STORYMIRROR

Nanda jadhav social worker

Others

4  

Nanda jadhav social worker

Others

माझ्या आठवणीतला पाउस

माझ्या आठवणीतला पाउस

5 mins
396

लहानपणी च्या खुप काही आठवणी असतात काही सुखद तर काही खडतर किती लिहावे आणि काय काय लिहावे कोठुन सुरूवात करावी असा प्रश्नच असतो. पन मी माझे बालपन जे होते ते ईथे लिहीले आहे.


काही दिवसा पुर्वी मी माझ्या शाळेतल्या बाल मैत्रीनिंचे नंबर मिळवले आणि वाटसप ग्रृप बनवला आणि 

गप्पांची मैफिल रंगली.

खुप वर्षानी आम्ही सर्व जनी एकत्र आलो होतो,सर्वच जनींचा आपल्या बालपणीच्या आठवणींचा खजिना पुढे येत होता. त्यात माझे बालपण कधी हातातून

निसटुन गेल हे!

 न कळलेली काही शेतकऱ्यांची मुल असल्या मुळे आम्हाला आज ते लहानपण हरवलेल आहे याचे ज्यास्त काही दु:ख वाटत नाही.

आत्ताच्या बालपना सारखे काही लाडा प्रेमाने सारे काही मिळनारे बालपन असते तर कदाचीत आवडलेही असते.

परंतू खरे हे आहे की त्या वेळीचे जे समाधान होते ते आता नाहीये.

आम्ही तसे शेतावरच वस्तीला असायचो. 

 गाव शेतापासुन साधारण चार की. मी.दुर होते.

 ते आमचे वय शाळेत जान्याचे होते.

शेतामधुन गावा मधे शाळेत जायचे त्या मुळे थोडे छान वाटायचे.

फार चांगले असे काही नसायचे कारण

चालून चालून खुप पाय दुखायचे.

त्यात पाऊस असेल तर मग चिखलातून पाण्यातुन तो प्रवास पाई करावा लागायचा.

शाळेत जायला मिळाते हाच एक आनंद मनात असायचा.

त्या वेळी लिहायला खापराची पाटी व लेखनी असायची पेन पेन्सिल छान दफ्तर असे काही नसायचे.

दगडावर घासुन त्या लेखणी ला टोक करायचे आणि त्याने पाटीवर लिहायचे.

काही चुकलेच तर पटकन ते 

अंगावरच्या फ्राॅक ने पुसायचे आणि परत लिहायचे.

बाई वर्गात आल्या की वर्ग असा शांत व्हायचा की वर्गात आवाज फक्त यायचा तो बाईंचाच. 

एक तास खेळायला सोडले की खो खो हा लगोरी हे खेळ खेळायचो.

लगोरी मांडायला फरशीचे तुकडे गोळा करून त्या एकावर एक मांडल्या की आमची लगोरी झाली.

शाळा सुटायला शाळा भरायला मधल्या सुट्टीला शिपाई काका घंटा वाजवायचे. 

ती घंटा अशी असायची, 

एक जाडसर लोखंडी प्लेट टांगलेली त्यावर एक ठोंबा मारला की ती घंटा वाजायची 

शाळा सुटली की आम्हाला चार कि. मी. चालून घरी आले की जेवन करून अभ्यासाला बसायचे पुस्तक वाचायचे आणि पाटीवर दोन्ही बाजुने पाटी भरून लिहायचे. पाटीवर सरळ रेशा मारायला पुस्तक आडवे धरून रेशा मारायच्या त्या साठी स्केल पट्टी सुध्दा नसायची आणि त्या वेळी घरात लाईट नसायची, राॅकेलचा तेलाचा कंदील असायचा त्यात एक चीमनी त्यात कपड्याची वात असायची ती पेटवली की प्रकाश. आम्ही त्याच प्रकाशात अभ्यास करायचो.

पाऊसाचे दिवस असले तर मग थंडी वाजायची पन अभ्यास झाल्या शिवाय झोपायचे नाही.

त्या नंतर आमचे वडील आम्हाला छ. शिवाजी महाराजांच्या,जिजाऊ च्या, उमाजी नाईकांच्या झाशीची राणी लक्ष्मिबाईंच्या, तसेच लालबहादुर शास्त्रींच्या , गोष्टी सांगायचे. ते ऐकून झाल्यावरच आम्ही झोपायचो.

पन कधी कंटाळा आला नाही.

बाकी करमणुकीला कसलेच साधन त्या वेळी नसायचे त्यात आम्ही शेतात वस्तीला असायचो.

कुठला सिनेमा टिव्ही ना रेडियो हे काही माहित नसायचे.

दरवर्षी गावा मधे यात्रा असली की आई आम्हाला यात्रेत घेऊन जायची.

मग यात्रेत खुप मज्जा वाटायची आई आम्हाला खायला फुटाणे रेवड्या हा खाउ घ्यायची. 

त्या वेळी छोटे आकाश पाळने असायचे एक किंवा दोन ते पण त्याला बसायला चार सीट असायचे आणि तेवढ चार पाच वेळा फिरवायचे की उतरवायचे झाले मग वर्षभर परत काही नाही.

