STORYMIRROR

Madhuri Jadhav

Others

3  

Madhuri Jadhav

Others

माझी आई माझं पहिलं प्रेम

माझी आई माझं पहिलं प्रेम

9 mins
188

ही गोष्ट आहे माधवी नावाच्या एका मुलीची माधवी एका मध्यमवर्गीय घराण्यतली मुलगी होती माधवीला दोन मोठे भाऊही होते माधवी ची आई स्वभावाने गरीब होती तर वडील मात्र सरकारी खात्यात कामाला असून देखील काहीच फायदा नव्हता कारण ते तुमचा सर्व पगार हा आपल्या व्यसनं वरच उडवत असे माधवी चा स्वभाव हा खूप खोडकर होता आणि या खोडकर स्वभावामुळेच ती दहावी नापास झाली होती तशी ती सगळ्यात मिसळणारी लोकांना आपलेसे करणारी सगळ्यांना आवडेल अशीच होती आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी माधवी नेहमी तत्पर राहणारी होती माधवी एक मदतशील मुलगी होती पण तेवढेच आगाऊ आणि टिंगल-टवाळीक्या करणाऱ्या मुला-मुलींमध्ये देखील ती असायची ती हुशार असली तरी आळशी ही तेवढीच होती म्हणूनच तिचा हा स्वभाव तिला एके दिवशी नडला आणि माधवी मस्ती करण्याच्या नादात इयत्ता दहावी मध्ये नापास झाली होती कारण नेहमीच अभ्यास न करताही पास होता येत असा तिचा गोड गैरसमज होता कारण तिला कॉपी करून पास होण्याची सवय लागली होती आणि नेमकं तेच दहावीला तिला करता आलं नाही म्हणून आपल्या नावडत्या विषयातच नेमकी माधवी नापास झाली होती माधवीने या सगळ्याची कधी कल्पनाच केली नव्हती पण निकालाच्या दिवशी माधवीचे डोळे भरुन आले होते कारण तिचे सगळे मित्र मैत्रिणी उत्तीर्ण होऊन आता कॉलेजच्या तयारीत होते माधवीला आपल्या चुकीची जाणीव झाली होती पण आता पश्चाताप करून काहीच फायदा नव्हता तिच्या आयुष्यातला एक वर्ष फुकट गेला होता मात्र माधवीने ही आता मनाशी पक्क ठरवलं की ही आपण हार मानायची नाही आणि आपणही आपला प्रवास चालू ठेवायचा जिद्द ठेवायची आणि मेहनत करून उत्तीर्ण होऊनच दाखवायचं


माधवीच्या घरात संपूर्ण कुटुंबात दहावी सुद्धा कोणती मुलगी पास झाली नव्हती म्हणजे सगळेजण जेमतेम शिकणारे होते पण माधवीला खूप शिकायचं होतं आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय साधायचं होतं तिचं शिक्षण पहिली ते सातवी हे शासकीय विद्यालया मध्येच पूर्ण झाले होते पण नंतर मात्र मोठी बोंबच होती कारण घरात हालाखीची परिस्थिती होती माधवीच्या वडिलांनी तर सरळ पुढचं शिक्षण घेऊच नको असं तिला सांगितला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून आधीच हात त्यांनी वर केले होते तसंही माधवीचा आणि तिच्या वडिलांचं फारसं काही जमत नव्हतं आणि तिला तिच्या वडिलांकडून फारशी काही अपेक्षाही नव्हतीच ती म्हणायची माणसाने अपेक्षाही अशा व्यक्तींकडून ठेवाव्यात तिथे त्या पूर्ण करतानाही आल्या तरी त्या समजून घेणारी व्यक्ती असली पाहिजे तिला तिच्या वडिलांचा फार राग येत असत सहाजिकच कोणाला येईल कारण शंकर रावांना फक्त जेव्हा तेव्हा स्वतःची पडलेली असायची त्यांना माधवी आणि तिच्या दोन्ही भावांची काहीही पडलेली नसायची अर्णव आणि शिवांश हे माधवीचे दोन सख्खे भाऊ त्यांच्याही मनात माधवी सारखाच वडिलांचा तिरस्कार निर्माण झाला होता त्यात कहर म्हणजे दारू पिऊन येऊन ते नेहमी आपल्या बायकोला म्हणजे जयाला मारझोड करीत असे रोज कोणत्या ना कोणत्या कारणांवरून जयाशी वाद घालत असे तिला शिवीगाळ करत असत माधवीलाही आता याची सवय झाली होती कारण लहानपणापासूनच ती हे सगळं बघत आली होती आणि जेव्हा वयात आली तेव्हा तिने ठरवलं की उद्या लग्न करेल तर निर्व्यसनी मुलांशीच करेन


