लक्ष्मीची दिवाळी
लक्ष्मीची दिवाळी
लक्ष्मीची दिवाळी.
सायंकाळची वेळ होती. लक्ष्मी पूजन सुरु होणार होते. नवरा तयार होऊन बसला की पुढच्या क्षणातच एक आवाज ऐकू आला. अहो ताई दार उघडता का , मी लक्ष्मी तुमची आधीची मोलकरीण. ते सर्व पाहून आम्ही चकित झालो. चेहऱ्यावरचे तेज गेले होते , अंगावर फाटके कापड होते. ती दुखी आणि नाराज पण दिसत होती. तेव्हा आम्ही तिला थोडे खायला देऊन तिचा तिला चांगला फराळ देऊन तिची विचारपूस केली. त्यात असे कळून आले की खूप नुकसान असल्यामुळे तिच्या नवऱ्याने किराण्याचे छोटे दुकान बंद पडले. पैशाची गरज होती आणि आशेचा किरण म्हणून भेट दिली. तशी तिची ती इच्छाच पूर्ण केली चार पैसे मोजून. एक समाधानी भाव आणि आनंद पण झाला होता. आता निरोप घेऊन निघायचे असताना तिने लॉटरी चे तिकीट हाती ठेवून म्हणाली देण्यासारखे काही नाही म्हणून हा कागदाचा तुकडा कदाचित तुमचे नशीब बदलेल. निकाल अजून यायचा आहे. माझ्या राशीला धन योग फार सा नाही.
काही दिवसांनी दिवाळी संपली, आणि अखेरीस तो दिवस आला ज्याची अपेक्षा नव्हती , हो त्या जोडप्याला जणू १० लाखाची लॉटरी लागली होती. त्यांनी दरमाह तिला घर खर्च, मुलाचे शिक्षण म्हणून पैसा देण्याचे कबूल केले.
आता प्रश्न असा की खरी लक्ष्मी कोण. ती जी दारी आली होती जिला सुख, समाधान आले की ती ज्यांच्या नावाने त्यांच्या फोटोची आपण आरती करतो. लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे , त्याची व्याख्या सुख समृद्धी आनंद , प्रगती असे देखील असते.
कौस्तुभ
