Movie Critics
Movie Critics


न्यूड... एक सुरेख चित्र
एक कलाकृती... सुंदर कलाकृती. बरेच काही सांगून जाणारी पण अश्लीलतेचा लवलेश हि नसलेली. रवी जाधव द ग्रेट... इतक्या कमी वयात ही मजल सिम्पली अमेझिंग... JJचा भव्य कॅनवास त्यात खऱ्या अर्थाने माणूस म्हणून समोर येणारे लोक. कलेसाठी तडफड...शिकण्यासाठी निर्विकार बुद्धी.. त्यातही आपले माणूसपण जपणारे कलाकार..अव्यक्त प्रेम शेवटपर्यंत व्यक्त ना करता आपली मर्यादा जपणारी माणसे... वा... कुठेही हिंदी छाप मेलोड्रॅमॅटिक ना होणारा... आपले मराठीपण जपणारा ... गरिबीचे अवडंबर न करता कुठेही ना भरकटलेला..लांबण न लावलेला.. कुठून तरी डाउनलोड ना करता फक्त थेटरात जाऊन बघण्यासारखा... कसलेले कलाकार..मुंबई दाखवणारा काळ... प्रतीके दाखवल्याने जास्त वेळ न घेणारी पटकथा... तुमच्या चाकोरीबद्ध विचारसरणीला कुठेही भीक ना घालणारे हे सुबक चित्र...हे चित्र बघता बघता तुम्ही त्यात केव्हा स्वतःचे रंग भारत कळत नाही...माझ्या मनावर तर हलकेसे मोरपीस फिरवणारा कारण दाखवलेले JJ भावासोबत वीस एक वर्षांपूर्वी बघितले अगदी तसेच...सिम्पली नॉस्टॅल्जिक..वाह्ह..हा फक्त दोन तास का होता... किती समर्पण... किती टॅलेंट हॅट्स ऑफ तो रवी जाधव.. नंतर अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळतील पण खरा पुरस्कार मराठी माणसाने स्वतः जाऊन आनंद घेणे.. हॉलीवूड ची मारधाड आणि स्पेशल इफेक्ट्स बाजूला ठेवू आणि हे तरल चित्र मन लावून बघू..असले चित्र फक्त मराठी माणूस काढू शकतो का? इथे थोडा गर्व येतो पण खरे आहे ते...