STORYMIRROR

Manisha B

Others

2  

Manisha B

Others

मोहजाळ

मोहजाळ

1 min
24

खालील चित्राचे रहस्य खुप मार्मिक व आकलनीय आहे. चित्रातील हत्ती पूर्वजन्माचे कर्म आहे विहीरीतील साप भविष्यातील कर्म आहे, झाडाच्या फांद्या वर्तमान जीवन आहे पांढरा उंदीर दिवस आणि काळा उंदीर रात्र बनून फांदी कुरतडत आहेत, फांदीवर लटकलेले मधाचे पोळे सांसारिक मोहमाया आहे अश्या परिस्थितीत परमेश्वर मदतीचा हात पुढे करुन मनुष्याला वाचवू पाहात आहे पण मनुष्य पोळ्यातून गळणारे मध चाखण्यात इतका मग्न आहे की पुढे येणारे संकट परमेश्वराने पुढे केलेला मदतीचा हात या कडे त्याचे अजिबात लक्ष नाही.


तात्पर्य -- आजच्या युगात परमेश्वरसुद्धा मनुष्याची मदत करू इच्छित असेल तरीसुद्धा मनुष्य तिकडे लक्ष देत नाही.


Rate this content
Log in

More marathi story from Manisha B