The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

shree sutawane

Others

2  

shree sutawane

Others

" पपी " (पटकथा)

" पपी " (पटकथा)

12 mins
1.0K


कारच्या आत: रात्र - 11.30-12.00 

(ब्लॅक अँड व्हाइट मध्ये )

     एका अंधार्‍या सुमसाम रोड वर कार चालत आहे.30-32 वर्षाचा मुलगा गाडी चालवत आहे. साधारण त्याच वयाची मुलगी बाजूच्या सीट वर बसलेली आहे. कारच्या आत एफएम वर “दूर कही जएंगे..नई दुनिया बसाएंगे..हमने घर छोडा है..रसमोको तोडा है..” हे गाणं सुरू आहे...मागच्या सीट वर एखादा लहान मुलगा बसून समोरचा रिकामा रोड,समोरच्या सीट वर शांत बसलेले कपल, पास होणारे स्ट्रीट लाइट बघतो आहे असं दिसत आहे..

मुलगा

बंद कर यार ही भणभण.... फक धिस रिलेशनशिप अँड रिस्पोन्सिबिलिटी...(वाकडं तिकडं ओरडत ..तोंड वेंगाडून ) हमने घर छोडा है..रासमोको तोडा है..नया जहान्नुम बसाएंगे...और एक दुसरेको नोच खाएंगे..

मुलगी

हो हो माझ्यामुळेच हाल होत आहेत ना तुझे...घरातल्या सगळ्या जवाबदर्‍या मी उचलते आहे...तुला स्वतहाशिवाय काही दिसतं का? माझ काम..... माझा प्रोजेक्ट...मला एमएनसी मध्ये नाही, तुझी गुलाम बनून घरात बसायला पाहिजे होतं..नाही का? आणि येवढाच त्रास होतोयना तर यू शुड चेंज द सॉन्ग...

मुलगा गाणं बदलतो. “तुझसे नाराज नही जिंदगी..हैरान हू..परेशान हु...” हे गाणं लागतं..

मुलगा

फक धिस परेंटिंग ऑल्सो..फक टू बिकम फादर अँड ऑल...

मुलगी

तु बेबि समोर शिव्या देणं बंद करशील प्लीज?? नसेल एकायचं काही तर बंद कर ते गाणं.. बट             स्टॉप स्क्रिमिंग अँड शौटिंग..

मुलगा

नाऊ यू आर शौटिंग..

 

मुलगी

नो यू स्टारटेड इट फस्ट..

मुलगा

ओके दॅट्स इट..

करकचून ब्रेक लागतो. गाडी थांबते.थोडा वेळ कोणीच बोलत नाही.

मुलगा

ही जागा ठीक आहे...

पुन्हा शांतता. मुलगी आजु बाजूला बघते

मुलगी

धिस इज हिज लास्ट फ्यू मुवमेंट्स विथ अस...वी शुड प्ले हिज फेवरेट सॉन्ग..

 

मुलाची हतबल रिएक्शन.मुलगी स्वतहाच्या मोबोईल वर “हुप्पा लुमिया लुमिया”  हे अनिमटेड गाणं प्ले करते..आणि मागे बसलेल्या बेबिला दाखवते.बेबी गाणं बघत आहे..मुलगी इमोशनल झाली आहे...

मुलगा

ओक नाऊ... दॅट्स इट...बी स्ट्रॉंग...फिनिश इट फास्ट....थ्रो इट अवे..

मुलगी इमोशनली दरवाजा उघडते..पर्समधून काही तरी खाण्याचा पदार्थ बाहेर काढते..मागच्या दरवाजयपर्यंत येते..दरवाजा उघडते...बेबिला ते बिस्किट दाखवते..

मुलगी

कम बेबी....कम आऊट साईड..सी यॉर फेवरेट बिस्किट...