अर्णव हा माधवी आणि शिवांश पेक्षा मोठा असल्याने त्याच्या खांद्यावरच त्याने घराची जबाबदारी पेलायची ठरवली तसा अर्णवने खूप कमी वयातच शाळा सोडली होती कारण एकच परिस्थिती पहाटे लवकर उठून दुधाच्या बाटल्या पोचवायचा पेपर टाकायचा नंतर गणपती बनवण्याच्या कारखान्यात सुद्धा काम करु लागला होता तशी त्याची शिक्षणाची आवड देखील कमीच होती तो मोठा असल्याने वडिलांपासून चोरून चोरून आपल्या आईला तो जमेल तेवढी घर खर्चात मदत करत होता कालांतराने त्याच्या पाठोपाठ आता शिवांशही मोठा होत होता पण त्याला अर्णव सारखं शाळा सोडून काम करायचं नव्हतं म्हणून तो कमवायचा आणि कमावलेल्या पैशांचा उपयोग होतो आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी करत होता तर माधवी काही कमी नव्हते गरीबाचे चटके इथे सगळ्यांनाच बसत होते तेही दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी आपल्या मावशीकडे जाऊन राहू लागली आणि सुट्टी तिच्या मावस बहिणी सोबत कामालाही जाऊ लागली होती वय लहान होतं पण परिस्थितीच अशी होती की काम करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि सातवीनंतर शासकीय शाळाही नव्हत्या तिने आनंदाने पहिला पगार म्हणून आईला छानशी साडी सुद्धा घेतली आणि अर्थातच पुढे माधवीने आपल्या शिक्षणाचे पुढची वाटचाल धरली बऱ्यापैकी आपल्या शाळेचा प्रवेश खर्च सुटेल असे पैसे कमावल्यावर मात्र माधवी की आपल्या घरी परतायची तिने आपल्या नजीकच्या शाळेत प्रवेश देखील घेतला होता आता तरी खुश होती पण मात्र खुशी फार काळ माणसाच्या चेहऱ्यावर टिकत नाही हे खर आहे म्हणतातच ना तसंच काही माधवीच्या आयुष्यात घडणार होत येणारा काळ कसा असेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही पण परिस्थितीतून माणूस शिकतो हे खरं शाळा सुरू होण्यासाठी अजून बराच अवधी शेष होता त्यातच एके दिवशी माधवीच्या आईचं डोकं दुखू लागलं शंकररावांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं पण पुढे माधवी च्या आईची तब्येत हळूहळू खालावत चालली होती आणि आता हे नेहमीच झालं होतं पण शेवटी शंकररावांनी एक दिवशी जयाला सरकारी दवाखान्यात न्यायचे ठरवले


