Trupti Naware

Others

3.8  

Trupti Naware

Others

नियती

नियती

7 mins
399


संध्याकाळचे साडेसहा वाजले . नंदिनी दिवेलागण करून तिच नेहमीच भजन गात बसली होती. तितक्यात श्रीधरच्या गाडीचा हॉर्न वाजला. नंदिनी दचकून उठली . गेट समोर बघत विचार करू लागली . आज श्रीधर इतक्या लवकर घरी..? तोच ड्रायव्हरने श्रीधरला खांद्यावर धरत धरत आत आणले .


“श्रीधर काय झाले ..?” नंदिनी धावत सुटली . तोच श्रीधरने तिला धक्का मारून दुर् लोटले . नंदिनीचे डोके एका मोठ्या कुंडीवर जाऊन आदळले . ड्राइव्हरला काहीच कळत नव्हते. साहेबांना सांभाळावे की बाईंना धीर द्यावा. नंदिनीने ड्रायव्हरला हातानेच इशारा करीत आत नेण्यास सांगितले . आपल्याच जखमेवर आपल्या हाताने हळदीचा लेप लावत .. नंदिनी नशिबाला दोष देत रडू लागली. आता हे रोजचेच झाले होते . नंदिनी आणि श्रीधरच्या लग्नाला चार वर्षे लोटली होती. पण श्रीधरच्या रोजच्या व्यसनामुळे आणि रोजरोजच्या वादामुळे संसाराची परिभाषाच तिच्यासाठी बदलून गेली होती . पदरी मुलाच सुख नसल्यामुळे श्रीधरने नंदिनीला त्रास द्यायला सुरवात केली . तिला स्वतःपासून खूप दुर् लोटले . पण अति दारू प्यायल्यामुळे श्रीधरची प्राणज्योत मावळली . श्रीधर उच्चशिक्षित आणि सरकारी कार्यक्षेत्रात चांगल्या पदावर होता. नंदिनीच्या वाट्याला मात्र संसारसुख नसल्याने कमी वयातच तिचे वैधव्याचे रूप तिला बघावयास मिळाले .


नंदिनीचे आईवडील तिच्या लहानपणीच वारले होते. तिचा मोठा भाऊ मकरंद यानेच तिचा सांभाळ करून श्रीधरशी तिचे लग्न लावून दिले होते.पण स्वतः च्या व्यवसायात फारच व्यस्त असल्यामुळे तो ही तिला फारसा भेटत नसे. श्रीधर सोबत अगदी कॉलेजपासून सोबत असणारा त्याचा मित्र सागर उपाध्याय ,एकमेव तोच आता नंदिनीला आधार म्हणून दिसत होता.वेळोवेळी ती त्याचीच मदत घेत राहिली. एक दिवस श्रीधरच्या काही फाइल्सवर नंदिनीच्या सह्या घेण्याकरिता म्हणून तो घरी आला .तेव्हा चहा घेताना काही निवांत गप्पानंतर सागर तिला म्हणाला, “श्रीधरने तुमची फार प्रतारणा केली . खर तर त्याच्या बुद्धीचा ,यशाचा त्याने कधीच चांगला वापर केला नाही .. आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या वाट्याला आलेत.” तो पुढे बोलणारच तेवढ्यात नंदिनी उत्तरली, ‘ नाही सागर साहेब ,श्रीधरने माझ्यासोबत काहीच वाईट नाही केल आणि तो जाण्यानेही माझ्यासोबत काहीच वाईट झाल नाही . खरं तर तो सोबत असताना मी जगतच नव्हते पण आता मी जगणार आहे . अहो मला तर पंख फुटल्यासारख वाटतय. गेल्या चार वर्षात जय गोष्टींना मी मुकले होते ते सर्व आता मी करणार आहे . मी फुलपाखरासारख उडणार आहे बेधुंद .. ! अगदी प्रत्येक रंगाच्या फुलांवर बसून त्याचा आस्वाद घेणार आहे. आस म्हणत स्वतःभोवती गिरक्या घेत राहिली . सागर तिला नखशिखांत बघत राहिला . 


त्यानंतर त्यांच्या वारंवार भेटी होत राहिल्या . त्यांच्या भेटीतून नंदिनीच्या हरवलेल्या दिवसातल्या बऱ्याचश्या जखमा भरून निघाल्या .सागरच्या रूपाने तिला एक खूप चांगला मित्र मिळाला होता. सागर मात्र नंदिनीत वेगळ्याच पद्धतीने गुंतत चालला होता . मैत्रीच रूपांतर कधी प्रेमात झाल त्याला देखील कळल नाही . काहीच दिवसात मकरंदने तिच्या भावाने एका बंगाली मुलीशी लग्न केल्याची बातमी त्याने नंदिनीला फोनवर दिली. नंदिनीने त्याच अभिनंदन केल. लग्नाची पार्टी अगदी दोनच दिवसांवर होती . नंदिनीने सागरलाही तिच्या सोबत येण्याचा आग्रह केला . गेल्या चार वर्षापासून कुठल्याही समारंभातही ती सहभागी झाली नव्हती . पण आज सागर सोबत जायचय या कल्पनेनेच कदाचित खूप उत्साहात तयार झाली . कपाटातली अगदी लाल भडक रंगाची साडी तिने निवडली. सागरनेही आज नंदिनीला कुठल्याही परिणामाचा विचार न करता लग्नाची मागणी घालण्याचे ठरवले .


