मातींच्या भिंती
मातींच्या भिंती
लहानपण स्वत:च एक अनोख विश्व असत. तुमची इच्छा आसो की नसो पण त्या त्या प्रसंगात कधी हरखून जातो कळत पण नाही. आज अविष्याच्या मध्यात ही त्या प्रसंगांची आठवण हरखून टाकते. असाच प्रसंग लहानपणी च्या प्रत्येक पावसात यायचा.माझा बालपणीच्या नजरेतून मांडतो.
पाऊस सुरु झाला की मी आमच्या घराच्या पुढच्या दाराच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहायचो. पाऊस कधीच एकदम पडत नाही. एक एक थेंब करत करत वाढत जातो. मी ज्या गावात राहायचो त्या गावातील बहूतेक घर आमच्यासह मातींच्या भिंतीची होती. माझ्या घराच्या समोर असच मातीचं घर होत. मी उंबय्रात
उभा राहून त्या सुरु होणाय्रा पावसाची मजा बघत बसायचो. मातीच्या भिंती वर थेंब पडला की, तो भिंतीचा भिजलेला भाग वरच्या बाजूला फुगीर आणि खाली निमुळत होत जाते. तो मला पाठीवर घोंगडी घेतलेल्या पाठमोय्रा मानसासारखी भासायची. मग त्या भिंतीवर असे अनेक माणस बाजराला येत राहील्यासारखी भासायची अन गर्दी वाढत जायची अन काही क्षणातच बाजर भरायचा. गर्दीच्या आवाजाची कमी पडणारय्रा पावसाचा आवाज ती भरुन काढायचा. अन पाऊस वाढत गेला की भिंती वरील ते चित्र नष्ट होऊन जायच. पण ते बालपणीच्या कल्पना आता खरी वाटते. पाऊस आला की तरच बाजार फुलतात.