कारण त्यादिवशी प्रसंगच विचित्र घडला होता माझं तिच्या आईला आपण सकाळी आंघोळ केली आहे की नाही हेच आठवत नव्हते खरं तर तिने दुपारपर्यंत दोन वेळा आंघोळ केली होती आणि हे सर्व सगळ्यांच्या लक्षात येत होतं आणि याच गोष्टीमुळे शंकरराव सुद्धा घाबरले होते आणि म्हणूनच त्याने जयाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी घाई केली मात्र माधवीला कसलीच कल्पना नव्हती शंकररावांनी फक्त तिला जयाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो आहे असं सांगून नेले माधवी दोघांचीही वाट पाहत होती पण शंकरराव एकटेच घरी आले होते माधवीने आपल्या आई बद्दल विचारले असता ती हॉस्पिटल मध्ये आहे मी तुला तिला भेटायला घेऊन जाण्यासाठी आलो आहे असे शंकराव आणि माधवी ला सांगितले पुढे दोघेही हॉस्पिटल ला निघून गेले तिथे माधवीने आपल्या आईचे हातपाय बांधून ठेवलेले पाहिले तिला ते पाहताच खूप भीती वाटली व तिला रडू आवरेनासे झाले ती रडत उभी असताना शंकर राव जवळ आले त्यांचे काही नातेवाईक ही तिथे उपस्थित होते सगळ्यांनी त्या दोघांना सावरण्याचा प्रयत्न केला कारण माधवीला असं पाहून शंकर रावांचा बांधही फुटला त्यांनी स्वतःला सावरून माधवीला ही सावरण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी माधवीला नात्यांची किंमत कळली होती कारण जयाला लेडीज वार्ड मध्ये ऍडमिट केले होते मग तिथे कोणत्याही एका महिलेला थांबायची परमिशन होती माधवी अजून तशी वयाने लहान होती शंकररावांनी आपल्या नातेवाईकांना सांगितले पण ज्याने त्याने काहीतरी कारण काढून पळ काढायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस माधवीला कळून चुकलं की आपण ज्यांना आपली माणसं समजतो ती कधीच आपली नसतात सगळी स्वार्थी निघाली तिला तेथील कोणत्याच व्यक्तींकडून अशी अपेक्षा नव्हती कारण ती सगळी माणसे दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या कुटुंबातीलच तिच्या मावशी आत्या होत्या आता मात्र माधवीने तिथे एकटीने राहायचे ठरवले मी बघेल माझ्या आईला तिची मुलगी अजून जिवंत आहे तुम्हा सर्वांची काही गरज नाही असं तिने सगळ्यांसमोर बोलून दाखवलं माधवी स्वभावाने थोडीफार वडीलांवरची माणसे शंकररावांनी वरच गेली होती कारण माधवी खूप रागीट स्वभावाचे होती हे सगळे शंकरराव पाहत होते असं वाटत होतं आज माधवी खूप समजूतदार झाली आज खऱ्या अर्थाने पोरगी मोठी झाली होती तिला आपल्या आणि परकेपणाची जाणीव झाली होती जया ची तब्येत दिवसेंदिवस आता हा खराब होत चालली होती


खरं तर तिला मानसिक आजार झाला होता आणि त्याचा परिणाम हळूहळू शारीरिक दृष्ट्या जाणवू लागला होता जयाला खरं तर आपली आई सोडून गेली याचा धक्का सहन झाला नव्हता रात्री-अपरात्री कधीही आई आई म्हणून ओरडायची ती हाताला टोचलेले सुई स्वतःच काढून टाकायचे आणि रात्री माधवी ला जाग आली की ती घाबरून आईला शोधायला जायची आणि जया तिला बाथरूम मध्ये मशेरी लावताना दिसायचे ज्याला आधीपासून मशेरी लावायचे व्यसन नव्हते घरी पण ती कोणत्याही काम करायचं असेल तर आधी मशरी तोंडात भरणार मगच कामाला हात लावायची जयाचे परिस्थिती मध्येच खूप गंभीर झाली होती तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेले सर्व नातेवाईकांनी तर ती बरी होण्याची उमेद सोडली मात्र अशावेळी माधुरी आणि तिथे भांडणे वडील आणि दिराने घेतले व ते या कठीण काळात एकमेकांना सावरू लागले होते पैसे नसताना कधीकधी जयासाठी घरचा डब्बा आणण्यासाठी माधवी चालत घरी जायची तिला घरातील परिस्थितीची जाणीव होतीच म्हणून या काळात सर्वांनी हात आखडता घेतला व पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत होते यात बदल म्हणजे शंकरराव सुद्धा आता मुलांसोबत होते मुलांना त्यांचा धीर मिळत होता माधुरी घरी जाऊन सगळ्यांसाठीच डबा बनवून आणायचे बिचारी माझी बी खूप जास्त विचारात असायची खरंतर तिलाही भीती वाटत होती आईला नक्की काय झालंय कोणता आजार झाला हे कळतच नव्हतं कारण डॉक्टर जया चे रिपोर्ट काढायचे पण रिपोर्टमध्ये सगळं काही नॉर्मल आहे असं सांगत होते जया हवेतच बघत तिच्या जुन्या आठवणींमध्ये रमून जायचे आणि बोलायचीही जणू काही तिला वेडच लागले होते हे सर्व पाहून माधवीला तिच्या शेजारी ही झोपण्याची खूप भीती वाटत होती पण काय करणार दिवस कसाही जातो


