Jayashree Patil

Others

4.3  

Jayashree Patil

Others

माझे पर्यटन

माझे पर्यटन

8 mins
368


युनेस्कोने गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील "राणी की वाव" या ऐतिहासिक वास्तूचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केला, याचा मला खूप आनंद झाला .या बातमीमुळे आम्ही नुकत्याच केलेल्या गुजरात ट्रीपच्या स्मृती जागृत झाल्या. राणी की वाव बघितल्यानंतर मी सुद्धा खूप भारावून गेले होते. वाव म्हणजे विहिर, राणीने बांधलेली लोकोपयोगी इतकी सुंदर विहिर. विहीर बांधण्याची तिची कल्पना व त्यामागील इतिहास सर्व काही थक्क करणार होत. आपल्या भारतात असे काही लोक, राजे, राण्या होऊन गेल्या आहेत, की त्यांच्या पराक्रमाने , युक्तीने कल्पकतेने, प्रजेसाठी, स्वातंत्र्या साठी केलेल्या बलिदानाने आपला माथा आदराने आपोआप नतमस्तक होतो. आणि या सर्व गोष्टी ऐकून आपल्यालाही गर्व होतो, आपण भारतीय असल्याचा. असा भारत अनुभवायचा असेल, जग अनुभवायचा असेल तर पर्यटना शिवाय, बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. मी पर्यटनाची सुरवात केली किंवा मी जे काही पर्यटन केले आहे ती माझ्या दोन सुरेखा व पुष्पा मावशी मुळे. त्या दोघींनी केलेल्या आग्रहामुळे मला खूप चांगली ठिकाणं पहायला मिळाली. आम्ही सगळ्यांनी एकत्रीत घालविलेला काळ व त्याच्या सुखद आठवणी आयुष्यभर सोबत राहतील. त्यांच्या अनुभवाचा मलाही खूप फायदा झाला. 

आपला भारत किती विविधतेने नटलेला आहे हे भारत फिरल्या शिवाय कळणार नाही.केल्याने पर्यटन, मनुजा येत असे शहाणपण, हया पंक्तीची प्रचिती प्रत्येकालाच येते. पर्यटन हे नुसत फिरण असत नाही. तर तो एक अनुभव असतो ,अनुभुती असते. एखादया ऐतिहासिक ठिकाणी विरश्रीने आणि बलिदानाने पावन झालेला इतिहास असतो. एखादया धार्मिक ठिकाणी शांती, समाधान, मुक्ती, तृप्ती, दिव्यत्वाची प्रचिती देणारी मंदिर, समाधीस्थळ असतात. काही ठिकाणची भव्यता अचंबित करणारी असते . काही ठिकाणची कला कौशल्य मन थक्क करणारी, डोळ्याचं पारणं फेडणारी असतात. कलाकारांचं कौतुक करणारी त्यांना धन्यवाद देणारी असतात. पुन्हा पुन्हा पर्यटनाला जावं असं वाटणारी असतात. ज्या ठिकाणी आपण जातो तिथली संस्कृती, परंपरा, भाषा, राहणीमान, रितीरिवाज आहार, आवडी निवडी आणि तिथल्या लोकप्रिय व्यक्ती यांची आपल्याला माहिती मिळते. पूर्वीच्या काळातील अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळतात. त्या काळात आपण हरवून जातो. निसर्गाच्या सनिध्यात,प्रदुषनमुक्त, अल्हाददायक वातावरणात आपल्या मनावरील ताण कमी होतो. एवढंच नाही तर काहीवेळा आपल वजनही वाढत बरं का! आणि आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांचा अभ्यासही होतो.

डोळस आणि अभ्यासपूर्वक होणाऱ्या पर्यटनाबरोबर मला आणखी एका गोष्टीचं वेड लागलं ते म्हणजे परदेशी पर्यटकांबरोबर संवाद साधण्याचं. आपण पर्यटनासाठी बाहेर पडल्यानंतर आपल्याला कुठे ना कुठे तरी परदेशी पाहुणे नक्कीच दृष्टीस पडतात. त्यांच्याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल असत. असं कोणी तरी दिसल की मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. ते कोणत्या देशातून आले आहेत. त्यांनी भारतात काय काय पाहिल, त्यांना भारताबद्दल काय वाटत, भारताबद्दल त्यांचा दृष्टीकोन कसा आहे, भारताबद्दल त्यांना काय माहित आहे अशा अनेक गोष्टी मला जाणून घ्यायच्या असतात. आता तो माझा छंद झाला आहे.

