ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
30
का रे असा छळतोस मला
तुझ्या प्रतीक्षेत मी बसलेय ना,
ओढ मला तुझी लागलेय
आता घडी मिलनाची आलेय ना.
तुझ्या रिमझिम धारेत
मला चिंब चिंब भिजू दे ना,
तुझ्या त्या अवखळ सरी
माझ्या अंगावर झेलू दे ना.
आतुरले रे तुझ्या त्या
मनमोहक गार गार स्पर्शाला,
तुला सामावून रे माझ्यात
देते गंध मातीचा रे जगाला.
पशु पक्षी प्राणी सृष्टी
तुझ्या ओढीत रे थांबले,
तहान त्यांची शमव तूच आता
डोळे त्यांचे तूझ्या वाटेकडे लागले.
झाली नांगरणी पेरणी
बीज धरतीत पडलं,
तुझ्या विन सांग मजला
बीज कसं रे उबवेल.
बीज अंकुरेल छान
येईल उगवून सुंदर,
जर होतील तुझे उपकार
तर धान्य मिळेल भरपूर.
ओढ पावसाची साऱ्या
आज लागली जगाला,
तुझ्या आगमनाचे दान
दे रे आज तू जगाला.