समारंभ आटोपला . जेवण झाली . दोघांनीही मकरंदचा निरोप घेतला . गाडीत परत येताना सागरने मध्येच गाडी थांबवली . त्याने नंदिनीला लग्नासाठी विचारले . नंदिनीला सागरच्या वागण्या बोलण्यातून त्याच्याविषयी फार आपुलकी वाटत होती . पण ती लगेच निर्णय घेऊ शकली नाही.

“मला थोडा वेळ द्या .. मी विचार करून बोलते तुमच्याशी . खर तर .. श्रीधर गेल्यापासून लग्न म्हणजे अगदी तुरुंग वाटतो मला . पुन्हा त्या बंधनात अडकायच म्हणजे ..??” तेव्हा सागर म्हणाला ,”नंदिनी तुमचा लग्नावरचा अविश्वास योग्यच आहे . पण सगळीच माणस सारखी नसतात . माणसांवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका .” नंदिनी अगदी सुन्न झाली ,,,,, भांबावलेल्या स्वरात म्हणाली ,मला घरी सोडा आधी ..’


सागरलाही आपण नंदिनीला कुठेतरी दुखावले असे वाटत राहिले . ती काय उत्तर देणार या विचाराने रात्रभर त्याला झोप देखील आली नाही . नंदिनी घरी पोहचल्याबरोबर फोनची रिंग वाजली . फोन मकरंदचा होता . “ काय नंदू ..!! सागर उपाध्याय सोबत आलीस अगदी मेड फॉर ईच अदर दिसत होता दोघेही . अरे मी चांगलं ओळखतो त्याला . खूप श्रीमंत घराण्यातला आहे आणि हुशार पण . मुद्दामच बोललो नाही तुला . पण आता तू म्हणत असशील तर बोलतो त्याच्याशी”


“ अरे ,काय हे दादा . तुला वाटत आहे तस काही नाही आहे . एका वाईट लग्नाचा अनुभव पुरेसा आहे मला . त्याच्यासोबत माझी फक्त मैत्री आहे .. कळल ? लग्न एन्जॉय कर तुझ.. बाय !”. नंदिनीला मकरंदशी खोट बोलता आल पण तिच्या मनाला ती समजाऊ शकली नाही . तब्बल दहा दिवसांनंतर नंदिनीने सागरला घरी बोलावले . नंदिनीला सागर आवडत होता हे निश्चितच होत . फक्त निर्णय चुकू नये याची तिला भीती वाटत होती. “ सागर साहेब , विश्वास माणसांवर लवकर ठेवता येतो फक्त तो समोरच्याला टिकवता आला पाहिजे .गेले दहा दिवस मी तुमचाच विचार करत होते तुम्हाला नकार देण्यापासून मी स्वतःला रोखूच शकले नाही . बघूया नियतीने यापुढे माझ्यासमोर काय मांडलय ते” चहाचा कप सागर समोर नेत नंदिनी बऱ्याच वेळची बोलत होती . पण सागर मात्र आज काहीच बोलत नव्हता . तो एका वेगळ्याच मनस्थितीत होता . एका अपराध्यासारख तिच्याकडे बघत राहिला . पण त्याच्या घरी घडलेला प्रकार तिला सांगणेही गरजेचे होते . “ नंदिनी ,मला तुम्हाला काही सांगायचे आहे ..”


नंदिनी लाजत म्हणाली “,सांगा ना .. तुमचच ऐकायच आहे आता मला’’ तेव्हा सागरने त्याची लग्नपत्रिका तिच्यासमोर दाखवत “ माझ लग्न ठरलय नंदिनी ,माझ्या घरच्यांना एका विधवेशी लग्न मान्य नाही . मी त्यांची समजूत काढण्यास फार कमी पडलो . झाला प्रकार पाहून माझ्या आईला माईल्ड हार्ट अटॅक आलाय तिची प्रकृती सांभाळणे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे . तेव्हा त्यांनी निवडलेल्या मुलीशी लग्न करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे मार्गच उरला नाही . दोन दिवसानंतर माझे लग्न आहे . पण.... तुमच्याविषयीचे प्रेम कदाचित मी आयुष्यभर विसरू शकणार नाही . आता ... या क्षणी मी तुम्हाला माफी मागण्याशिवाय काहीही करू शकत नाही ..???” सागर अगदी दोन्ही हात जोडून नंदिनीपुढे शांत उभा राहीला.


