मन मेंदू व भावना
मन मेंदू व भावना
मन आणि मेंदू नेहमी सोबत असतात पण काम मात्र नेहमी एकमेकाच्या विरुद्ध करतात. काही लोक मनाच ऐकतात, काही लोक मेंदू च ऐकतात. मी मात्र वेडा त्यांच्या मद्ये न्यायाचं पारडं घेऊन मानसिक व भावनिक वजन करत राहतो.
आधी मना सारखं वागायचो, मनासारखं जगायचो तेव्हा खऱ्या अर्थाने जगायचो आणि जगलो ही.....
अन् आता उशिरा सुचलेले शहाणपण म्हणजे
विचार करायला लागलो,
विचाराच्या दुनियेत रोज मरायला लागलो,
होय झुरतो मी,
नको नको ते विचार करतो मी,
आधी जगायचो
पण आता मरणाला सुद्धा भियाला लागलो मी,
मरणार तर सगळे नक्कीच एक दिवस पण जे माझ्यासाठी मेले त्यांच्यासाठी थोड जगायला लागलो मी,
अन् म्हणून विचार करायला लागलो मी.
आता सांगा पाहू,
कोणाचं कौतुक गाऊ,
मन आणि मेंदू दोघं सखे भाऊ.
पण गंमत अशी की ते लोक खूप आनंदी असतात
जे निर्णय स्वतः घेतात,
त्यावर अमल स्वतः करतात
योग्य अयोग्य स्वतः ठरवतात
स्वतःची पाठ मी कधी नाही पाहिली पण ते असे असतात
की स्वतःची पाठ स्वतः थोपटतात
कारणं नसताना हसतात
आनंदात रडतात
वेड्या सारख वागुन न ही बाजू सिद्ध करतात
खरच असे लोक खूप सुखी असतात.
आणि तो प्रवास
करावा तरी कोणा सोबत
कोणी रस्तात भेटत
कोणी स्वसत्यात भेटत
कोणी भुकटात भेटतं
कोणी कोणी तरी पैसे देऊन भेटत
भेटलेले सगळे आपले नसतात
सुखच देतील असे सापळे नसतात
मन जुळतील हो तुमचे पण भावना समजतील इतके सगळे हुशार नस्तात.
....म्हणून शेवटच्या क्षणापेक्षा प्रवास बरा. कधी वाटलच सगळ संपलं, तर भावनिक व मानसिक विचार करण्यापेक्षा, बस स्टँड वर जाऊन बघा, फूटपाथ वर जाऊन बघा, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मद्ये जाऊन बघा, अन् करा थोडी हिमत जा स्मशानात अन् तिथं बघा, आता विचार करा आपण निदान जिवंत तरी आहोत. काही नसते सगळ्या मोह माया आहेत, तुमचा मेंदू नेहमी तुम्हाला सांगत असतो की, "जगात सगळ्यात जास्त दुःख तुलाच आहे. तुला खूप टेन्शन आहे. अन् ते फक्त तू सहन करू शकतो तूझ्या जागी दुसरं कोणी असतं, तर आता पर्यंत मेल असत. तु आहे म्हणून जगत आहे. तू असाच प्रयत्न कर देव तूझी परिक्षा घेत आहे, पण एक दिवस तु नक्कीच यशस्वी होशील"
अस हे चालू असताना मन बोलायला लागतं,"अरे हट्ट! अस काहीच नाहीय आधी मला पण असच वाटायचं. पण जेव्हा पासून मी (मेंदू) तूझ्या बद्दल विचार करायला लागलो तेव्हा समजल की आपण सगळ्यात सुखी आहे. आपण जिवंत आहे, दोन वेळच पोटाला पोटभर भेटतं आहे अजून काय पाहिजे. कसलं सुख पाहीजे, काय कमी आहे, सगळ असून तु समाधानी नाहीस.
अशा वेळी उरते ते म्हणजे फक्त प्रेम अन् भावना व्यक्त करताना म्हणते,"माझ्याकडं सगळ असूनही मी तुझ्या विना भिकारी आहे. मला काहीच नको फक्त तू पाहिजे, तूझ्या शिवाय मला काही दिसत नाहीय, माझ सगळ काही तूच आहेस तु नाही तर मी नाही....." अशा भावना ऐकून दगडाला पण पाझर भुटेल, पण कदाचित तुम्हाला हे माहित नसते, की हे क्षणिक सुख आहे. प्रेम कधी प्रेमावर प्रेमासाठी होत नसते, त्यात एक मतलब असतो. आणि तो आपण समजून घ्यायला पाहिजे. इथे पण ते लोक येतात जे स्वतःचा मतलब कधीच मान्य करत नाहीत, आणि फक्त त्यांच्या प्रेमाचे पुरावे सादर करतात. अरे कसली ही फालतू गिरी.....
कदाचित तुम्हाला माहित नसेल प्रेम म्हणजे काय? ते कस होत असते? कोणावर होत असते? कोणावर करायला पाहिजे? हे काहीच माहीत नसते अन् थोबाड वर घेऊन निघता प्रेम करायला. खर तर मला पण त्या बद्दल फारस माहीत नाही. पण आता कमी वयात कळत न कळत झालं होत मला पण. असच तेव्हा मी हीच चूक केली, अन् त्याला प्रेम समजून बसलो, नंतर समजल प्रेमात पण सौदा होते, प्रेमात पण स्वार्थ असतो. अन् तेव्हा पासून मग अजूनपर्यंत तरी कधी प्रेम झाल नाही. ते म्हणतात न -
"प्यार दो बार थोड़ी होता,
प्यार दो बार थोड़ी होता है,
अगर हो
तो वो प्यार थोड़ी होता है"
यावरून समजते की प्रेम काय असते. हे बोलायचं म्हणून बोलत नाही. सोन्याची बारीक तार करून तिची कानात बाळी करून घालणं सोप दिसत, पण त्यासाठी त्यावरील सोनाराचे घाव कोणी बघीतलेले नसतात. उगच म्हणतं नाहीत अनुभवाचे बोल ढगा पेक्षा खोल. काही नसते दिनियेत कोणी कोणाच नाही. खर प्रेम तेच जे तुमची आई तुमच्यावर करते. आईच्या प्रेमा शिवाय दुसरं कोणताच प्रेम हे प्रेम नाही अस मला वाटते. सो आई वडिलांवर प्रेम करा. जीवनात स्वतःला कमी लेखू नका. नेहमी सकारात्मक विचार करा. कोणावर अवलंबून राहू नका. एखादी व्यक्ती, व्यसन, याची सवय लावून घेऊ नका. खर तर माणसाला कोणतीच सवय लागत नाही. पण आपण त्याबद्दल विचार सकारात्मक ठेवायला पाहिजे. नियमित व्यायाम करा, आपल्या आसपास स्वच्छता ठेवा, हसा आणि इतरांना हसवत रहा....
