STORYMIRROR

Rajesh M Patil

Others

2  

Rajesh M Patil

Others

मित्र का असावेत

मित्र का असावेत

1 min
114

एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.

सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?

माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.

सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?

माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.

माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.

सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.

या कथेचे सार.

एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.

विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

Dont worry

Be happy


मित्र श्रीमंत किंवा गरीब नसतो मित्र शिकलेला असावा असे काही नसते मित्र अडाणी पण चालतो कारण मित्र मित्रच असतो।


Rate this content
Log in