पण रात्री माधवी खूप घाबरून जायची ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायचे आणि त्याच परिस्थितीत खरं तर तिला आईच्या प्रेमाची जाणीव झाली होती जी आजपर्यंत तिला कधी कळली नव्हती कारण हेच कुठेही जायचं म्हटलं तर आई नेहमी माधवीला टोकत असत सतत प्रश्न विचारत असे आणि जरा उशीर झाला की सारखा फोन करत विचारत असे माधवीला त्यावेळी आपल्या आईचा फार राग येत असे कारण तिचं म्हणणं असायचं की आई फक्त आपल्याशीच असे वागते ती आपल्या भावांना कधीही व कुठेही जाण्यास परवानगी देते मी मात्र मुलगी आहे म्हणूनच अशी का वागते तिला तिचं हे वागणं खटकायचं पण तिला त्यामागची भावना प्रेम कधीच दिसून येत नव्हतं आज जेव्हा जयाची ही सगळी बडबड थांबली होती जया ही स्वतःच्याच विश्वात हरवून गेली होती तेव्हा मात्र माधवीला जय अशा प्रेमाची जाणीव होते ति जयाच्या प्रेमासाठी आसुसलेली होती तिला जया आधीसारखी कधी होते असं वाटायचं म्हणून ती रोज देवाकडे प्रार्थना करत होती की आमच्या आईला लवकर बर कर तिच्याशिवाय या घराला घरपण नाही माधवी ला जयाच सारखा आपल्या मागे पुढे करणं सतावत होतं बिचारी अजून पंधरा वर्षाची तर होती तिला आता तिच्या हसण्याची कल्पनाच करवत नव्हती पण तिला देवावर विश्वास होता आणि तो खराही झाला ते वीस पंचवीस दिवस खूप दुखी आणि त्रासदायक होते असं कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं नेहमी माधवी म्हणत असे कारण जेव्हा स्वतःचाही स्वतःला ओळखत नाही मी तिच्या मुलांना ओळखू शकत नाही याहून जास्त वेदना देणारी कोणती गोष्ट असेल


पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी आणि जस काहीच घडलं व कालांतराने जयाच्या तब्येतीत फरक जाणवू लागला व ती बऱ्यापैकी बरी होत होती देवाचे हे सगळ्यांनी खूप खूप आभार मानले शंकर रावांना ही आता आपली चूक कळाली होती त्यांनीही यापुढे जयाला त्रास न देण्याचा निर्णय घेतला व आपल्या व्यसनावर निर्बंध घालायचा प्रयत्न करायचे ठरवले व या वीस पंचवीस दिवसांत शंकर रावांनमध्ये आणि मुलांमध्येही चांगला संवाद होत होता माधवीही तिला हवे तसे बदल आता शंकररावा मध्ये दिसत होता जयालाही तेच हव होतं सर्वांनी आता एकमेकांना समजून घेण्याचे ठरवले होते आपण आपल्या एका माणसाला गमता गमावता वाचलो आहोत याची जाणीव सर्वांना होती आणि आता सगळ्यांनी म्हणून जयाला आधार देण्याचे ठरवले होते माधवी आता जयाची आई झाली होती घरी गेल्यावर माधवीने जय याची सर्व जबाबदारी घेतली माधवी आता नेहमी आपल्या आईचं बोलणं ऐकायची व तिला समजून घ्यायला लागली होती ज यालाही माधवीचा हा बदल दिसत होता माधवी आणि जया मध्ये आता छान अशी मैत्री झाली होती त्यांना आता दुसरी कोणतीच मैत्रिणीची गरज नव्हती घरातील परिस्थिती आता सुधारू लागले होती जयाला ही तेच हवं होतं काही मानसिक आजार आता निघून गेला सर्व काही सुरळीत चालू झालं.


मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगते मी तुझी जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका त्यांच्यावर भरभरून प्रेम करायला शिका कारण गेलेले दिवस पुन्हा कधीच येत नसतात आणि आपल्या आई-वडिलांना पेक्षा खरं प्रेम आपल्यावर दुसरं कोणीच करू शकत नाही आयुष्यात मित्र मैत्रिणी असुद्यात पण एकदा तरी मुलींनी आपल्या आईशी आणि मुलांनी आपल्या वडिलांचे मैत्री करून पहा ते कधीच आपला साथ सोडणार नाहीत आणि आपल्याला कधीच धोका देणार नाही...              


Rate this content
Log in