लता
लता


लताला जाऊन आज २५ वर्षे झाली. पण आज का कोण जाणे तिची खूप आठवण येतेय. लता एका गरीब हवालदाराची मुलगी. त्यादिवशी अण्णा घरी लवकर आले. त्यांनी आईला आवाज दिला,अग ऐकलस का उद्या बेबीला बघायला पाहुणे येणार आहे.दुसऱ्यादिवशी बरोबर बारा वाजता पाहुणे आले. आईने लताला बाहेर पाणी घेऊन जाण्यास सांगितले. अण्णांनी ओळख करून दिली. आंनंदला लता आवडली. लतालाही आनंद आवडला.
लताचे लग्न झाले आणि माहेरची माया डोळ्याआड लपवून लताने सासरच्या घरी गृहप्रवेश केला. थोड्याच दिवसात आनंदच्या प्रयत्नाने लताला एका शाळेत हस्तकला शिक्षिकेची नोकरी मिळाली. त्यांनी एक छोटीशी खोली घेतली. प्रसंगी जुन्या वर्तमानपत्राची अंथरुणे झाली. पण लताने काही हू का चू केले नाही. यातच लताला कन्यारत्न प्राप्त झाले. आनंदला मात्र मुलाची आशा होती. तिने खूप प्रेमाने मुलीचे संगोपन केले, तिला वाढवले. काही दिवसांनी पुन्हा लता गरोदर राहिली. दुसऱ्या वेळेसही मुलगीच झाली. पुन्हा आनंद थोडा नाराज झाला. मुलाच्या आशेपायी आनंदने पुन्हा केलेल्या प्रयत्नामुळे लता तिसऱ्यांदा गरोदर राहिली, पण तिसऱ्यांदा ही मुलगीच झाली.
लता मात्र रात्रंदिवस मुलींची चिंता करून आतल्या आत खंगत गेली. तिला दम्याचा त्रास होऊ लागला. खूप औषध पाणी केले तरी तिला काही फरक पडला नाही. पुष्पाला दम्याची उबळ आली आणि तिला असह्य वेदना होऊ लागल्या. आनंदने तिचे डोके उचलून मांडीवर ठेवत नाही तो पर्यंत तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या तिन्ही मुलींना पोरकी करून पुष्पा निघून गेली. आयुष्यभर ज्याने त्रास दिला त्याच्याच मांडीवर तिने अखेरचा श्वास घेतला खरी पतिव्रता होती ती. मुलाची आस आणि पैशाला हपापलेल्या आनंदने तिला आयुष्यभर सुख लाभू दिले नाही. आनंदसारख्या माणसाच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली पण त्या तीन मुलींच्या मनातील तिची जागा मात्र कोणी घेऊ शकत नाही आणि कोणी घेणारही नाही...