मुलगी ते बिस्किट बेबिला दाखवून लांब रस्त्याच्या कडेला फेकते. इथे लक्षात येते की बेबी हे एक 3 ते 4 महिन्याचा लॅब्राडोर कुत्रा आहे. कुत्रा गाडीतून खाली उतरतो.रस्त्यावर मुलीने लांब फेकलेले बिस्किट खायला लागतो. मुलगी गाडीत जाऊन बसते.गाडी सुरू होते.गाडी लांब जाऊ लागते. कुत्र्याला गाडीचे बॅक लाइट लांब जाताना दिसतात. कुत्रा खाणं सोडून गाडीच्या मागे जोरात पळत जातो. गाडी जोरात लांब निघून जाते. कुत्रा आजूबाजूच्या आनोळखी जागेकडे कावरा-बावरा होऊन बघत आहे.घाबरला आहे.त्याला थ्रो इट अवे हे शब्द एको मध्ये आठवत आहेत..मागून सडक छाप सोडलेल्या कुत्र्यांचे गुरगुणे ऐकू यायला लागतं.कुत्रा केकाटतो..कट टू

 

 

 

बाहेर: दिवस

                                   (कलर )

कुत्रा पिंजर्‍याच्या आत एकदम दचकून जागा होतो, त्याच्या जवळ येणार्‍या हातावर एकदम वसकून धावतो. आजु-बाजूला मोकळ्या जागेत प्राण्यांचा निराधार आश्रम/अनाथालय असं वातावरण. एक 24-25 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजींनियर,थोडा केअर लेस अपरोच असणारा वाटावा असा तरुण मुलगा आणि आश्रमाचा एक 40-45 वर्षाचा साधा कर्मचारी पिंजर्‍याच्या समोर उभे आहेत.मुलाने झोपलेल्या कुत्र्याला जवळ घेण्यासाठी आपला हात पिंजर्‍यात नेलेला असतो. कुत्रा स्वप्नात आपला भूतकाळ आठवून दचकून जागा होतो आणि घाबरून जवळ येणार्‍या हातावर धावतो.

मुलगा

ओये..हे तर चावतय..तुम्ही तर म्हणाला होतात सरळ-साधं कुत्रं आहे म्हणून...

कर्मचारी

सर...तो थोडा घाबरलाय...दोन दिवसांपूर्वीच इथं आलाय...सेट व्हायला थोडा वेळ तर लागतोच ना..

मुलगा

रानटी नाहीना भावू हे?? मला माझ्या पार्टनरला बर्थडे गिफ्ट म्हणून द्यायचय बरका...ती ह्याला जवळ घ्यायची अन साहेब तिलाच चावायचे....म्हणजे झालं बर्थडे गिफ्ट विथ लव बाइट...(हसण्यावर नेतो)

कर्मचारी

नाही सर..नाही चावणार....कुत्र्यांवर तुम्ही फक्त प्रेम करा..ते जीव देतील तुमच्यासाठी..इथे जे कुत्रे येतात ना साहेब ते लोकांनी रस्त्यावर सोडून दिलेले असतात...ट्रोमा मध्ये असतात बिचारे...घरापासून तुटल्याचा धक्का बसतो त्यांना...लोकं घेताना हौशेने विकत घेतात, लेकराला आई पासून तोडतात, जीव लावतात अन नव्याचे नऊ दिवस संपले की त्यांना जवाबदारी नको वाटते....सोडून देतात रस्त्यावर...ह्यालाच बघा ना साहेब..महाग ब्रिड आहे बरका...पण आज इथं आहे..

मुलगा

हो बरोबर....नाही म्हणजे चुकतच लोकांचं...मी काय करतो थोडा वेळ खेळतो ह्याच्या सोबत...बघतो अॅडजस्ट होतो का ते...आणि सांगतो तुम्हाला ह्याला घरी न्यायचं का ते...काय?

कर्मचारी ठीक आहे असं म्हणून निघून जातो..मुलगा काही वेळ कुत्र्याला जवळ घेऊन त्याला प्रेमाने चुचकारत कर्मचारी लांब गेला आहे का हे नीट बघतो आणि परत कुत्र्याला जागेवर ठेऊन खिशातून फोन काढून पटकन कोणालातरी फोन करतो.

