Shubham bhovad

Others

4.2  

Shubham bhovad

Others

माझा आवडता ऋतू...

माझा आवडता ऋतू...

1 min
202


❤️कुणा आवडे पावसाळा, तर कुणा आवडे हिवाळा,❣️

❣️पण माझा मनपसंत आहे ऋतू उन्हाळा.❤️

❤️उन्हाळ्यात असते शाळांना सुट्टी,❣️

❣️मामा, मावशी, आत्या येतात घरात होते दाटी.❤️


    आपण सर्वजण मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असताना कोणी विचारले की "तुझा आवडता ऋतू कोणता” तर कदाचित सर्वांचेच उत्तर पावसाळा किंवा हिवाळा असेच असते.कारण पावसाळ्यात निसर्ग हिरवागार शालू नेसून नटलेला असतो अन् हिवाळ्याची⛄☃️ गुलाबी बोचरी थंडी मनाला भुरळ घालते.पण उन्हाळा म्हटले की एकाएकाची तोंडं बघण्यासारखी होतात; काय तर म्हणे उन्हाळ्याचे 🔥🔥कडक ऊन अंगाची लाही लाही करून सोडतो.अरे,पण तोच उन्हाळा आम्हा मुलांसाठी सुखदायी असतो हे कुणाच्या ध्यानातच येत नाही.


   उन्हाळ्याचे वाढलेले तापमान देखील आम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जाते.हा उन्हाळा आपल्यासाठी फळांचा राजा आंबा🥭🥭🥭, अमृततुल्य फणसाचे गरे🥝🥝, काजू, कोकणची काळी मैना करवंद हा सर्व मेवा आपणासमोर हजर करतो.आपल्या कोकणात या उन्हाळ्यामध्ये कुणाच्या घरी लग्न, कुणाच्या घरी पूजा वगैरे वगैरे काही ना काही प्रत्येक दिवशी असते.त्यामुळे आम्हा मुलांची एक वेगळीच चंगळ असते.आणि प्रत्येकाच्या मनातला आवडीचा विषय म्हणजे क्रिकेट.अन् या क्रिकेटच्या टुर्नामेंटदेखील या उन्हाळ्यामध्येच असतात.आई कैरीचे पन्हे, लोणचे,कोकम सरबत, आंब्याची साठ, पापड, कुरडया आणि नानाविध प्रकारची मनाला सुखावणारी पेये या उन्हाळ्यामध्येच करते.ते खायची मजा काही औरच...!अशा या उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी नदीच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याची एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते.माझ्या मते,हा उन्हाळा म्हणजे उसंत नाही असा ऋतूच जणू...जो प्रत्येकाला आयुष्यभराच्या सुंदर आठवणी देऊन जातो.❣️💕❤️


    म्हणूनच मी या उन्हाळ्याच्या प्रेमात पडलो, पडतो आणि अखंड, अविरत, सदैव, शेवटच्या श्वासापर्यंत पडत राहिन अन् राहिनचं...!❣️❣️❣️


Rate this content
Log in