Hitesh Shrungare

Others

4  

Hitesh Shrungare

Others

फोटोशूट-एक कथा

फोटोशूट-एक कथा

2 mins
205


मुलाने तारुण्यात प्रवेश केला की वेगवेगळ्या फर्माईश मनातून जाग्या होतात,तरुणाई स्वतःलाच आयडल समजते,स्वतःच्या चालण्या बोलण्याचे परीक्षण स्वतःच करून उणीवा भरून काढतात. स्वतःचे सौंदर्य जपण्यासाठी हवे नको ते सर्व उपाय तरुणाई करते,ग्रामीण भागातून जिल्ह्यातील ठिकाणी शिकायला गेलेल्या तरुणांची कहाणी काही अशीच असते त्यातला मीही एक, प्रथमच जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घ्यायला गेलो होतो. सोसिएल माध्यमामध्ये व्हाट्सअप्प ,फेसबुक अधिकतम वापरल्या जायचे पण तिकडे गेल्यावर कळले कॉलेजेस मध्ये युवा मध्ये वापरण्यात येणारा अँप म्हणजे इन्स्टाग्राम.

मोबाइल मध्ये अस्तित्वात नसणारा इन्स्टाग्राम इंस्टॉल झालं .पण आम्ही अपलोड केलेल्या फोटोत काही अधिक मजा नव्हती. ८ महिने लोटले सुट्ट्या लागल्या सगळे मित्र गावी आले. इन्स्टाग्राम होत पण अपलोड करायला फोटो नव्हते. सर्व मित्राच्या सहमतीने ठरले फोटोशूट ला जायचे ,फारसा संपर्क नसलेला फोटोशूट शब्द अनुभवण्यास मिळण्याची संधी निर्माण झाली. भाड्याने घेतलेला कॅमेरा घेऊन तालुक्याच्या ठिकाणावरून मित्राच्या गावी गेलो, दुपारचे ३ वाजले असावेत उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने तप्त ऊन होती या तापत्या उन्हामध्ये तोंडाला गमछा बांधून आम्ही पहिल्या मित्राच्या गावी पोहचलो ,आम्ही दोन टू व्हीलर वर चार जण व तेथील मित्राची आर वन फाईव्ह मित्र खेड्यातला होता पण श्रीमंत होता. नुकतीच घेतलेल्या गाडी सोबत अनेक फोटो कॅमेऱ्यात काढण्याची संधी मिळाली. तेथून दुसऱ्या गावात गेलो मित्राच्या घरी त्याच्या स्वताच्या शेतात आंब्याचे ६ झाड होते. झाडांचे आंबे सकाळीच उतरवले असा तो म्हणाला. मीठ व कच्च्या गावरान आंब्याचा आस्वाद घेतला शरबत झाले . जवळपास ५.३० वाजले आणि खरी फोटोशूट ला सुरवात झाली. गावात धरण असल्यामुळे फोटोशूट साठी धरण निवडले. भल्या मोठ्या प्रमाणावर वर असणारे धरणाचे पाणी कॅमेराचा आकर्षित करत होते. संपूर्ण परिसर हिरवळ होता ,पाण्याच्या क्षाराने पांढरी झालेली दगड फोटो काढण्यासाठी खुणावत होती .तिथूनच फोटो काढण्याची सुरवात झाली .आम्ही सगळे ९ जण होतो बारीबारीने सगळे जण फोटो काढू लागलो फोटो काढता काढता लक्ष गेलं एका पाण्याच्या भागात एक सुंदर मोर तिथे पाणी प्यायला आला होता.आयुष्यात प्रथमच मोर प्रत्यक्षात पाहत होता .मोर उभा होता तो पर्यंत त्याची अनेक छायाचित्र काढली. मन मोहून टाकणारी दृश्य घडली. मनाची श्रीमंतीच झाली खूप खुश झालो मावळत्या सुर्याबरोबर अनेक फोटो काढली.धरणाच्या काठावर विहीर होती त्यावर अप्रतिम लोखंडी किनार होतो .त्या बरोबरही अनेक फोटो काढलेत.मग घराच्या रस्त्याने निघालो ओलितांच्या शेतीचा थंडावा आकर्षित करणारा असा झाला हा फोटोशूट, शहरातील ट्रेंड खेड्यागावत घडलं मित्रही खुश झाले होते आता इन्स्टाग्राम वर टाकायला सर्वांकडे चांगल्या पोज मध्ये फोटो उपलब्ध झाले ,मोराचे दर्शन झाले ,हायब्रीड च्या काळात गावरान कच्चा आंबा खायला मिळाला हे सगळं एका फोटोशूट च्या निमित्ताने घडलं,प्रत्येकच जीवन आठवणी ने भरून असते त्यातलाच आमचा पार पडलेला फोटोशूट,नावच मात्र फोटोशूट होतं खरंतर याच लहान ,लहान प्रसंगाने निमित्ताने मैत्री पक्की होते हे हि तेवढचं सत्य. म्हणून असं प्रत्येकाच्या जीवनात घडणे आवश्यक आहे कारण म्हातारपणाचे दिवस मनुष्य आठवणीत घालतो ,आणि उर्वरित जीवन आठवणीत घालवण्या साठी आठवणी असाव्या लागतात.


Rate this content
Log in