सिंगल साईड फोन टॉक

मुलगा

हा उस्मान भाई...मै दिनेश बोल रहा हू...हा दिनेश...वो लॅब के पपी के बारेमे मैने बात की थी आपसे...हा..हा..कुछ हुया...अरे नाही उस्मान भाई..बीस हजार बोहोत होते है....देखो कुछ कम जादा हो सके तो... मै खिच तान के दस तक दे सकता हू ..देखो कल मेरे बंदी का बर्थडे है...कल ही गिफ्ट देना है...कुछ नही हो सकता क्या... क्या उस्मान भाई साधा कुत्ते का पिल्ला तो है.....देखो कुछ....अब मै आपको एकदम खुला बोलता..मेरेको एक लॅब मिल रहा है..वो भी फोकट मे..कुत्ते के सामने मै खडा है..फोकट मे मिलरा मेरेको...फोकट मे..बात ये है के वो चार महीने का है....लौण्ढियो को पपी पसंद होते है...कुत्ते नही इसलीये लास्ट टाइम आपको फोन किया....देखो...नही? ठीक है फिर...


कट टू    

घरात: रात्र : 12.00

अंधार... (केवळ आवाज) मुलगा आणि मुलगी बर्थडे केक कापण्याची प्रोसेस सुरू असल्याचे आवाज येत आहेत . मुलगा साधारन त्याच्याच वयाच्या गर्लफ्रेंड पार्टनरला तिचे डोळे आपल्या हाताने झाकून एका बंद बास्केटच्या जवळ घेऊन येतो आहे असा संवाद..बास्केट ओपन होऊन मुलगी आत बघते   

मुलगा

सरप्राइस......हॅप्पी बर्थडे टू यू.... हॅप्पी बर्थडे टू यू.... हॅप्पी बर्थडे टू डियर शोना.... हॅप्पी बर्थडे टू यू....

मुलगी

ओह माय गॉड .... ओह माय गॉड ....दोगी....माय श्वीत बच्चू...ओ....(सो ऑन) डार्लिंग आय रियली लव्ह यू...

मुलगा

देखा… बोला था या नई..धिस टाइम आय विल मेक यॉर बर्थडे वेरी स्पेशल....

(Improvise as per requirement)

नवीन कुत्रा आल्यावर त्याच्याशी ज्या पद्धतीने खेळत असतात, जस की कुरवाळणे, जमिनीवर बसून पंजा द्यायला लावणे, कुत्र्याला उड्या मारायला लावणे, एखादी गोष्ट लांब फेकून छू.. म्हणून तो ती वस्तु परत घेऊन येतो का असे खेळ अपेक्षित.

मुलगी

डार्लिंग आय एम डाईंग टु अनौन्स इट टु द वर्ल्ड..... कम शोना कम टू मम्मी....उम्ह….वी विल हॅव यॉर पिक्चर (सोशल मीडियावर आपलोड करण्यासाठीचे फोटो सेशन सुरू....) शोना टेल मी...हा थोडा जास्त मोठा नाही का वाटत? म्हणजे मला की नई पपी पाहिजे होतं..यू नो पपी..? बट इट्स ओक...ही इज ऑल्सो स्वीट....वेट...ओह माय गोड...इज ही, ही ऑर शी ?

मुलगा

अरे नाही डार्लिंग कुत्राय तो...म्हणजे मेल आहे..मेल...आणि मोठा दिसतो...कारण....लॅब्राडोर लगेच वाढतात अगं.. (उडवा उडवी )

मुलगी

हो का?....बरं...ह्याचं नाव काय ठेवायचं आपण? टॉम ? नाही वॉलटर ठेवूयात...नाही तर...सायमंड ठेवूयात का? आमच्या यू.एस.च्या बॉसचं नाव आहे...कुत्रा कुणीकडचा...नको आपला डोग्गी चांगलाय ना पण....टॉमचं ठेवूयात...एकदम छोटं आणि एकदम वजनदार.... टॉमी डार्लिंग....(मोबाइल वर टाइप करत करत..) ‘#New world..#New life..with #New partner..Tommy..#Our Doggy..#Sweet Birthday gift by #Sweet partner’ … ये पी....ओह माय गॉड..ट्वेंटी लाइक्स वीदिन फाइव सेकंड....

मुलगी काही पोझेस देत कुत्र्या सोबत आणि मुला सोबत फोटो काढत आहे. ते कुत्र्याला दाखवणं सुरू आहे...

मुलगी

बेबी जस्ट टेल मी....प्लीज डोन्ट टेक इट अदर वाईज...व्हाय इज ही स्टिंकिंग..? वास येतोय नाही का ह्याच्या अंगाचा?

