End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

sachin thakur

Others


2  

sachin thakur

Others


माझी आई कविता

माझी आई कविता

3 mins 133 3 mins 133

‘आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी

प्रीतीचे माहेर सौभाग्याचे सार अमृताची धार आई माझी ‘


“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”, हे आपण ऐकलं आहेच, पण खरोखर कधी मानलं आहे का? आई सारखी ओरडत असते, हे कर ते नको करू, दिवसभर उन्हातून खेळून घरी उशिरा आलं की पाठीत धपाटा ही मारते; आपण नेहमीच आई बद्दल तक्रार करत असतो, नाही का?


समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी व आकाशाचा कागद करून आईचे गुणगान लिहिण्यासाठी बसलो तरी आईची माया लिहून संपणार नाही. म्हणूनच तर म्हणतात ‘आई’ ही दोन अक्षरे हृदयाच्या मखमली पेटित जपून ठेवली पाहिजेत. आपल्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंत आपल्या मुलाच्या सर्व व्यथा फक्त आणि फक्त आपली आईच समजू शकते. आपल्या कल्याणासाठी आई रागावते पण त्यामागच्या भावना मात्र फार वेगळ्या असतात. आईच्या मायेतच इतकी ताकद आहे की रागापेक्षा अवखळपणे केलेले प्रेम अधिक लक्षात राहते. जगातील कशाचीही जखम भरून काढता येईल पण आईच्या विरहाची कमतरता कधीच भरून काढता येणार नाही.


पण मग तो दिवस येतो, जेव्हा आपण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरा बाहेर पडतो. आता कोणी ओरडायला नाही, किती मज्जा ना. असते खरंच मजा, पण पहिले दोन दिवस फक्त. आणि मग ते मेस चे जेवण, चुकून कापलेलं बोट, आईची आठवण काढते. आता तर मोठे झालो आहोत म्हणून अश्रू रोखतो, पण नंतर ढसा ढसा रडतो. घराचे वेध लागतात. कॉलेज सुरु होऊन चार दिवस नाही झाले तर लगेच घराकडे पळ काढतो. आई शेवटी आई असते, तिला कळत तुम्ही का आला आहात, तुम्ही आता मोठे झालात, मान्य करणार नाही की आईची आठवण आली. पण आईला ते माहित असत. बाबा ओरडतात, आई काहीही बोलत नाही. स्वयंपाक घरात तुमचे आवडते जेवण, गोड धोड बनवत असते. अशी असते आई.


पण आताच्या आधुनिक जगात आपण इंटरनेट, सोशल मीडिया च्या जाळयात असे काही गुंततो की आई वडिलांचे प्रेम कधी कळतच नाही. ज्यांनी हजारो रुपये भरून, दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून इंग्लिश मिडीयम शाळेत टाकले अशा आई, वडिलांना इंग्रजी येत नसेल तर आपल्याला त्यांची लाज वाटते. सोशिअल मीडिया वर कूल वाटण्यासाठी, हैप्पी मदर्स डे ची आई सोबतची सेल्फी पोस्ट करतो, पण आईला कधी सामोरा-समोर विश करत नाही. आई स्वयंपाक घरात भांडी घासत असते आणि आपण सेल्फी वरचे लाइक्स मोजत असतो. एक प्रश्न विचारा स्वतःला, आई वडिलांची किंमत मात्र सेल्फी एवढीच राहिली आहे का?


या २१ व्या शतकात, स्त्रियाही उच्च शिक्षण घेत आहेत, घरा बाहेर पडत आहेत, नोकरी करत आहेत. वडिलांसारखेच आई ही घराची जबाबदारी घेत आहे. स्त्री आता पुरुषांच्या समान आहे. मला तर, नोकरी करून घर सांभाळणाऱ्या आईचे कौतुक वाटते. घर, मुलं, नाती सांभाळणंच इतकं कठीण असते, ही सारी कर्तव्य पार पाडून ती आई नोकरी पण करते. चांगल्या करिअर साठी झगडत असते. एवढं सगळं फक्त एक आईच करू शकते. कुठून येते तिच्यामध्ये एवढी हिम्मत आणि ताकत? कधी विचार केला आहात का? आपल्या मुलांवरचे प्रेम, घरावरचे प्रेम तिला ती ताकत देत. आपणही तिला साथ देऊयात, तिची हिम्मत वाढवूयात.


भाग्यवान आहोत की आपल्याला प्रेम करणारे आई वडील आहेत, जरा विचार करा त्या अनाथ मुलांचा. त्यांना विचारा आई वडिलांची किंमत. उद्या आपण मोठे होऊ, आज ना उद्या ती आपली साथ सोडून जाईल, तेव्हा रडत बसण्यापेक्षा आज आपल्या आईवरचे प्रेम व्यक्त करा. तिला घर कामात थोडी मदत करा, भाजीची जड पिशवी तिच्या हातातून घ्या. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तिला खूष करतील. जेव्हा कमवायला लागल तेव्हा पहिल्या पगारातून आईसाठी एक साडी आणा. तिला साडीच कौतुक नसते, पण त्यातून तिला तुमचं प्रेम कळत. तिला आपल्या बद्दल आपुलकी वाटते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो.


पैसे कमावण्याच्या, मोठे होण्याच्या स्पर्धेत तुम्ही आई वडिलाना विसरून जाता, त्यांच्या कडे दुर्लक्ष करता. तुम्ही कितीही मोठे व्हा, जग जिंका पण जर का तुमची आई तुमच्या सोबत नाही तर, ते सगळं निरर्थक वाटत.


म्हणून, परत एकदा म्हणावेसे वाटते “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”


Rate this content
Log in