या वेळेला नंदिनी सागरशी नजर मिळवू शकली नाही .त्याच्यापुढे पाठमोरी उभी राहून,”या तुम्ही सागर साहेब ! झाला तेवढा अपमान पुरेसा आहे माझा.माझ्या तोंडून काही अपशब्द वापरुन मला तुमचा अपमान करायचा नाही आहे आणि तसंही माणसाच्या आयुष्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो तो विश्वास जो तुम्ही तोडलाय ,यापुढे मला भेटू नका ,,,बस एवढीच इच्छा आहे . निघा तुम्ही’’ नंदिनी शांतपणे तिथून निघून जाते .


बरेच दिवस लोटले . नंदिनीला श्रीधरच्या जाग्यावर नोकरी मिळाली .मकरंदला तिच्या भावाला मुलगा होतो . तीच त्याच नामकरण “कृष्णा” अस करते . पण एका क्षुल्लक कारणावरून वाद घालून मकरंदची बायको त्याला कायमची सोडून जाते .अवघ्या सहा महिन्याच्या कृष्णाला नंदिनी खूप जपते ,त्याचा अगदी पोटच्या मुलासारखा सांभाळ करते. तोही जसजसा मोठा होतो तिला आत्या म्हणण्याएवजी आईच म्हणतो . नोकरी सांभाळून नंदिनी कृष्णाला जिवापाड जपते .बरीच वर्षे लोटली . आज अचानक स्पीड पोस्ट ने एक धक्कादायक पत्र तिला मिळाल . श्रीधरच्या कुठल्या तरी प्रॉपर्टी चे कागदपत्र व पन्नास लाखांचा चेक त्यात असतो . तिला खूप आश्चर्य वाटत ,,याबद्दल श्रीधरणे तिला पूर्वी सांगितलेले नव्हते . ती तो चेक देवघरात ठेवते आणि कृष्णासाठी प्रार्थना करते आज त्याचा बारावीचा निकाल आहे. अगदी साधी सरळ ,सुंदर वर्णाची नंदिनी आज तब्बल अठरा वर्षानंतरही तशीच तरुण दिसतेय. फुलपाखरासारख आयुष्य जगण्याची इच्छा असणारी नंदिनी.. एकाच ठिकाणी देठावर फुलणाऱ्या फुलासारखी झाली . कपाटातल्या जुन्या साड्यांवरुण हात फिरवताना लाल साडी बघून सागरची खूप आठवण झाली . खर ती त्याला कधी विसरलीच नव्हती . तोच कृष्णा ओरडत येतो आणि तिला बिलगत महणतो ,”आई !! 89 % मिळालेत मला ,,हे काय आनंदाश्रू आधीच डोळ्यात तयार ठेवलेस तू”. नंदिनी त्याच कौतुक करत डोळे पुसते. पण तिच्या ओघळणाऱ्या अश्रुंच कारण ती स्वतः लाही सांगू शकत नाही .


आज कृष्णाच्या ईंजीनीयरिंग कॉलेजच्या अॅडमिशनचा दिवस . नंदिनीने सुटी घेतली . दोघेही कॉलेजला गेले . कृष्णाला घेऊन ती कॉलेजच्या प्रवेश द्वाराजवळ गाडीतून उतरते ,,,,तोच तिच्या डोळ्यासमोर डोळ्यांवर काळ्या फ्रेमचा चश्मा चढवलेला ,काळजीने ग्रासलेला ,व वयाने थकलेला “सागर” दिसला . अगदी तळमळीने तो तिच्याशी बोलण्यासाठी समोर आला . नंदिनी बद्दलच प्रेम त्याच्या डोळ्यात अजूनही तसच जीवंत होत . पण नंदिनी मात्र बदलली होती . ती त्याला टाळते. पण तरीही सागर तिला एकांतात गाठतो. “नंदिनी ,चुकलो मी . माफ कर मला . मी फक्त स्वतःचा विचार केला. तुला नकार दिल्यानंतर मी जेव्हा घरी परतलो तेव्हा माझी आई मला कायमच सोडून निघून गेली होती. मी माझ ठरलेल लग्नही त्यानंतर मोडल. पुन्हा तुझ्या नजरेसमोर यायची हिम्मत झाली नाही . मी हे शहर ,नोकरी सोडून इथून कायमचा निघून गेलो . आज या कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा माझा दुसराच दिवस . तुझा विश्वास पुन्हा जपण्याची ही संधि असावी अस मी समजतो “.

“नाही सागर साहेब , आता फार उशीर झालाय . मला राधा होता आल नाही ,,,,मीरा होता आल नाही पण आता मला देवकी होऊन जगायच आहे . please आता मला कशाचीच गरज नाही .. आणि हेच नियतीच्या मनात होत .. येते मी” सागरपुढे हात जोडून भरल्या डोळ्यांनी नंदिनी कृष्णाला घेऊन तिथून निघून जाते .

यावेळेला सागर तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहत त्याच्या “नियतीचा” विचार करतो .        


Rate this content
Log in

More marathi story from Trupti Naware