मुलगा

वास??? हा...आगं डॉग शॉप मध्ये शॉवर थोडीच लावलेले असतात....खूप कुत्रे असतात नाही का तिथे...कोणा-कोणाला आंघोळ घालत बसतील? आपण घालूना आंघोळ त्याला उद्या.... शॉपिंग करू टॉमी साठी उद्या... शॅम्पू..टॉवेल..साबन..प्रोटीन फूड...पण आधी मला माझं रिटर्न गिफ्ट तर दे....

मुलगा, जसं कुत्रा जीभ बाहेर काढून ल्हया... ल्हया...करतो तसा आवाज करत मुलीकडे लुक देतो, कुत्रा चमकून मुलाकडे बघतो.

                                   मुलगी

हम्म... हिंट देतोय मला?... नोटि टुटि-फ्रूटी...येस..धिस नाइट यू विल गेट द बेसटेस्ट गिफ्ट ऑफ एवर, यू नेवर हॅड बिफोर....आधी आपण दोघांचे फोन सायलेंटवर टाकू कारण बर्थडे विशच्या नावाखाली लोकं आपल्याला डिस्टर्ब करणार नाहीत....देन... वेट….वी विल बाथ फस्ट......अँड...

 

 

 

टाइम लाप्स

मुलगी आधी बेडरूम मध्ये जाते. मुलगा कुत्र्याला काहीतरी खायला टाकून मुलीच्या मागे जातो. कुत्रा नवीन घरात फिरतो आहे, खायला टाकलेले खातो आहे...बेड वर चढतो आहे...खाली उडी मारतोय..कुत्रा घरभर फिरत असतांना वाढदिवसासाठी केलेले डेकोरेशन,बुके,कापलेला केक व अस्तव्यस्त घर दिसणे अपेक्षित. पिझ्झा चे तुकडे, पार्सल बॉक्स.इकडे तिकडे पडलेले कपडे. पलंग, टिपोय आणि कपाटाच्या खाली पडलेला कचरा. मागे मुलगा आणि मुलगी रोमॅंटिक / इंटेन्स मूड संभाषण आवाज..शॉवर घेतांनाचे एकमेकांना टिझिंग....थोड्या वेळाने कुत्रा बेड समोर,जमिनीवर त्याच्यासाठी ठेवलेल्या जागेवर येऊन मान खाली ठेवून झोपण्याच्या बेतात पसरून शांत बसला आहे..रोमॅंटिक मूड मध्ये मुला मुलीचे फक्त पाय बेड जवळ येताना दिसतात..ते एकत्रच बेडवर कोसळतात..लाइट बंद होतो..अंधार

मुलगी

(किंचाळते)..छीSSSSSSSSS डिड ही शिट ऑन द बेड? नो....SSSS..वाक....

 

 

 

 

कट टू      

घराचा हॉल: सकाळ , 07.30-8.00

मुलगा सोफ्यावर बसून, टेबल वर पाय ठेऊन,लॅपटॉप वर काही तरी करतो आहे. त्याला रात्रीच्या घटनेचा गिल्ट असल्या सारखा तो काम करत आहे. मुलगी काल तिच्या बर्थडे च्या रात्री बेड वर कुत्र्याची घाण अंगाला लागल्यामुळे ती तन-तन करत घरात इकडून तिकडे फिरत आहे.कुत्रा भांड्यात ठेवलेले दूध ब्रेड खात आहे.

मुलगा

बेबी..

मुलगी

शट-अप जस्ट शट-अप....काल चांगला केक कट केला माझ्या वाढदिवसाचा...

तेवढ्यात दारावर बेल वाजते. मुलगी दरवाजा उघडते. दारावर दूधवाला दूध बॅग घेऊन आला आहे.

मुलगी

भैय्या आज एक बॅग जादा मिलेगी क्या?

दूधवाला

हा दीदी है...कल भी लगेगी क्या?

मुलगी

नही.. कल का मै आपको कल बताती हू.... (काल रात्रीच्या प्रकारानंतर कुत्रा घरात राहणार नाही कदाचित या आविर्भावात..)

