मनाला टोचून गेलेली एक.......
मनाला टोचून गेलेली एक.......
आज नेहमी सारखी ट्रेन पकडली आणि डोअर सुद्धा भेटला… ट्रेन सुटायला १० मिनीट बाकी होते. काही लोकांची कामावर जायची घाई… कोणी गपा मारत उभे होते . माझ्या नजरा सगळीकडे फिरत असतानाच एक बाई तिच्या नवऱ्याला कि कोणाला माहित नाही पण ती कुठे तरी घेऊन चाली होती. कदाचित दवाखान्यात घेऊन चाली असावी…ती त्याला त्याला पकडून ब्रिज चढायचा प्रयत्न करत होती. पण त्याचात काहीच त्राण नव्हता. ती खूप प्रयत्न करूनहि त्याला एक हि पाऊल पुढे टाकता येत नव्हते.मी ते सर्व बघत होतो. मला वाटले फक्त मीच ते बघतोय का. म्हणून मी आजू बाजूला बघून खात्री करून घेतली तेव्हा लक्षात आले कि बरेचसे जन ते बघत होते.ती बाई खूप प्रयन्त करत होती पण तिच्या कडून तो माणूस जरा पण हालत नव्हता तसा तो माणूस असा जाड पण नव्हता आजार पाना मुळे तो खूप अक्षकत जाला होता. मी विचार करत होतो काय करू. जाऊन त्या माणसाला उचलून ती सागेल तिकडे नेउन ठेऊ कि काय करू. आणि आजूबाजूला बघत पण होतो कि कोणी तरी येईल आणि तिला मदत करेल.
तेवड्यात एक मुलगी तिकडे आली आणि ती त्या बाई (सारखे बाई बोलणे चागले नाही म्हणून काकू असेच उचार करतो ) मदत करू लागली. त्या दोघी मिळून त्या काकांना उचलू लागल्या. खूप बरे वाटले तेव्हा. चला कोणी तरी मदतीला तरी आले त्या काकूंच्या.पण काही क्षणात असे दिसून आले कि त्या दोघीमिळून पण त्या काकांना उचलू नाही शकल्या. आणि ती मुलगी निघून गेली. तेव्हा माजी परत निराशा झाली.
माझी नझर परत गर्दी मध्ये फिरू लागली कोण जाईल आता मदत करायला. तेव्हा माझेच मन मला सागू लागले लोकान कडून अपेक्षा करतोय मग स्वतः का नाही जात आहे.तरी सुधा मी त्या काकुना मदत करयला जाऊ नाही शकलो.
गाडी चालू झाली आणि मी तरी हि उतरू शकलो नाही. लोकांचा राग येण्या पेक्षा माझाच मला राग आला. आणि मनात येउन पण मी त्या काकूना मदत नाही करू शकलो….माणुसकीचा धर्म मला पाळता नाही आला याचा मला राग आला आणि लोकांकडून जी अपेक्षा आपण करतो ती पहिले आपल्या कडून करावी हेय सुधा मला समजले…।
आता इतकेच म्हणू शकेन कि त्या काकुना माहित होते खूप से लोक त्याची हि अवस्था बघत होतो …। काकू त्यातील मी पण एक होतो… जमल्यास माफ करा………।