईन म्हणतो आणि ते नुर चाचा ची परवानगी घेतात , रोशनला पाहुन पाहुन आलीयाच्या भावनांचा बांध फुटतो , नेहमी हसत खेळत जगनारी आलीया नियच्या पुढे हतबल जगण्याची उमेद सोडलेली असते ,

"राजेशने माझा उपयोग केला रे , मला मरायला सोडून पळुन आला , मी त्यावर जिवापाड प्रेम केले आणी त्याने माझा विश्वासघात केला , त्याने जे जे सांगितले ते मी केले , खुप किळसवान्या गोष्टी करून घेतल्या त्याने माझ्या कडुन त्याचे मन भरले तेव्हा त्याने , मला सोडुन दिले , आलीया जिवाच्या आकांताने सर्व सांगत होती ,

काय दोष होता आलीयाचा की तिने जिवापाड प्रेम केले हाच ना , आज ती आश्या अवस्थेत होती की तिला मरताही येत नाही अन् जगताही येत नाही ,

अश्याही परिस्थितीत ती राजेशला म्हणते "मी त्याच्यावर अजुनही तेवढेच प्रेम करते जेवढे आधी करत होती ", त्याला समजवा तुम्ही मी त्याच्याशीवाय जगु शकत नाही ; त्याला म्हणा की तुझ्या घरच्यांना विचार मी माझ्या आई वडीलांना सांगते . मला लग्न करायचे त्याच्या सोबतं ,

परंतु राजेश बद्दल रोज येनाऱ्या बातम्यांनी आलीया खचुन जाते , एक दिवस ऐंबुलन्स आलीयाचा देहच घरी आणते , नेमकं आलीया सोबत काय झाले हे कोनालाच माहिती नाही ,

खरचं आजची आधुनिक पिढी पवित्र प्रेमाला गरजे नुसार वापतर आहे , कुठं तरी तरूणाई प्रेम या शब्दाचा वापर फक्त शारीरिक गरजा पुर्ण करत आहे , त्यामुळे राजेश सारखे व्यक्ती आलीया सारख्या मुलीच्या भावनांशी खेळतात आणि त्यांच्या प्रेमाचा पालापाचोळा करुन शेवटी मातीत घालतात . यामुळं प्रेम भावना संकुचित झाली आहे म्हणून मला तरूणाईला विचारायचं

" प्रेम म्हणजे नेमक काय ".


Rate this content
Log in