!! ममत्व !!
!! ममत्व !!


मी बघीतलं ती आई तिच्या पोटी असणार्या लेकराला किती गोंजारत असते त्याचा अल्हडपणा ते लडखपण किती प्रेमाने आतुर होऊन पुर्ण करायचा प्रयत्न करत असते त्याच्याविषयी तिला जेवढे कोडकौतुक,आपुलकी असते त्याहून दुप्पट भरभरून प्रेम निःस्वार्थ ती आई देत असते सहजच काय लागले वा काय झालं तर तीचे ते ममत्वाचं काळीज डोळ्यांतून जेवढं वाहतं आतून ही ते काळीज तेवढंच चिरत जातं भलेही ते लेकरू पुढे चालून नका का जाण ठेवीना, परंतु ती मात्र तीचे मात्रत्व किंवा तिची पाण्याहुन निर्मळ असणारी माया कधीच मलिन होऊ देणार नाही जेवढे प्रेम, लळा ती लेकरांना देत असते त्यातला एक टक्काही त्या प्रेमाचा हिस्सा सरते शेवटी तिला मिळणार नसतो तरीपण ती हिरमुसत नाही आपलं ममत्व ती जपत राहते,
एक ठिकाणी हॉस्पिटल मध्ये मी पाहिले चाळीस ते पंच्चेचाळीस वयोगटातील एक मुलगा पाय मोढलेल्या अवस्थेत होता कदाचित अपघातांमध्ये, त्याला नीट बसता ही येत नव्हतं त्याची पत्नी बाजुलाच उभी पण...
ती, ती आई तिला बसवत नव्हत त्याचे हात दाबायचे मालीश करायची व्रद्ध झालेल्या त्या हातात बळ नसतांनाही त्याला अद्दर उचलत त्याच्या अंगाखाली अंथरूण टाकायची अगदी तसच जन्मल्यानंतर एखादी आई त्या बाळाचे पाय एका हाताने उचलत त्याच्या अंगाखाली बाळूतं किंवा लंगोटी बदलायची, खुप घालमेल होत होती तिच्या काळजाची कारण ते तेच लेकरु होत की ज्याच लहानपण तीने किती प्रेमाने गोंजारत गोंजारत आल्हाददायक जपलेलं असतं आणि आज या अवस्थेत बघताना तिला किती त्रास होत असेल
खरच खुप सुन्न झालो मी,
सलाम माझा त्या आईला तिच्या मात्रत्वाला
मुळात आई असतेच अशी की तिची जागा कोणी घेऊ शकत नाही
।। मनी तूझा ध्यास आई
रूप तुझे जसे विठाई
गायचीस जेंव्हा तु
माझ्यासाठी गोड अंगाई
डोळ्यापुढे उभी ती जशी मुक्ताई।।
खरच मित्रानों आई भूतलावर देव म्हणुनीच प्रत्येक घरात उभी आहे तिला आधार द्या ते प्रेम द्या जे तिने आपल्या लहानपणी आपल्याला निःस्वार्थ, निस्सीम दिलेलं असतं.