devakee dhokane

Children Stories Fantasy Children

4.6  

devakee dhokane

Children Stories Fantasy Children

माझं आवडत पात्र - डोरेमॉन

माझं आवडत पात्र - डोरेमॉन

1 min
369


डोरेमॉन अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचंच आवडतं पात्र! आणि त्याच्या पॉकेटमधून जी नव-नवी गॅजेट तो काढतो ते तर खूपच विलक्षण.

आपल्या कल्पनेच्याही पलिकडले. ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. डोरेमॉनची दुनिया प्रत्येकालाच मोहवून टाकते. अगदी कुणालाही त्याच्या जगात जाण्याचा मोह व्हावा! इतकी सुंदर...


कल्पनेतील दुनिया प्रत्येकालाच बोलावत असते, खुणावत असते. वास्तव दुनिया अन् काल्पनिक दुनिया यात जमीन-आस्मानाचं अंतर आहे. काल्पनिक दुनियेची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. पण तीच कल्पनेतील दुनिया जर वास्तवात आली तर... सगळं काही आपल्याला हवं तसं अन् आपल्याला पाहिजे अगदी तसंच होईल! पण...


ती फक्त कल्पनाच असेल. असो, हा फक्त जर आणि तरचा प्रश्न आहे. डोरेमॉनच्या गॅजेटप्रमाणे आपणही आपल्या रोजच्या जीवनातही गॅजेटचाच वापर करतोय. फरक फक्त एवढाच आहे, डोरेमॉनची गॅजेट जादूची अन् आपली इलेक्ट्रोनिक गॅजेटची. नोबिताप्रमाणे या गॅजेटने आपली कामंही झटपट होतात अन् कधीकधी काम बिघडतातही.


ज्यावेळेस नोबिता अडचणीमध्ये सापडतो, तेव्हा प्रत्येक वेळेस डोरेमॉन मदतीला धावून जातो! अगदी त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांजवळ नोबिताला मदत करणाऱ्या डोरेमॉनप्रमाणे डोरेमॉन आहे. मग तो आपल्या आईवडिलांच्या, भाऊबहिणीच्या, मित्र मैत्रिणीच्या, शिक्षकांच्या अश्या कोणत्याही रूपात असू शकतो!


फक्त प्रत्येकाला आपला डोरेमॉन ओळखता आला पाहिजे!


Rate this content
Log in