मैत्रिणी
मैत्रिणी
कारल्याचे बी पेर की गं सुने... मग जा आपल्या माहेरा, माहेरा..
कारल्याचे बी पेरलं की हो सासूबाई आतातरी जाते माहेरा, माहेरा...
जसं कारल्याची भाजी झाली तरी माहेरी जाण्याचा योग जुळत नाही तसा.. मैत्रिणी मैत्रिणी get together करण्याचा योग ही जुळत नाही..
मुलांची परीक्षा होऊ दे की सखे
मग मी येते get together ला, get together ला
ऑफिस ला सुट्टी मिळूदे की सखे
मग मी येते get together ला, get together ला
घराची शिस्त लावते की सखे मग मी येते get together ला... get together ला
असं करत, करत.... मग तो सुवर्ण योग,, ताम्र योगात बदलून.. काही मैत्रिणी तरी जमतात... आणि मग काय चिवचिवाट सुरु होतो... वर्षभर चारापाण्याच्या च व्यापात असणाऱ्या चिमण्या थोड्या वेळासाठी का असेना मुक्त होतात,एकत्र आनंदाने भिर भिरतात आपलं वय, आपलं नाव... गाव, पत्ता सगळं विसरतात.. दिवस का रात्र.. ही त्यान्च्या आडवी येत नाही... नुसता चिवचिवाट....
मग.... यात भेटन्याची वेळ मात्र भुर्रर्र कण उडून जाते आणि घरट्यात परतन्याची वेळ येते..
एकमेकींना असंच परत भेटण्याची आश्वासने देऊन (जी पाळायला दिव्य करावी लागतात )पदरात मावत नसलेला आनंद, आणि आठवणी घेऊन.. त्याच पदराने डोळ्या च्या कढा पुसत... परतीच्या मार्गाला लागतात.. आणि आपल्या संसारात गढून जातात.. अशा ह्या माझ्या चिमण्या, सख्या.....