मुलगी दूध बॅग घेते दरवाजा बंद करते.ती हॉल मधून किचन मध्ये जाताना मुलगा आता मुलीला थोडा मनवण्याच्या मूडमध्ये..लॅप टॉप तो करत असलेले काम मिनिमाइज़ करून कोणता तरी सोशल मीडिया ओपन करत मुलीला म्हणतो... मुलगा

बेबी..अगं हे बघ...तुझ्या टॉमी सोबतच्या पाउट ल 1800 लाइक मिळालेत हे बघ....

मुलगी

व्हॉट... ओह नो...ओह वाव..दाखव दाखव...शो मी... येपी ....माय स्वीट टॉमी...थॅंक यू बच्चा....मम्मी लवस टॉमी वेरी मच..

मुलगी किचनमध्ये न जाता तिथेच लॅपटॉप बघत बसते. नंतर लॅपटॉप वरचं लक्षं बाजूला करून स्वतहाचा मोबाइल हातात घेते...मुलगी मुलाच्या बाजूला बसून टॉमीला मांडीवर घेऊन स्वतहाचा मोबाइल चेक करायला सुरवात करते. ज्याच्यात काल रात्रीच्या फोटोंवर आलेले रीप्लाय, बर्थडे विश बघत आहे.मुलगा लॅपटॉप बघतो आहे..

मुलगा

बेबी…..मी काय म्हणतो..हे पण बघतेस का जरा....जस्ट चेक धिस....पेडिग्री 2500 रूपीस...डॉग शॅम्पू 200 रूपीस...डॉग सोप-150 रूपीस...डॉग बेल्ट-500 रूपीस..डॉग वाक्सिनेशन-3300, शेल्टर-3000 रूपीस....टॉवेल , पॉट,

मुलगी

व्हॉट ? येवढं महाग?..उम्म...बेबी हाऊ कॅन वी मॅनेज धिस?

मुलगा

हाऊ वूड आय नो? तुला पपी पाहिजे होता ना?

मुलगी

नो....आय सेड..आय जस्ट सेड आय लाइक पपीज...

मुलगा

पण मागे तुच तर म्हणाली होतीस की, एक दिवस तुला कुत्र्याचं पिल्लू पाळायचं आहे म्हणून..

मुलगी

हो...पण तो एक दिवस आज नाहीये... आय एम नॉट रेडी फॉर पारेंटिंग...

मुलगा

पारेंटिंग? च्यायला कुत्रं पाळण पारेंटिंग कधीपासून झालं?

 

मुलगी

आर यू स्क्रिमिंग ? तू माझ्याशी भांडतोएस ?माझ्या वाढदिवशी माझ्यावर ओरडतोएस?

 

दोघसुद्धा वाद घालायला लागतात...कुत्र्याला दोघांच्या जोर जोरात येणार्‍या आवाजाने त्रास व्हायला सुरवात होते..त्याला ब्लॅक अँड व्हाइट मध्ये कार मधले त्या दिवशी रात्रीचे प्रसंग आठवायला लागतात, सडक छाप सोडलेल्या कुत्र्यांचे गुरगुणे ऐकू येवू लागते. तो दोघांच्या मधे पडून, चाटून प्रेम करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करायला सुरवात करतो.

मुलगी

ओह स्वीट टॉमी…आय लव यू..बघ बघ जरा ह्या कुत्र्याला..त्याला माहितीये की आज मम्मीचा वाढदिवस आहे म्हणून...नाहीतर तू..

मुलगा

म्हणजे या घरात माझी लायकी या कुत्र्यापेक्षा गेलेली आहे का? च्यायला आधी शेपूट हलवत राहावं लागत होतं...आता काय लाळघोटेपणा करायचाच बाकी राहिलाय...   

मुलगी

यू नो दिनेश...यू आर जस्ट पीस ऑफ शिट... यू आर आस...आज माझा वाढदिवस आहे...मी आज सुट्टी घेऊन एंजॉय करण्याच्या मूड मध्ये होते....बट यू रूइन्ड माय डे.... आय एम गोइंग टु ऑफिस…बाय

मुलगा

काय?...काय म्हणालीस तू? तू ऑफिसला जाणार? बर... मी कोणत्या खुशीत घरात बसु?

