Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Rajesh Pol

Others

3  

Rajesh Pol

Others

मुंगी साखरेचा रवा

मुंगी साखरेचा रवा

2 mins
237


कभी मै ना रहू यादे जरूस छोड जाऊंगा...

मर जाऊ तो मिलूंगा नाही  

पर याद जरूर आऊंगा ।

  

बालपण आठवण, 

अनुभव न विसरता येणारे, बरच काहि शिकवणारे


मुंगी साखरेचा रवा


कच्च्या पक्क्या चामड्याच्या साली हिरड्याचा वास असणाऱ्या ढोर वस्तीमधील बालपण गोट्या, पतंग,विटी-दांडू ,भोवरा , खराब सायकलचे टायर एका क‍ाठीन बडवत बडवत गावभर बोंबलत फिरण असे अणेक उंडगे समजले जाणारे खेळ खेळणारी उनाड पोर. 

मनपा शाळेचा गणवेश डोक्यावर गांधी टोपी, ढुंगणावर नक्षीदार ठिगळ जोड केलेली खाकी हाफ पॅंट असणाऱ्या टवाळखोरा पोराचा आमचा ग्रुप .

ज्याच्याकडे जेवड्या गोटया तेवडा तो श्रीमंत असं आणि एवढंच आमच अर्थशास्त्र.

घरातून चा पिऊन एकदाच बाहेर पडलो की चामड्याच्या लोकरीच्या ढिगांवर उभ राहून याचा त्याचा गोळा केलेला तुटलेला मांजा जोडून जोडून साठवलेला जोडमांजा घ्यायचा आणि एक दोन रुपयांची पतंग आकाशात सोड्याची पतंगाच्या नादात जुनू दिवसभर आकाश संशोधन चालायच . एखादी पतंग कटली रे कटली मांजा पतंग लुटण्याच्या नादात. नागीच्या रानातून कचरा गू वाट्टेल ते तुडवत तोंड वर करून आम्ही कधी कधीजीवाची परवा न करता काट्याची कुंपण ओलांडून पलिकडेच प्रेम नगरच्या गल्ली बोळातून बोंबलत हिंडायचो.पतंग तर सोडाच पण हात भर मांजा मिळाला तर नशिब .

मी, दिन्या, युव-या,मदया. तस अमी एकमेकाना बा च्या नवानच 

हाक मारायचो .मला मला 

शंकर -या ,युव-याला सख्या तर मद्याला खंड्या तर दिन्याला शाम्या अस सहज आणि तितकयाच प्रेमान म्हणायचो.

ही मंडळी न चुकता रोज मला शाळेत घेउन जाण्यासाठी सकाळी उठून मला न्यायाला यायची.

मग रमत गमत प्रार्थना संपून गेल्यावर आम्ही शाळेत पोचायचो

ग्रहपाठ न केल्याने मास्तरचा मार खाऊन झाल्यावर मधल्या सुट्टीत पुन्हा शाळेच्या खिडकीतून दप्तर बाहेर टाकून कुणाच्या तरी शेतांमध्ये जाऊन ऊस ,द्राक्ष आंब्यास काय बाई चोरुन आनायचो आणि पुन्हा शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेत हजर असा आमचा शाळेतला दिनक्रम .एकदा सणवार उत्सव असला कि रेल्वे स्टेशन जवळच्या कॉलनीत घुसायचो कडिपत्ता तसा थोडा फारच लागतो पण आम्ही अक्ख झाडच ओरबडून आणायचो

सगळ्या मिरजेला पूरेल येवडा कडिपत्ता येता येता गावभर वाटून झाल्यावर थोडाफार कडीपत्ता घरी घेऊन जायचो .कधी कधी आमची टोळी मार्केटमधल्या रत्नाकर बुक स्टॉलमध्ये जायची युव-या पेन बघता बघता त्यातील चार पाच पेन गर्दीतून दुकानाच्या बाहेर फेकायचा दिन्या किंवा माद्या उचलू हळूच माझ्या खिशात घालायचे आणि मग मिरज स्कूलच्या कट्ट्यावर भेटायचो तीत पेनाची वाटनी करून कल्टी मारायचो. तसा चोरी हा उद्देश नसायचा पण तो त्या वयातला अल्लडपाना आम्ही चोरलेले पेन ही जगातील सर्वात मोठी चोरी होती. कारण या चोरीची शिक्षा हि तशी सुंदरच मला शिकायची ओढ लागली मी आजही विद्यार्थी आहे .त्यातला एक पेन अजूनही मी माझ्या जवळ जपून ठेवला आहे. तो पेन आठवून करून देतो चोरायचा असेल तर जगातील सर्वोत्तम चांगल चोर, आयुष्यभर स्वतःला आणि इतरांना तसे त्यानंतर अनेक पिढ्यांनाही पुरेल.


Rate this content
Log in