prem kasbe

Others

3  

prem kasbe

Others

मी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

3 mins
323


नमस्कार,


आज तुम्ही Youtube ला किंवा google ला जर शोधले तर भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल भरपूर माहिती मिळेल पण विचार तुम्हाला खूप कमी मिळतील... तो मांडण्याचा माझा छोटा प्रयत्न... 


जगातील सर्वात मोठी जयंती म्हणून Google ला शोधले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या उच्चस्थानावावर बघून मला खूप आनंद झाला.


आजचा हा माझा लेख समाजातील पसरलेली अस्पृश्यता नष्ट करण्याचा नाहीये कारण ती करण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी कधीच केले आहे. मला आज माणसाला माणूस म्हणून जगायचा अधिकार ज्या व्यक्तीने दिला त्या व्यक्तीच्या विचारांबद्दल बोलू वाटते....


आज भलेही मागासवर्गीय समाज जगाच्या पाठीवर खूप मागे असू द्या. पण आम्हाला जे काही मिळाले आहे ना ते फक्त आणि फक्त डॉ. आंबेडकरांमुळे मिळाले आहे याचा मला अभिमान आहे..


खरे सांगायला गेले तर आज माझे मित्र ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि समाजाचे आहेत आणि मी शुद्र समाजाचा आहे. परंतु आजपर्यंत मला मी कोणत्या जातीचा आहे, हे कोणीही नाही विचारले. सगळ्या कुळाची लोक आज माझ्या ताटातील घास पण खातात आणि घरचे पाणी पण पितात. काही मित्र तर माझा उष्टा चहा पण पितात.... हे शक्य झाले ते म्हणजे फक्त आणि फक्त डॉ. आंबेडकरांमुळेच.....


जुन्या काळापर्यंत आपल्या समाजावर खूप अन्याय अत्याचार झाले आहेत परंतु खरे सांगायला गेले तर आता आपल्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले आहेत. ज्यावेळेस वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आमच्या मागासवर्गीय जातीचा विद्यार्थी शिक्षण घेतो ना त्याला कित्येक ठिकाणी क्षणाक्षणाला तो मागासवर्गीय आहे म्हणून त्याचा अपमान केला जातो. हे कुठे तरी थांबले पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण जर आम्ही सर्वांना मान्य करतो तर आमचे पण अस्तित्व तुम्ही मान्य केले पाहिजे... आणि फक्त मागासवर्गीय लोकांनाच आरक्षण आहे, नाही तर आज सर्वांनाच आरक्षण आहे हे शक्य झाले ते फक्त डॉ. आंबेडकरामुळेच....


मित्रांनो फक्त पैसे कमवायचे असते तर डॉ. आंबेडकर हे सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. यावर मला बोलू वाटते की,

"कोणी म्हणे माझा बाप आमदार आहे,

कोणी म्हणे माझा बाप खासदार आहे, (२)

पण छाती ठोकून आम्ही अभिमानाने सांगतो

की आमचे बाबा ईमानदार आहेत

आमचे बाबा ईमानदार आहेत..."


मित्रांनो जर तुम्हाला डॉ. आंबेडकर हे घराघरात पोहोचवायचे असतील तर आपल्या मुलांना A For Apple नाही तर A for Dr. ambedkar, B for भगवान बुद्ध आणि C फॉर छत्रपती शिवाजी महाराज हे शिकवलेच पाहिजे तरच लहान मुलांमध्ये त्यांच्याविषयी लहानपणापासूनच आदर निर्माण होऊ शकतो....


शेवटी जगातील संपूर्ण अनुयायांना एवढीच विनंती करतो की,

आपल्याला जर खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची असेल तर आपल्या समाजाच्या प्रत्येक बांधवाला कमीत कमी निदान त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभे राहून अभिमानाने काम करता येईल एवढे तरी शिक्षण घ्यावे ही भावना त्यांच्या मनात निर्माण करणे गरजेचे आहे...


आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.


डाॅ. आंबेडकरांना जनजागृती करायची होती म्हणून त्यांनी स्वतःला बदलले, स्वतः ऊच्चशिक्षित झाले आणि तेव्हाच त्यांनी लोककल्याणाची कामे सुरू केलीत. त्यांचा हा गुणधर्म आपण जोपासला पाहिजे. म्हणून सर्वप्रथम आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन चांगले अधिकारी होणे गरजेचे आहे. त्यानंतर निदान आपल्याला बघून का होईना आपल्या समाजात शिक्षणाचा उमग निर्माण होईल आणि प्रत्येक जण माणूस म्हणून जगेल.... कारण किती दिवस आपण फक्त दुसऱ्यांची गटारं आणि शौचालये साफ करणार.

त्यामुळे आजच आवर्जून शपथ घ्या काहीही झाले तरी शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हे डॉ. आंबेडकरांचे वाक्य आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणारच.


शेवटी एवढेच सांगतो 

केलास जगाचा उद्धार तू भीमराया

दिलास तू आमच्या जीवनाला आकार भीमराया

तोडूनी जातिधर्म तू पेटविली ज्योती

माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी

एकटा दमदार उभा तू भीमराया

एकटा दमदार उभा तू भीमराया


जय भीम


Rate this content
Log in