Minakshi Marotkar

Others

3.3  

Minakshi Marotkar

Others

मुलीचे शिक्षण

मुलीचे शिक्षण

2 mins
7


मुलीवर आधी घडलेले अत्याचार...आणि तिची सहन करण्याची...जिद्द खूप काही अत्याचार सहन करून...सुध्दा आजच्या जगात मुलीचे...स्थान त्यातुन एकच निघणारा...मार्ग मुलीचे शिक्षण...

   

या जगात असे अनेक लोक आहेत,की ज्यांना मुलगी नको आहे...पण काय गुन्हा हो या मुलीचा...असं काय केलं असेल तिने...जिचा जन्म होण्याअगोदरच...बघितलं जाते ती मुलगा आहे की...मुलगी,जीचा या जगात प्रवेश सुद्धा झाला नसतो...ती आईच्या उदरातच असते.तेव्हाच तिची हत्या केली जाते...गर्भपात केले जाते.

    

मुलगा आणि मुलगी यात काय फरक हो...मुलगाच असं आपल्याला काय देतो.जे मुलगी देऊ शकत नाही.शंभरातुन कीत्येकच मुलं असे आहेत की...आपल्या आई-वडीलां ची काळजी घेतात.अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या आई-वडीलांना सांभाळतात.आणि खूप मुले असे आहेत की आपल्या आई-वडीलांना घराबाहेर काढतात,वृध्दाश्रमात पाठवतात.

  

मुलाला वंशाचा दिवा मानतात मग स्वतःच्या मुलीला आपल्या उदरातून जन्म झालेल्या मुलीला दिव्यातील वात का नाही मानत...का ? ती मुलगी आहे म्हणून तिला जन्माला नाही येऊ देत...जो दिवा तुम्ही लावता...त्या मध्ये वातच नसली तर...तो दिवा लागेल तरी कसा...याचा विचार का हे लोक करत नाही.

   

आजच्या जगातील लोकांना हे सर्व नाही कळत...खूप वाईट वृत्तीचे लोक या जगात आहे.ज्या प्रकारे मुलाला जन्म देता... लहानाच मोठं करता...चांगलं शिक्षण त्या मुलाला तुम्ही देता...तसचं या आपल्या मुलीला जन्म देऊन...लहानाच मोठं करून...चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन...मोठं बनवलं तिला स्वतःच्या पायावर उभं केल तर...तुमचच नाव निघेल...पण ती मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला जन्मच नाही दिला तर कसं होणार ?.....

  

आजच्या युगात शिक्षणाला खूप महत्व आहे,ते पण मुलीच्या शिक्षणाला असं म्हटल्या जाते...मुलीचे शिक्षण हेच प्रगतिचे लक्षण...शिक्षण असणे प्रत्येक मानवाला आवश्यक आहे.म्हणून शिकवले तर...ते स्वतःमध्ये सुधार आणू शकते...इतरांमध्ये पण सुधार आणू शकते....कोण म्हणतात हो...मुली मुलांपेक्षा.. कमी आहे...आजच्या युगात मुलांपेक्षा मुली हुशार आहे समजुतदार आहे....


शिकवा मुलीला

 फुलाच्या कळीला

  शिकुन मोठं करेल

   तुम्हच्याच नावाला

       

    मुलीला शिकवले नाही तर...ते अशिक्षित बनते...तिला पुढे शिकण्याची संधी कमी मिळते...असे लोक जे मुलीला शिकवत नाही...ते स्वतःच कारण स्वतःच तयार करतात.त्या काळात होऊन गेलेली सावित्रीबाई जिच्यामुळे मुली शिकत आहे...हि सुद्धा मुलगीच होती...झाॅसीची राणि लक्ष्मीबाई ही सुद्धा कन्याच होती...अहील्याबाई होळकर ह्या तर मुलीच ना ह्या शिकल्या संघटीत झाल्या...सावित्रीबाईनी मुलीसाठी शाळा काढल्या...त्या वेळेस लोकांना मुलीचे शिक्षण मान्य नव्हते...मुलगीच नको होती,तरी सावित्रीबाईने मुलींची शाळा काढली...खूप अत्याचार सोसले...पण त्यांनी स्वतःची जिद्द सोडली नाही...प्रत्येक मुलगी तिच्याकडे शिकण्या करीता येऊ लागल्या...

  ज्या प्रमाने मुलाला वंशाचा दिवा मानतात त्याच प्रकारे...मुलगी पण वंशाचा दिवा आहे...अश्या कीतीतरी मुली होऊन गेल्या त्या शिकल्या आणि त्यांच नाव याच जगात काढलं जाते...किरण बेदी...कल्पना चावला...सुनिता विल्यम्स...या सर्व मुली होत्या यामध्ये मी जितके सांगितले त्यामधून एकच मुद्दा बाहेर काढा...आणि डोक्यात ठेवा...की खरचं मुलगी पण खूप काही करू शकते...स्वतःची प्रगती करू शकते...शिकलेली मुलगी घर पुढं नेई....


   लेक वाचवा भविष्य घडवा...


Rate this content
Log in