Vrushali jadhav

Others

3.5  

Vrushali jadhav

Others

माझे दादा

माझे दादा

4 mins
117


My Dad My Hero !!! "माझे दादा" पितृ दिनाचा हार्दिक शुभेच्छा !!!

माझे वडील सखाराम सोनवणे , आम्ही सर्व त्यांना दादा म्हणतो, दादा आमचे शेतकरी, त्यांच शिक्षण १० वी पर्यंत झालेले, त्यांना नेहमी दुसऱ्यांची काळजी असते . त्याना एकेकाळी शिपाई म्हणून नोकरी लागली होती, पण त्यांचा दुर्दैव असे कि सहा महिन्यानंतर त्यांचे वडील गेले, घरात ६ भाऊ १ बहीण आणि आई. असा मोठ्ठा परिवार होता. सर्व जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे नोकरी सोडावी लागली होती. मग ते शेती आणि जोडधंदा म्हणून धान्याचा व्यापार करत होते. एकंदरीत त्यांनी सर्व कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. मग दादा आठवडे बाजार करायचे. एकदा काय झाले दिवाळी समोर आली होती, नवीन कपड्यांसाठी आणि सॅंडल साठी मी हट्टाला 


पेटून उठली होती, घरात लहान असल्यामुळे मी खूप लाडकी होती तशी अजून पण आहे. तेव्हा दादा बोलले कि आत्ता नको नंतर घेऊ या , पण मी काही ऐकत नव्हती, त्यांना नंतर काय वाटले माहित नाही, ते म्हटले कि रविवारी शिर्डीच्या बाजारात घेऊ. असा बोलल्यावर मी थोडी शांत झाले. रविवार आला , आम्ही दोघे गेलो शिर्डीच्या बाजारांत, दुकान लावायला गेलो होतो, दुकान लावल्यानंतर आम्ही आवाज देऊ लागलो , पण सकाळची वेळ असल्यामुळे ग्राहक येत नव्हते. मग दादा म्हटले ग्राहक नाही तोवर आपण कपडे घेऊन येऊ. कपडेवाले काका दादांचे वर्ग मित्र होते. ते दादांशी बोलत असताना मला खूप सुंदर ड्रेस वर नजर पडली. तो खूप महाग होता. मला दादा म्हटले दुसरा घेऊ, पण मी ऐकत नव्हते, मग दुकानदार काकांनी माझी बाजू लावून धरली, दादा म्हटले अजून धंदा झाला नाही, एवढे पैसे नाहीत , तर ते दुकानदार काका म्हटले नंतर दे, उरलेले पैसे... 


    त्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला,,, दादा तेव्हा माझ्यावर चिडले पण होते आणि तसे ते पुट्पुटत पण होते , "झाले तुझ्या मन सारखा , अजून धंदा पाणी नाही " मग मी म्हटले " दोन तासात तुमचा सर्व माल संपून जाईल " पण माझा चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांचा राग मावळून गेला होता. आणि त्या दिवशी दादां ला एका पोत्यात चांगला नफा मिळाला होता. मग दादा खुश झाले होते. त्यानंतर दादांनी मला सॅंडल आणि सॉक्स घेतले. मी खूपच खूश झाली होती , तोच क्षण मला कधी न विसरण्या जोगा आहे, त्या दिवशी कपडे आणि सॅंडल या दोन गोष्टी मी सर्वाना कौतुकाने दाखवत होती.  


त्यानंतर दादा ऐके दिवशी माझा शाळेत आले होते, त्यांना माझ्या सरांनी बोलावलं होत, तशी मी शाळेत खूप हुशार होती आणि खोडकर पण होती, दादा आले हे मला समजल्यावर मी घाबरले, मला वाटले कि आता माझी तक्रार करणार कि काय..... पण सरांनी मला गणित प्रबोधिनी परीक्षासाठी बसवले होते म्हणून त्यांनी दादांना बोलावले होते, तशी परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होती. तिथे घेऊन जाण्यासाठी सांगितले होते, परीक्षा रविवारी असल्याने, हा तर धंद्याचा दिवस महत्वाचं होता, दादांला प्रश्न पडला होता ,तरी दादा मला वेळेवर परीक्षा साठी घेऊन गेले, धंदा पाणी सोडून ते परीक्षा ठिकाणा बाहेर माझी वाट बघत बसले होते. सर्व लक्ष त्यांचे धंद्या कडे होते, तरी दादांनीनी मला विचारले, "पेपर कसा सोडवला?" मी म्हटले खूप छान होता , थोड्या दिवसानी निकाल आला, मी राज्यात तिसरी आलीय हे समजल्यावर माझे दादा सर्व गावात सांगत होते , जणू काही मला सरकारी नोकरी मिळाली..... तो पण अस्मरणीय राहिला, 


त्यानंतर दादाला माझी कधीच काळजी वाटली , ती हुशार आहे आणि काही जरी झाले तरी मी त्यांना सांगणार असा त्यांना विश्वास होता, त्या नंतर एकदा त्यांना मोबाइलला घायचा होता, माझा लग्नानंतर ची हि गोष्ट आहे, त्यांनी मला मोबाइल वाल्याच्या मोबाईल वरून कॉल केला आणि मला विचारले, कुठला मोबाइल मी घेऊ म्हणून, म्हणजे सांगायचं असा कि दादा ला माझे विचारल्याशिवाय काही वस्तू घेत नाही, मी पण त्यांची रोज फोनवर विचारपूस करत असते . अजून पण मी त्या घराचा हिस्सा आहे अशी जाणीव ते करून देतात. कोणताही निर्णय ते मला विचारलाय शिवाय घेत नाही, याचा मला अभिमान आहे. 


सध्या तर, कोरोनाचा काळ आहे. थोड्या दिवसापूर्वी मला कोरोनाची लागण झाली होती. मला दादानी त्यावेळी फोन वर जे शब्द बोलले ते आणि ती धीर देण्याची पद्धत वेगळीच होती. "हिम्मत हारु नको, तू जर हारली, खचली तर सर्वच संपला , तुझ deposit जप्त होईल. कुणाची काळजी करू नको , मी भक्कम आहे. तू तुझी काळजी घे"! आता माझे दादा ६५ वर्षांचे आहेत अजूनही ते खूप मेहनत करतात.... सर्वांना कोरोना झाला होता पण सुदैवाने त्यांनी लस घेतल्यामुळे त्यांना काही त्रास झाला नाही , त्या वेळी ही त्यांनी सर्वांची काळजी घेतली, टेस्टपासून तर सर्व बरे होईपर्यंत....अजून पण ते घरातील सर्व कामे ते स्वतः करतात, गाईंची काळजी ते खूप करतात, त्यांचा चारापासून दूध डेअरीपर्यंत देणे, अशा सर्व गोष्टी ते करत असतात. ते आमचे आधारस्तंभ, आधारवड आहेत. अजून ही खूप कडक आणि मेहनती आहेत ....मला त्यांचा सार्थ अभिमान आहे.. 


Rate this content
Log in

More marathi story from Vrushali jadhav