मुलगी

ओके...म्हणजे तुला हेच पाहिजे होतं...बघवत नाहीना तुला माझं सुख? मी आनंदात असले की डोकं फिरतं तुझं... मला वाटलं की मी रूसले तर तू माझी समजूत काढशील... पण नाही तुला तर आता लाळघोटेपणा वाटतो ना... काल रात्री जे हवं ते नाही मिळालं म्हणून कर तमाशा तू..

 

दोघं परत भांडायला लागतात. कुत्र्याची दोघांच्या पायात घुटमळत समजुत काढण्याचा केविलवाना प्रयत्न.मुलगी तिथुन निघुन आतल्या खोलीत जाऊन दरवाजा अदळते. कुत्रा तिला फॉलो करत खोलिच्या दरवाजा जवळ घुटमळतो. समोरचे दोन्ही पाय दरवाजावर घासुन तो उघडण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याच्या घशातुन केविलवाना आवाज. मुलगा हॉल मधुन ओरडतो….

मुलगा

ठिक आहे..गो टु हेल…आय एम ऑल्सो गोइंग टु ऑफिस...या कुत्र्याला कुठं ठेवायचं तेवढं सांग..? डॉग सिटर शोधणार होतो आपण..

काहीच उत्तर येत नाही . मुलगा दुसर्या खोलीत जाऊन दरवाजा आदळतो. आता कुत्रा मुलाच्या खोलीकडे धावतो. तो मुलाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. कुत्रा दोन्ही दरवाज्यानमधे धावतो. घश्यातुन केविलवाना आवाज. खुप वेळ धडपड केल्यावर कोणीच दार उघडत नाही. कुत्रा दोन्ही दरवाज्यांच्या मधे उदासपणे बसतो. आता कुत्र्याचे डोळे पाणावले आहेत. मोठा पॉज

कट टू      

घराचा हॉल: सकाळ , 09.30-10.00

मुलीच्या रूमचा दरवाजा उघडतो. मुलगी ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन तडक रुमच्या बाहेर येते,हॉल मधे येऊन गाडीची किल्ली उचलते, सँडल घालते, कुत्रा तिच्या मागे पुढे धावतो आहे. मुलगी थोडी चिडलेली,रडून झालं आहे असा चेहरा. ती हॉलचा दरवाजा उघडते आणि बाहेरून आदळते . कुत्रा तिला सारखा फॉलो करत असल्यामुळे दरवाजा कुत्र्याच्या नाकाजवळ बंद होतो. मुलगी ऑफिसल निघून गेली आहे. संपूर्ण घरात भयाण शांतता. कुत्रा केविलवाना आवाज करत मुलाच्या बंद दरवाजा वर पंजे मारत आहे. घरात इकडून तिकडे उदासपणे फिरत आहे. काही वेळाने मुलगा दरवाज उघडून बाहेर येतो. मुलगी घरात नाही हे पाहतो. ती खरच ऑफिसला गेली आहे का याची शहानिशा करतो. कुत्रा त्याला सारखा फॉलो करत आहे. कुत्र्याला मुलाने प्रेमाने जवळ घ्यावे या साठी त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मुलगा मूड ऑफ होऊन सोफ्यावर बसला आहे. कुत्रा त्याच्या अंगावर बसून प्रेमाने मुलाची समजूत काढत आहे.त्याला माया माया करत आहे. मुलगा टॉमीला समोर बसवून दोन्ही हातात कुत्र्याचे कान गाल धरून डोळ्यात डोळे घालून त्याला विचारतो..

मुलगा

हम बने तुम बने एक दुजे के लीये.....ना घर के ना घाट के...बोल टॉम्या काय करायचं मग...?

तेवढ्यात दारावरची बेल वाजते. मुलगी परत घरी आली असेल या आवेशात मुलगा दाराकडे धावतो,कुत्रा सुद्धा सोबत मुख्य दाराकडे धावतो. दारावर कुरीयर वाला आला आहे. मुलाने ऑनलाइन कुत्र्यासाठी काही वस्तु मागवलेल्या आहेत. जसं की, पेडिग्री,शॅम्पू,साबण त्या डिलीवर होतात. मुलगा त्या घेतो.डिलीवरी बॉय निघून गेला. हातातल्या वस्तु सांभाळत दरवाजा बंद करत..