हे असे अनुभव घेणं, ऐकणं आणि सांगणं मला खूप आवडायला लागलं आहे. खरं तर मला इंग्रजी फार काही चांगल बोलता येत अस नाही, पण जाता जाता चार शब्द बोलायला आणि माहिती घ्यायला तसेच संवाद साधायला त्याची फारशी अडचण वाटत नाही. एखादा शब्द किंवा एखाद छोट्स वाक्य समोरच्याला बोलत करायल खूप असत. अर्थात समोरचाही तेवढाच दिलदार असायला हवा हे नक्की.

एकदा मला एका मंदिरामधून सात आठ परदेशी पाहुण्या बाहेर पडत असलेल्या दिसल्या. मी तिथे जाईपर्यंत बर्याच जणी पूढे गेल्या होत्या .परंतु शेवटची एक पाहुणी गाठण्यात मी यशस्वी झाले. Grood morning . How do you do म्हणून मी बोलायल सुखात केली, where from म्हटंल्यानंतर तिने सांगायला सुरवात केली. तिने सांगितले की,आम्ही अमेरिकेतून आलो आहोत, आम्ही खूप वेळा Indiaत येतो, आम्ही पुण्यामध्ये ओशोंच्या आश्रमात येतो आणि आज आम्ही तिकडेच परत जाणार आहोत. सगळ्यानांच पुढे जाण्याची गडबड असल्याने मी One Photo Plz म्हंटल. आम्ही फोटो घेतला. त्यावर तिने मला विचारला why are you taking my photo मी खळखळून हसले. आणि म्हटल' I will show it to my friends & will tell them, See my american friend.' या माझ्या उत्तराने तिची साशंकता संपून एक सुंदर हास्य तिच्या चेहर्यावर आलं.

गुजरात ट्रिप मध्ये आम्ही नुकताच गिरनार पर्वत चढून आलो होतो. आमचे पाय खूप दुखत होते. सकाळी उठून आम्ही अहमदाबादच्या एका हॉटेलमध्ये नाष्टा करत होतो. आमच्या पासून थोड्याच अंतरावर एका स्वतंत्र व स्पेशल जागेवर एक निग्रो जोडप नाष्टा करत होतं. राहून राहून माझं लक्ष त्यांच्याकडे जात होतं. अगंबाई माणसातला हत्तीच की काय वाटावं असं तिच रूप होत. काळा कुळकुळीत रंग, प्रचंड उंची तेवढीच प्रचंड जाडी, जाड कातडी, मोठे डोळे, मोठे नाक ते पण पसरट, मोठे कान, जाड जाड ओघळल्यआ सारखे ओठ, बारीक केसांच्या ओढून ओढून कपाळापासून घातलेल्या बारीक बारीक वेण्या आणि त्यावर भडक रंगाचा बटबटीत मोठी मोठी फुलं असलेल मोठा फ्राँक. आपल्या भारतीय संस्कृतील न भावणारे सौंदर्य. आम्ही आणि ते सगळेच नाष्टा करता असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही मला. पण आम्ही हॉल मध्ये आलो आणि आणखी एक निग्रो जोडप कोणाची तरी वाट पहात असलेलं दिसलं. आमचे टिम मैनेंजरही नाष्टा करून येणार होते. त्यामुळे आम्हालाही वेळ होता. ही संधी मी साधली आणि स्माईल देत Hi म्हंटले Good morning, How do you do या माझ्या प्रश्नाला तिने fine असं उत्तर दिल. How do you do नंतर आमचा संवाद सुरू झाला.

