The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

RAHUL TITARMARE

Others

5.0  

RAHUL TITARMARE

Others

माझं गणराज्य

माझं गणराज्य

1 min
498


युवा विचारधारेचा आणि संस्कृतीचा उन्मादाच्या मस्तीत साजरा होत असलेल्या भारतीय गणराज्या, तुझी ओळख जगाला आम्ही जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही मानुन करतो. जगाच्या उंबरठ्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अति वापर होत असताना आम्ही भारतीय सुद्धा कस का होईना त्या गोष्टी अवलंबण्याचा प्रयत्न केला,त्यातून आपली संस्कृती आणि संस्कार जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, पण सगळे करत असताना संस्कृतीचा उन्माद पण माजविला आहे, तंत्रज्ञान वापरत असलेली 90 टक्के पिढी आपला राष्ट्रीय ध्वज ओळखत नाही यापेक्षा शोकांतिका काय असेल आणि 100 टक्के त्या मॅसेज ला समोर प्रसारित करणारे तर त्यापेक्षा महानच. गणराज्या तू दिलेलं स्वतंत्र आम्ही फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ला डॉल्बी लावून चौकात नाचण्यात प्रदर्शीत करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुळखा असलेले आम्ही त्यांचा वारसा जपण्यापेक्षा, त्यांच्या मूल्यांची खराबी करण्यातच व्यस्त आहोत.कट्टरतेच्या युगात वावरताना खरे शिवाजी महाराज आणि खरे भारतीय गणराज्य आम्हाला समजलेलंच नाही.ध्वजाच्या रंगावरून, त्याच्या कपड्यावरून, त्याच्या खाण्यावरून धर्माची, माणसाच्या कपड्यावरून आम्ही माणसं ओळखत आहोत, तू दिलेली विविधतेत एकतेची मूल्य सर्रास धुळीत मिळवीत आहोत.


Rate this content
Log in

More marathi story from RAHUL TITARMARE