दिवाळी आली की घरात गोड खायला असायचे करंजी, शंकरपाळी, अनारसे, लाडू, तेव्हा ते खुप गोड लागायचे.

 आणि नविन कपडे असायलाच पाहीजे असा काही रिवाज नवता आणि घेतलेच तर एक फ्राॅक ती पन एकदम साध्या कापडाची शिंप्याकडे शिवलेली मिळायची पहली फ्राॅक फाटली असेल तरच अन्यथा नाही.

असे आता सारखे एवढे प्रकार अजीबात नसायचे. कापडांचे आणि खाण्याच्या पदार्थांचे दोघांचे ही अगदी नाव सुध्दा एकलेली नव्हती.

फॅशन तर औषधाला सुध्दा नव्हती.

पाऊस सुरू झाला की एवढा पाऊस असायचा की आनंद घ्यावा की टेंशन घ्याव हेच कळत नसायच.

आभाळाचा असा गडगडाट व्हायचा जनू कानाचे पडदे फाडेल की काय असा कर्कश आवाज आणि विजांचा चकचकाट अशी भिती वाटायची त्यातच आई म्हणायची दारात उलथणे टाकले की विज पडत नाही.

दारात उलथणे टाकायची. मग खरच अस वाटायच आता आपण सुरक्षित आहोत मग थोडी भिती वाटायची नाही. त्या काळी आई बाबांनी जे काही सा़गीतलेय तेच खरे व अंतीम असायचे. त्यात अर्थ अनर्थ काढायला आपल्याला काही गरज नसायची व काही ऊत्तर ही द्यायला हिंमत नसायची.

पाऊस चालू असतांना घराबाहेर जाउ वाटायचे नाही

कारण शेतात घर असल्याने दारात चिखल असायचा.

पहिला पाऊस तर खुपच वाजत गाजत असायचा 

त्यात आमच्या शेतात आंब्यांची खुप झाड होती. मग काय झाडाखाली खुप सारे आंबे पडलेले असायचे पाऊस थांबताच आम्ही आंबे वेचायला जायचो, 

त्यात एखादा पिवळा धमक पाडाचा आंबा भेटायचा तो तिथेच खाउन फस्त करायचा भरलेले हात अंगावरच्या कपड्याला पुसुन परत भेटला की परत खायचा अस पोट भरायच आणि तेवढ खुप बर वाटायच, 

आंबे चालू झाल्या पासुन संपे पर्यंन्त अंगावरचे कपडे बघायलाच नको असे असायचे.

परंतू त्याची कधीच लाज वाटाली नाही. 

 कधी पायाला चप्पल भेटली नाही म्हणुन त्याचे कधी दु:ख वाटले नाही.

आम्हाला परस्थितीची जाणीव जनू देवाने दिलेले एक वरदान च होते.

आणि आमची आई आम्हाला सर्व काही आईच आहे असे वाटायचे आणि तेच खरे होते आई आम्हाला सोडुन कधीच कुठे गेली नाही.

तिला माहेर नव्हते त्या मुळे ती आम्हाला सोडुन एक दिवसही लांब राहीलेली नव्हती.

आम्ही कधी आजारी पडलो नाही आणि कधी तरी काही ताप सर्दी झालीच तर आई थोडावेळ जवळ बसली की आम्ही बरे व्हायचो.

 आईने हळद मिठाचा काढा करून दिला, की आम्ही बरे झालो असे वाटायचे.

डाॅक्टरांची व आमची भेट फक्त शाळेत काॅलराचे लसीकरण असायचे तेव्हाच व्हायची.

बाकी मग कधीच गोळ्या औषध घ्यायचे काम पडायचे नाही.

आमचे बालपण हे असा आठवणींचा ठेवा आहे.

हरवले आहे असे अजीबात म्हणता येनार नाही.

कारण बालपण हे कसेही असो ते फक्त आईच्या कुशित घालवलेले असते, 

म्हणुन ते स्वंर्गा पेक्षाही सुंदर असत. 

आणि बालपण हे जिवनातले कोरे करकरीत एक पान असते म्हणुन ते अमृता प्रमाणे अमर असते. ते कधीही हरवले जात नाही जेव्हा आठवू तेव्हा जसे च्या तसे समोर उभे राहाते.

म्हणुन बालपण आठवले की आपल्या ला आपन लहान असल्याचा आनंदमय असा भास होतो आनंदाने चेहरा हसरा होतो...... 


खरे हरवते का असे बालपण 

घटकाभर का होते आठवण

खट्याळ खोड्या होत्या छान

आठवुणी सारे मग का भरते मन


खेळ मस्ती होती सस्ती

लोक सारे होते मायेचे

प्रेम आपुलकी चौहीकडे

बघावे तिकडे आपुलीची वस्ती! 


संकट समई धावत होती सारे! 

कधीच नवता गर्व कुणा रे! 

माझे तुझे असे नवते काही! 

जनू संतच होते ठाई ठाई! 


होती गरीबी सर्वांची ! 

पन हाव ही नवती पैशाची! 

स्वार्थ नवता कसलाच तेवा! 

मानुस म्हणुन असन्याचा हेवा! 


असेच बालपण देगा देवा! 

 मुंगी साखरेचा रवा!


Rate this content
Log in