वरती पाहिले होते त्यापेक्षा हे दोघेही खूप बारीक होते. Where from असं विचारल्यानंतर तिने नायजेरिया असं सांगितलं. first time असं विचारल्यानंतर तिने yes म्हंटले. माझे मिस्टर नेहमी येतात बिझनेसच्या कामासाठी असं सांगितलं. गुजरात पाहिले का? मी विचारलं.नाही अजून. मग काय पाहिलंत, कसे आलात असे विचारल्यानंतर तिने सांगितले दुबई मार्गे आलो. केरळ पाहिले आणि आज गुजरात पाहणार आहे. केरळ आवडले का ? ठिक आहे. या उत्तराने मी नाराज झाले. ग्रुपनी आलात का नाही मी आणि माझा नवरा. मॅनेजरची वाट पाहत आहोत. मग तिनही मला सगळं विचारायला सुरुवात केली मी सांगितलं, आम्ही ग्रुपने आलो आहोत माझे मावशी काका व त्यांच्या मैत्रीणी असे १०-१२ जण आहोत. माझ्या मिस्टरांनां इलेक्शन ड्युटी असल्याने ते येऊ शकले नाहीत. आम्ही महाराष्ट्र स्टेट मधून आलो आहोत. मुंबई सांगितल्यानंतर तिला लगेच कळलं. मुंबई-पुणे-सांगली कोल्हापूर सिटी मधून आलो आहोत. आम्ही सगळे शासकीय, निमशासकीय सर्व्हिस मध्ये आहोत. काय आवडल? काय घेतल? तेव्हा तिने चहा घेताला फक्त एवढेच सांगीतल. गुजरातमध्ये काय काय पाहायला आहे यावर बोलणं झालं.ज्वेलरी पण मिळते असं म्हंटल्यानंतर तिने सांगायचा सुरवात केली. आमच्या कडे खूप गरीबी आहे. खायला अन्न सुद्धा मुश्किलीने आणि जरुरी पुरते मिळते. ज्वेलरी आणि दुसऱ्या देशात फिरायला जाणे ही खूप दूरची गोष्ट आहे. आणि मला आफ्रिकन कुपोषित बालकांचे फोटो पाहिल्याचे आठवले.तिने तिथल्या अनेक गोष्टी सांगितल्या. बोलता बोलता तिने अचानक which religion you have असा प्रश्न केला. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. आपण बाहेर फिरायला आनंद घ्यायला काही नवीन गोष्टी माहिती करून घ्यायला आलेलो असताना रिलीजन चा विषय मला थोडा विचित्र वाटला. हे प्रश्न आपल्याही मनात येतात पण आपण लगेच असं कोणाला विचारात नाही.we all are hindus. मग मी विचारलं. Your religion तिने सांगीतलं Muslim Christians पुन्हा ती मला म्हणाली in india there are many black people like us तिने अगदी तिच्या हातावर बोट फिरवून मला दाखवलं. हेही माझ्यासाठी आश्चर्यच होत.मी तिला हसत हसत म्हणाले हो काळ्या रंगाचे लोक आहेत. पण तरीही थोडा फरक आहे आणि तुमचे कर्ली हेयर्स आणि या बारीक वेण्या या हेअर स्टाईल वरून तुम्ही आफ्रिकन आहात हे ओळखू येते. It's your speciality, चला आपण एक फोटो घेऊयात असे म्हणून मी विषय बंद केला. मी ज्या उत्साहाने बोलायला गेले होते. तो उत्साह माझा पार ओसरला होता. भारताबद्दल तिचं मत ते बिलकुल सांगत नव्हती. माझ्या मैत्रीणी मला हसून म्हणाल्या, कशाला काढला फोटो काय बघितलं तिच्यात. मला तर कुणी लाख रुपये दिले असते तरी यांच्या बरोबर फोटो काढला नसता. तू पण ना असं म्हणत. आम्ही सगळे हसलो.

