माणूस की शून्य जग
माणूस की शून्य जग
काल रात्रीचे तीन वाजले होते. मी झोपलेला होता. त्याच वेळी मला एक आवज ऐकू येतो. एका कुत्र्याचा तो एका पाण्याच्या हौदात पाणी पिण्यासाठी जातो. परंतु काही कारणांमुळे/त्याचा तोल गेल्यामुळे तो पाण्यात पडतो. तो स्वत:ला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. परंतु त्या दुःखाशी त्याला सामना करावा लागतो. तो आपला जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. जोरजोरात भुकंतो त्या थंड्या पाण्यात त्याचा जीव गुदमरतो. परंतु तो देखील त्याची हिंमत सोडत नाही. तो जोरजोरात आवाज काढून लोकांना त्याची भावना सांगायचा प्रयत्न करतो. परंतु कोणालाही त्याचा आवाज ऐकू येत नाही. ''तो ३ वाजेपासून ते ४/४:३० वाजेपर्यंत त्या दुःखाशी सामना करत राहतो''.
त्या दरम्यान मला जाग येते ! मी उठून बघतो की आवाज कोठून ऐकू येतो आहे? मी बाहेर जाउन बघतो तर काय तो कुत्रा तीथे त्याचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे.😔 परंतु मी त्याची काहीही मदत करू शकला नाही. 😔 बाकीचे लोक त्यांच्या॒ त्यांच्या घरात झोपलेले होते. परंतु प्रत्येकाला वाटत होतं की कुत्र्याचा आवाज काय रोजच ऐकू येतो. म्हणून प्रत्येक जणाने तिथे लक्ष दिले नाही. परंतु त्या काळात मात्र तो त्या पाण्यात थंडीने कूडकूडत, भिजलेल्या अवस्थेत तो माझ्या डोळेदेखत बुडत होता. 😔😔😔😔😔😔😔
माझ्याकडे काही उपाय नव्हता. तो बिचारा त्याच्या जीवाची भीक मागत होता. परंतु कोणालाही त्याची दया आली नाही. कारण मी एकटा होतो. मी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. इकडेतिकडे फोन लावले, परंतु त्या रात्री ३ वाजता कोणीही माझा फोन उचलला नाही. मीदेखील त्याची मदत करू शकलो नाही. याची मलाच लाज वाटते आहे. 😔😔😳😰😣
नंतर शेवटी त्या कुत्र्याने त्याच ठिकाणी त्याचा जीव सोडला. म्हणून म्हणतो कोणावरही विश्वास ठेऊ नका .कारण कोणी आपल नसत, ना आपण कोणाचे आसतो. एकटे आले आहे आणि एकटच जाव लागणार आहे..
😞😞😔😔😔😔😢😢😣😣😣😖😖😓😓
