Dnyaneshwar Hogale

Others

3  

Dnyaneshwar Hogale

Others

मुक्तता गुलामगिरीतल्या मनाची

मुक्तता गुलामगिरीतल्या मनाची

3 mins
753


काही प्रमाणात मनातल्या मनात भावना निर्माण होत गेली आणि माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. काही गोष्टींची माहिती नव्हती तर काहीवेळा गोष्टींचा अर्थ साजेसा लागत नव्हता. पण तेच प्रसंग वारंवार घडणार आणि समोर येणारे ते बेअक्कल आणि स्वतःच स्वतःला दिलेली बिनबुडाची हुशारची पदवी असणाऱ्या माणसांपासून मला सतत मिळणारी ती अपमानाची झुळूक अलगद मनावर आणि डोक्यावर वरातीत दारू पिऊन नाचणाऱ्या खुळ्या लोकांसारखी थयथया नाचत होती. पण नंतर हहळूहळू माझ्याही लक्षात यायला लागलं की त्यांची हुशारी नाही तर त्यांचा पैसा आणि गर्व, बेडकुळीच्या शरीरासारखा टुणूक टुणूक उड्या मारत होता होता. पण त्यांना याचं भान राहिलं नव्हतं की ती उडी जी होती ती फक्त काही काळापूरतीच मर्यादित होती.


काही दिवसांनी माझा दिवस येणार होता हे मला ठाऊक नव्हतं, पण अखेर तो प्रकाशमय दिवस सूर्याबरोबर नवीन ऊर्जा जन्माला घालून उगवला. त्या दिवशी गावातल्या मंदिरावर काहीतरी गावहिताची चर्चा चालू होती. त्यातील काही मंडळी थोडंसं चुकीच्या पद्धतीने काही धोरणं गावकऱ्यांसमोर मांडत होती. तर काहीजण फक्त पोकळ बांबूसारखे मोठे पण पोकळ स्वप्नं गावकऱ्यांना सांगत होती. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतःचं मत मांडत होता. तेवढ्यात मग मीही एक गावातला छोटासा भाग म्हणून एक छोटंसं मत व्यक्त केलं. तेवढयात काही बहाद्दर मेंदू नसलेल्या लोकांनी आणि विचित्र मानसिकतेच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला बोल सुनावले. पण विशेष हे की मी जो विषय मांडला त्या मांडलेल्या मतावर जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त लोकांना विश्वास बसला आणि त्यांनाही तो योग्यही वाटला असावा असं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण त्या लोकांना स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्यात धन्यता वाटत होती. त्यातील एक जण तर मला बोलला ही, की तुला काय कळतंय रे तुझं काम कर आणि गप्प बसून राहा तुला काय मेंदू नाही अन् तू यात डोकं घालायला निघालास बेअक्कल कुठला, मूर्ख, अशा कित्येक असह्य शब्दात माझा अपमान केला. पण मला का काय माहीत पण त्या दिवशी मात्र असह्य गोष्टीचा भयंकर राग आला आणि मी त्याला स्वाभिमानाने उत्तर देत म्हणालो, हे तू नाही बोलत हा तुझा बेअक्कल आणि अविचारी बुद्धीचा घमंड बोलतोय पण तुझ्या या फालतू गोष्टींना आणि विचारांना काहीच किंमत नाही, आजपर्यंत गावकऱ्यांनी तुमच्या कुटुंबाच्या पारंपरिक गुलामगिरीतून मुक्त होऊन एक प्रश्न काय उपस्थित केला तर लगेच तुमची भाषाही उगरट होय लागली. आज तुला तुझ्या बावळट बुद्धीचा एवढा गर्व आहे तर विचार कर मला माझ्या सुज्ञान विचारशक्तीचा किती स्वाभिमान असेल. तुझ्याकडे धनसंपत्ती आहे म्हणून आजपर्यंत तुझ्या अस्तित्वावर बोललो नाही असं अजिबात नाही तुझी संपत्ती आणि तुला तर शुल्लक आणि फालतू गोष्ट मानतो. मग तू काय चीज आहेस तुला यासाठी बोलत नव्हतो की मला सवय नव्हती. फालतू लोकांच्या आणि मूर्ख विचारशक्तीच्या लोकांच्या तोंडी लागून स्वतःच्या अस्तित्वात बावळट विचारांचा संसर्ग लागून घेण्याची... आजचा दिवस लक्षात ठेव आणि वाट बघत राहा येणाऱ्या काळाची, दिसेल तुलाही त्यात मोहोर माझ्या अस्तित्वाची, आज तू माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या शब्दाला कमी समजतोस पण एक दिवस तुझ्या चेहऱ्याकडेही कुणी सर्वसामान्य माणूस लक्ष केंद्रित करणार नाही, अशी वेळ तुझ्यावर येईल पण त्या सर्वसामान्य लोकांचा त्यात गर्व नसेल तर तुला तुझी बिनबुडाची नाजूक आणि हरलेली क्षमता दाखवण्यासाठी केलेली छोटीशी क्रांती असेल कारण सर्वसामान्यांतून वर गेलेला माणूस कधीच स्वतःची पहिली पायरी विसरत नाही.


सगळीकडे शांतता पसरली. झाडाची पानेही शांत आणि दंग होऊन ऐकत होती, असं वातावरण निर्माण झालं. तिथे असणाऱ्या काही माणसांच्या चेहऱ्यावर अलगद हसू फुटलेलं दिसत होतं. कदाचित त्यांनाही वाटलं असेल इतक्या दिवसांचं आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण झालं असावं. नकळत त्या प्रसंगातून लोकांना अंतर्मनाची शांती मिळाली असावी, एक वास्तविक कथाच निर्माण झाल्यासारखे भास होत असतील नक्कीच.


Rate this content
Log in