 

मुलगा

येSSSSSS..तर टॉमीची शॉपिंग झाली आहे.. टॉमी चा साबन, शॅम्पू...पेडिग्री......डू यू लाइक इट? आता टॉमी आंघोळ करणार...अबे कुठे पळतो बे..थांब...(तोंड वेंगाडून )वास येतो तुझा टॉमी वास....

 

 

टाइम लाप्स

पुढील तास दोन तासात गोष्टी क्रमाने घडत आहेत ,वेळ जात आहे, काही गोष्टी प्रसन्न म्यूजिक सोबत या काळात घडणे अपेक्षित. उद्देश हाच की कुत्रा मुलासोबत आणि मुलगा कुत्र्यासोबत कानेक्ट होत आहे. मुलासाठी ‘कुत्ता’ आता ‘टॉमी’ झाला आहे....घरातलं काही वेळा पूर्वीच टेन्स वातावरण एका पाळीव प्राण्यामुळे किती चटकन आनंदी झालं हे दाखवणे अपेक्षित..  

ए) कुत्र्याला आंघोळ घालणे प्रसंग

ब) कुत्र्याला पुसणे,तो कसा घरभर धावतो,धिंगाणा करतो, त्या सोबत मुलगा सुद्धा एंजॉय करतो आहे.

सी) कुत्र्यासोबत खेळताना घरभर पसरा होत आहे हे प्रमुखपणे दाखवणे.

द) कुत्र्याला वस्तु ओळखायला लावण्याचा खेळ अपघाताने लक्षात येणे. आणि टॉमी वस्तु लक्षात ठेऊन लगेच ओळखू शकतो, आणून देवू शकतो या त्याच्या सीक्रेट अबिलीटी चा मुलाला शोध लागतो. त्यामुळे मुलगा अजून आनंदित होतो प्रसंग. हा प्रसंग रंगवताना एक वस्तु ‘पेन ड्राइव असावी’

 (लिंक पहा: खेळ या पद्धतीने शिकवला जाणे अपेक्षित : )

ई) कुत्रा आणि मुलगा घर भर आनंदात खेळत आहेत पण पसारा सुद्धा करत आहेत या साठी उपलब्ध जागा आणि वस्तु या नुसार रंगवणे.  

कट टू      

घराचा हॉल: दुपार , 02.30-3.00

घरभर अजून पसरा झालेला आहे. एकमेकांसोबत खूप खेळून झाल्यामुळे थकून मुलगा आणि कुत्रा एकमेकांना बिलगून सोफ्यावर बसून टीव्हीवर कार्टून बघत आहेत. हा एपिसोड दिसत आहे हे अपेक्षित:

   दारावरची बेल वाजते जोर जोरात वाजायला सुरवात होते .मुलगा आणि कुत्रा दचकून दाराकडे येतात. दार उघडल्यावर मुलगी प्रचंड संतापाने दारातूनच ओरडत येते.......

मुलगी

दिनेश हॅव यू लॉस्ट यॉर माइंड...इडियट आय कॉल्ड यू थाऊजंड टाइम्स....आणि घराची काय अवस्था केलीयेस तू? ओह नो....ओह नो...

मुलगा

तू इतक्या लवकर घरी कशी काय आलीस? आणि फोन....फोन कधी केलास?

मुलगी संतापाने घर भर झालेला पसारा पाहत फिरत आहे...मुलगा फोन चेक करतो...त्यावर मुलीचे खूप फोन येऊन गेलेले असतात...पण फोन रात्रीपासून सायलेंट वरच असतो आणि कुत्र्या सोबत देहभान विसरून खेळण्यात दिवस गेलेला आहे..मुलाला गिल्ट...मुलगी संतापलेली..ती घरभर वस्तु आवरत आवरत.....राग राग करत...तोंडाने सारखं पुटपुटत काही तरी शोधत आहे..कुत्रा आता प्रेमाने मुलीच्या जवळपास घुटमळत आहे....मुलगा तिची समजूत काढत आहे.इथे तो तिच्याशी भांडण न करता समजूतदार पने वागत आहे असा मुलात झालेला बदल दाखवणे अपेक्षित...मुलीचा संताप वाढतच आहे...ती सारखी बडबड करत..काहीतरी शोधत आहे...