फोटो काढून झाल्यानंतर गडबडीने आम्ही राणी की वाव बघायला गेलो. मी जात असताना विचार केला ती धर्म आणि कलर या दोन गोष्टी विचारून आपले जवळचे कोणी आहे का पाहत असावी कदाचित त्यामुळे अधिक जवळीक निर्माण झाली असती किंवा आपले कोणीतरी या दूरच्या देशात आपले आहे असे वाटले असते. असा सकारात्मक विचार मी केला. आम्ही गाडीतून उतरलो आणि भल्या मोठ्या बागेमधून चालू लागलो त्या मैदानात अतिशय सुंदर हिरवळ होती. मोठमोठी झाडे होती .तिथून जात असतानाच आम्हाला एक पुरुषांचा ग्रुप दिसला. ज्यांनी पारंपारिक पोशाख केलेला होता. आपल्याकडे वारकऱ्यांचा ग्रुप किंवा पुढार्‍यांचा ग्रुप असतो तसा. अतिशय पांढरा स्वच्छ सदरा आणि धोतर आणि पगडी असा त्यांचा वेश होता धोतर नेसण्याची पद्धत खूपच वेगळी होती. पण छान वाटली. थोडे पुढे गेल्यानंतर राणी की वाव आली आणि आम्ही पायऱ्या उतरायला लागलो. एक एक मजला करत आम्ही काही मजल्यापर्यंत खाली गेलो. अतिशय सुरेख कलाकुसर चहुबाजूने होती. मावशीची मैत्रीण मला म्हणाली ,"राणी की वाव म्हणजे विहीर हे मला माहीत नव्हते .आपण चालत असताना राणी की वाव म्हणजे एखादा राणीचा महाल असेल आणि तो अजून कसा दिसत नाही याचं मला आश्चर्य वाटत होतं. पण मला आत्ता कळलं की राणी की वाव म्हणजे विहीर आहे". "आणि विहीर ती पण इतकी सुंदर असू शकते हे इथे आल्यानंतरच समजले. राणीची आहे ना",मी म्हणाले.असे म्हणून आम्ही हसू लागलो. बऱ्याच वेळानंतर आम्ही वर यायला निघालो. तेव्हा मला पुन्हा युरोपियन्स दृष्टीस पडले. चार गोऱ्या स्थूल अशा वयस्कर बायका आणि एक वयस्कर पुरुष दिसले. परंतु ते आमच्या पलीकडच्या बाजूला होते. त्यांचा गाईड त्यांना माहिती सांगत होता. आणखीन दोन मजले चढून आम्ही वर आलो. आणखीन एक युरोपियन तरुण जोडपं आणि त्यांची दोन लहान मुलं फोटो काढत होते. मला पाहिल्यानंतर तो माणूस त्याच्या बायकोबरोबर काहीतरी बोलला आणि माझ्याकडे आला. तो मला फोटो काढण्यासाठी रिक्वेस्ट करत होता .तो खूप काही बोलत होता. पण फ्रेंच मिश्रीत इंग्लिश आणि फास्ट बोलत असल्यामुळे मला ते फारसं समजत नव्हतं. मी त्यांना ओके ओके म्हटलं. आणि त्याच्या बायकोने आमचा फोटो काढला. त्या दोघांनी मलाच का फोटोसाठी रिक्वेस्ट केली याचा विचार करताना माझ्या लक्षात आलं की तिथे असणाऱ्या सगळ्याच स्त्रियांनी सलवार कमीज घातलेली होती .फक्त मी साडी मध्ये आणि दागिन्यांमध्ये होते. म्हणजे पूर्ण भारतीय पारंपारिक वेशात मी होते आणि त्यामुळेच त्यांनी मला फोटोसाठी रिक्वेस्ट केली होती. मी त्याच्या बायकोला विचारले where from तेव्हा तिने सांगितले पॅरिस. पॅरिस चे नाव ऐकल्यानंतर मला पॅरिस बद्दल जे जे वाचला होता ते सर्व आठवलं. मी नाईस कंट्री असं म्हणाले आणि नेहमीप्रमाणे भारताबद्दल विचारले. विचारल्याबरोबर ती एकदम एक्साईट झाली आणि तिला किती बोलू आणि किती नको असं झालेलं होतं. तिच्या चेहऱ्यावरून तिला भारत आवडल्यास जाणवत होतं आणि तिला खूप काही बोलायचं होतं परंतु ती फ्रेंच बोलत असल्यामुळे मला फारसं समजत नव्हतं याचं मला वाईट वाटलं. एव्हाना आमचा सगळा ग्रुप कालच्या गिर्यारोहणामुळे थकलेला खूप पुढे गेला होता. अनोळखी ठिकाणी मी सुद्धा चुकायला नको व इतरांना त्रास नको म्हणून त्यांना sorry I have to go now. Nice to meet you असं म्हणून by by करून निघाले. पण एकाच दिवशी घेतलेले हे दोन्ही अनुभव मला खूप आनंद तसेच छान अनुभव देऊन गेले.



Rate this content
Log in

More marathi story from Jayashree Patil