Sanjay Pande

Others

3  

Sanjay Pande

Others

मैत्रीची परिभाषा

मैत्रीची परिभाषा

6 mins
1.8K



' तुम्ही असे कसे म्हणू शकता?असा माझ्यावर आळ घेणे तुम्हाला शोभत नाही' सरिता आपल्या नवऱ्याला रागातच पण तेवढयाच संयमाने म्हणाली. कारण ही तसेच होते.रमेश सरीताचा पती...चांगला मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या हुद्यावर नौकरीस होता.अगदी रग्गड म्हणावे इतका पगार होता.शिवाय त्याने स्वतःची ही एक सॉफ्टवेअर कंपनी काढलेली होती.त्यातून ही आता रमेश ला बऱ्यापैकी आवक चालू झालेली होती.शिवाय त्याच्या वडीलांची ही इस्टेट होती.त्यामुळे सुखवस्तु कुटुंबातील असल्याने सर्व ऐषआरामाचे साधनं दिमतीला अगदी कुर्णिसात घालून हजर होते.लग्न ही सरिता सोबत धुमधडाक्यात झालेले.सरिता पण सुरेख व घरदांज कुटुंबातील,लाडात वाढलेली होती.रमेश तर सरिता ला कुठे ठेऊ न कुठे नको अश्या विचित्र अवस्थेत सापडला होता.तिच्याशिवाय त्याचे पान ही हलत नव्हते.काही वर्ष अशी एकदम कोणत्याही कुरबुरीशिवाय पार पडली.पण नंतर मात्र हळूहळू भांडयाला भांडे वाजत गेले व हळू असलेला हा आवाज कधी मोठा झाला हे त्या दोघाना उमजलेच नाही.तसे वाद किरकोळच होते.रमेश सोबत सॉफ्टवेअर कंपनीत योगिता कामाला होती.रमेश आणि योगिता रमेश च्या लग्नापूर्वी पासुनचे मित्र होते.गेल्या सहा वर्षापासून ती दोघे एकाच प्रोजेक्टवर काम करीत होते.दोघे ही एकाच वेळी नौकरिला लागले होते.दरम्यान योगिताचे लग्न झाले .तरी ही या दोघांच्या मैत्रीत विशेष फरक पडला नाही.कारण तसे काही त्या दोघांच्या ही मनात नव्हते.रमेश व सरिताचे लग्न ठरल्या नंतर एक दोन वेळा सरीताची रमेश च्या सोबत योगिताशी भेट झाली होती पण त्यावेळी सरिता ला काही वावगे वाटले नाही.परंतु पुढे रमेश व योगीताची सलगी वाढू लागली.तशी शंका सरिता ला आली होती पण कुठे थोड्या बाबीसाठी वाद घालायचा म्हणून तिने दुर्लक्ष केले.रमेश ला थोड़ा जरी उशीर झाला की सरिता च्या मनात पाल चुकचुकायची.नक्कीच ही दोघ मजा करत असणार.सरिता ने रमेश ला ही शंका एक दोन वेळा बोलून दाखविली पण त्याने मात्र हसण्यावर नेऊन विषय संपविला. 'अग सरिता,किती तू शंकेखोर आहेस.आमची निव्वळ मैत्री आहे बस.दूसरे काहीही नाही.आणि तुला लग्ना आधीच ही गोष्ट स्पष्ट केली होती.तू पण काही हरकत नाही असे म्हणाली होती.मग काय हा आता बुरसटलेपणा. स्त्री पुरूषात शारीरिक सबधाशिवाय मैत्री असू शकत नाही का? 'रमेश ने सरिता ला समजावत म्हटले. सरिता ला काय बोलावे सुचत नव्हते.आपसातील सर्वजण रमेश व योगिता च्या या 'मैत्रीपूर्ण 'वागण्यावर आश्चर्य व्यक्त करीत होते.रमेश असे काही वागणार नाही हे सरिता ला पक्के माहित होते व तिला तशी खात्री होती. पण लोकांची तोंडे कशी बंद करणार?नेमके कसे समजावून सांगावे हे सरिता ला कळत नव्हते.योगिता पर्यन्त ही ही कुणकुण गेली होती.