मुलगा

बेबी सांग तर खरं काय झालय? आणि येवढे फोन का करत होतीस तू?

मुलगी

जस्ट शाट-आप...

 

मुलगा

आगं बाई माझा फोन काल रात्री पासून सायलेंट वरच आहे...तुझा फोन मला ऐकुच आला नाही...

मुलगी

शाट-आप... शाट-आप...लिव मी आलोन....आय एम फेडअप विथ दिस रिलेशन शिप....तुझ्या ह्या बेजवाबदार वागण्याचा मला खरच खूप कंटाळा आलाय...एक तर माझ्या वाढदिवसाची माती केलीस...आणि काय आहे हे ..जस्ट ...थ्रो इट अवे

मुलीने काल रात्री तिच्यासाठी आणलेला बुके हाताशी आल्यामुळे त्या बुकेला थ्रो इट अवे असं म्हंटलेल आहे..ती मुलाशी भांडतच आहे...थ्रो इट अवे असे शब्द एकल्या बरोबर कुत्रा जागीच थबकतो...... थ्रो इट अवे हे शब्द ऐकल्याबरोबर कुत्र्याला एकदम कार मधला प्रसंग, कार लांब जात असल्याचा प्रसंग, त्या सडक छाप कुत्र्यांचं गुरगुरणं, त्याला रस्त्यावर एकटा सोडून गेल्याचा ट्रोमा ..हे सर्व समोर घडत असलेल्या प्रसंगासोबत आठवायला लागतं.....आता कुत्रा जागीच थबकून उभा आहे, घाबरला आहे, कारणं त्याला आता असं वाटत आहे की पुन्हा त्याच्या सोबत तेच घडणार....तेवढ्यात मुलगी त्याच्या समोरच्या बिन बॅग वर हतबल होऊन बसते आणि ओक्साबोक्षी रडू लागते. मुलगा लगेच येऊन तिला सावरतो...

मुलगा

बरं बाबा..मी चुकलो...सगळी माझी चूक आहे...पण आता शांत हो..रडू नकोस ...काय झाल आहे मला सांगशील का प्लीझ...काय शोधतीएस तू...काय हरवलय?..

मुलगी

(रडत रडत)दिनेश!! आय वेंट टू द ऑफिस विदाउट माय पेन ड्राइव... काल मी घरी काम घेऊन आले होते कारण आज सुट्टी घेता येईल...आपल्याला दिवसभर एंजॉय करता येईल... काल संध्याकाळीच मी काम संपवून टाकलं... आणि डाटा पेन ड्राइववर सेव केला होता...मला आज सकाळी तो अपलोड करायचा होता...पण आज सकाळी आपल भांडण झालं.. मी तशीच ऑफिसला निघून गेले.. तू मला पेन ड्राइव आणून देशील म्हणून मी तुला सारखा फोन करत होते... आज माझा वाढदिवस होता म्हणून बॉसनी मला जीवंत सोडलं...मी त्यांना कन्व्हिंस केलं की काम झालाय, लगेच घरी जाऊन डाटा अपलोड करते...पण आता पेन ड्राइव सापडत नाहीये...कुठेच सापडत नाहीये.. आय विल बी फायर्ड..... व्हेर द हेल पेन ड्राइव इज...

 

पेन ड्राइव.. पेन ड्राइव.. हे शब्द ऐकल्या बरोबर कुत्रा एकदम पळत जातो....थोड्या वेळापूर्वी खेळताना त्याला पेन ड्राइव कशाला म्हणतात हे माहीत झालेल असतं...तो धावत जाऊन...तो पेन ड्राइव मुलीकडे घेऊन येतो... कुत्र्याचा हा समजूतदारपणा पाहून मुलगा मुलगी दोघ सुद्धा त्याला बिलगतात......कुत्रा मुलीचे लाड करतो...फेड आऊट होता होता होता...आज दिवसभर मुलगा आणि कुत्रा यांनी कशी मजा केली., कुत्रा किती हुशार आहे... या बाबतच वर्णन... प्रेमाचे संवाद....शेवटी हे कन्फर्म दाखवायचं की कुत्रा आता या घरातून निश्चित पणे जाणार नाही.



Rate this content
Log in

More marathi story from shree sutawane