तिने ही रमेश ला समजाव ण्याच्या सुरात म्हटले 'रमेश, जर सगळ्यांना आपल्या सबंधाबद्दल शंका येत असेल तर आपण आपले वागणे बदलणे योग्य होईल.' रमेश हे ऐकून दचकला पण लगेच सावरत म्हणाला 'योगिता,तुला माहित आहे की आपले तसे काहीही नाही मग का आपण या लोकांच्या वाटण्याला भिक घालायची.आपल्याला दोघाना ही एकमेकांना भेटून बोलून चांगले वाटते,हायसे वाटते बस.कोणतेही पाप आपल्या मनात नाही. एक स्त्री एका पुरुषासोबत निखळ मैत्री करु शकत नाही का? हा योगिता ,तुलाच जर वाटत असेल की आपण भेटु नये तर मग ठीक आहे.' असे म्हणत असतानाच लगेच योगिता उत्तरली. 'रमेश मला ही तुला भेटायला,चर्चा करायला आवडते.माझ्या पतिचेही काही म्हणणे नाही ' तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच रमेश उत्तरला 'मग तर काहीच कारण नाही घाबरण्याचे ' 'अरे पण तुझी पत्नी सरिता ' योगिता चे हे बोल काटतच रमेश वदला 'तिला मी समजावले आहे.प्रत्येकाला कसे जगावे याचे स्वातंत्र आहे. हे तिला समजत नाही तर ही तिची चूक आहे .आता हा विषय आपण येथेच थांबवू यात. चल येतो मी 'असे म्हणत रमेश निघाला.योगिता थांब थांब म्हणत होती पण त्याने त्याकडे कानाडोळा केला. रमेश ला कोणत्या शब्दात सांगावे हा यक्षप्रश्न होता.पण मग तिने ही विचार केला की जेव्हा आपल्या मनात कोणतेही पाप नाही.स्वच्छ मनाने आपण ही मैत्री निभावत आहोत तर लोकांच्या बोलाण्याकडे का आपण लक्ष द्यायचे असे मनात घोळत ती घरी पोचली.तिला ही माहित होते की रमेश त्याची पत्नी सरिता वर जिवापाड प्रेम करतो.नेहमी तिची तारीफ करीत असतो.एक दोन दिवस जरी सरिता बाहेरगावी गेली की रमेश अस्वस्थ होत असे.तिचा वाढदिवस च नाही तर प्रथम दोघांची भेट झाली तो दिवस ही न चुकता दरवर्षी साजरा करत असतो.रमेश तिचा घनिष्ट मित्र होता.दोघात वितुष्ट येऊ नये अशीच तिची मनोमन इच्छा होती.पण नियतीने काही वेगळेच वाढून ठेवले होते.काही दिवसातच सरिता ने स्वतःला जाळून घेऊन जीवन सपंविले.तिने सविस्तर चिट्ठी लिहुन आत्महत्या का करत आहे हे नमुद केले.पती रमेश चे माझ्यावर खुप प्रेम होते व योगिता -रमेश ची निव्वळ मैत्री होती हे ही मला माहित होते .मला यात काहीही वावगे वाटत नव्हते पण समाज ते स्विकारायला तयार नव्हता.समाजाचे टोमणे असह्य झाल्याने जीवन सपंवत आहे असे तिने लिहुन ठेवले.या घटनेमुळे रमेश पार खचला होता.पण त्याने हिम्मत न हारता अधिक जोमाने स्वतः ला कामात झोकुन दिले.हुषार तर तो होताच त्याने थोडयाच अवधीत आपली सॉफ्टवेअर कंपनी नावारुपास आणली.योगिता शी त्याची मैत्री मात्र कायम होती.नाते ही तसेच पाहिल्यासारखेच. त्याचे मित्र,आप्त सगळे त्याच्यावर खुश होते.सर्वांची तो आदराने चौकशी करीत असे.काही लागले तर तत्परतेने मदत करीत असे.पहाता पहाता कधी पन्नासी लागली हे त्यालाच काय त्याच्या सोबत राहणाऱ्याना ही कळाले नाही.रमेश ची आई व इतर मित्र मंडळी त्याला लग्न कर म्हणून म्हणत होते परंतु हा टाळत होता.पण एक दिवस आईने गाठलेच

'रमेश,आता माझी डोळे मिटण्याची वेळ झाली आहे.कधीही बोलावणे येऊ शकते.त्यापूर्वी मला माझी सुन बघायची आहे.तू एकटा आयुष्य कसा काढ़शील .माझे म्हातारीचे ऐक व लग्न कर.'रमेश ला ही आपल्या आईचे म्हणणे पटत होते पण त्याचे मन मानत नव्हते .शेवटी त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.अगदी सुरेख तीस पस्तीसीतील सुरेखा त्याच्या आयुष्यात आली.रमेश ही खुश होता.त्याच्या मनासारखी सोज्वळ व सुंदर पत्नी त्याला मिळाली होती.सुरेखा तर काय हवेतच होती.इतके सर्व ऐश्वर्य व सतत झेलणारा पति,अजुन काय हवे एखाद्या स्त्रीला.एक वर्ष कसे निघुन गेले हे दोघाना ही कळले नाही.पण नियतीला हे मंजूर नव्हते.सुरेखा चा मित्र आशिष चे वागणे समाजाला रुचत नव्हते.सुरेखा चा आशिष जवळचा मित्र.अगदी दिवसातुन चार पाच वेळा फोनवर व एकदातरी प्रत्यक्ष भेट होत असे.त्यात रमेश ला काही ही वावगे वाटत नव्हते.पण काही दिवसानंतर ही कुजबुज जोरात वाढली.रमेशच्या ही मनात शंकेने घर करायला प्रारंभ केला होता.कोणा कोणा ची तोंड बंद करणार असा विचार करुन एक दिवस रमेश ने सुरेखा कडे विषय काढ़लाच. 'सुरेखा,बोलायला नको पण तुझे आशिष सोबतचे वागणे काही समाजाला पटत नाही ' सुरेखा ने लगेच म्हटले 'रमेश,तुला ही माहित आहे आशिष शी माझी केवळ मैत्री आहे.बाकी काहीही नाही.लग्ना पुर्वीच हे तुला मी स्पष्ट केले होते. ' रमेश आवंढ़ा गिळत म्हणाला ' मला माहित आहे पण कोणा कोणा ला सांगत फिरु मी ' सुरेखा म्हणाली 'रमेश मला समाजाचे काही देणे घेणे नाही. बस.' हे ऐकताच रमेश ताडकण उठला व म्हणाला 'पण मला आहे.मी समाज सोडून राहु शकत नाही. तुला निर्णय घ्यावा लागेल ' रमेश निर्णायक स्वरात म्हणाला .सुरेखाला हे ऐकून धककाच बसला पण लगेच सावरत म्हणाली ' मग रमेश ऐक माझा निर्णय.माझे आशिष शी काही ही सबंध नसताना तू असा आळ घेत असशील व समाजाच्या नावाने बिल फाडत असशील तर मला हे मंजूर नाही. तू जो काय तो निर्णय घ्यायला तयार आहेस'असे म्हणून ती चालती झाली. त्यानंतर बरेचदा रमेश ने सुरेखा ला समजावण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. समाजाचे व आप्तांचे घाणेरडे बोलणे आता अधिकच वाढले होते. रमेश ला खरे काय हे माहित होते पण पुरुषी मानसिकतेतुन तो पुरता बाहेर आलेला नव्हता. एक दिवस त्याने आपल्या घरातील रिवॉल्वर ने डोक्यात मारून घेऊन जीवन संपविले. मरताना ही रमेश ला पुरूषी मानसिकता चिकटून होती. सरिता ने आत्महत्या करतांना चिट्ठी लिहुन सर्व बाबी स्पष्ट केल्या होत्या पण रमेश मात्र अशी हिंमंत करू शकला नाही ही शोकांतिकाच आहे.



Rate this content
Log in