STORYMIRROR

RAHUL SHINDE

Others

3  

RAHUL SHINDE

Others

लहानपणीचा पावसाळा

लहानपणीचा पावसाळा

2 mins
194

            लहानपणीचा पावसाळा आता जबाबदारीच्या पुरात वाहून गेला असला तरी लहानपणाचा पावसाला सर्वांसाठीच एक गोड आठवण असते. येरे येरे पावसा तुला देतो पैसा ही कविता सगळ्यांनाच माहित आहे पावसाळा म्हटलं की मला आठवते माझे बालपण संध्याकाळचे पाच वाजले होते शाळा सुटायची वेळ झाली होती तेवढ्यात गच्च पाण्याने साठलेला ढग सूर्याला आपल्या पाठीवर घेऊन पहिल्या पावसाची चाहूल देत होता गार वारा सोबत थेंब थेंब पाऊस बरसू लागला. शाळेमध्ये किलबिलाट करणारे आम्ही पोरं ढगांच्या आवाजाने घाबरून जायचो पण पाऊस पडणार याचा आनंद सुद्धा असायचा त्यामुळे आम्ही आधीच होड्या तयार करून ठेवायचो.


पावसाळ्यात शाळेत जायची मजाच वेगळी असते कितीही पाऊस असला तरी शाळेत जायचं आणि दुसरं कारण म्हणजे पावसात भिजायला मिळतो दरवर्षीप्रमाणे जोराचा पाऊस पडल्यावर लाईट जायची आणि पुढील दोन दिवस येईल याची शक्यता नसायची मग आम्ही बत्तीच्या उजेडात गृहपाठ करायचो. पावसाळा आला की अशा कितीतरी सुट्ट्या घेऊन यायचं पण आम्ही घरात थांबलो नाही. पाऊस आला की ओढा तुंबणार आणि आम्ही त्यात खेळणार ओढ्यात कागदाच्या होड्या करून सोडायच्या आणि कोणाची होडी एक नंबर काढते हे पाहायचं. आणि जर का पाऊस जास्त असला की मग घरात बसून खिडकीतून पाऊस पावसाची मजा घ्यायची. धडाड धूम वाजणारे ढग धडकी भरवायचे तर कधी कडकंड वीज चमकू लागायचा. कधी सरळ उभा पडणारा पाऊस तर कधी आडवातिडवा पडणारा पाऊस कधी धो-धो कोसळणारा पाऊस तर कधी तिरका चालणारा पाऊस. मी खिडकीच्या गंजावर लटकणार्‍या टपोर्या थेंबांना फिरून खाली पाडत असे खिडकीवरील गंजाना माकडासारखा लटकून कोसळणारा पाऊस बघण्यातसुद्धा वेगळीच मजा यायची 

ही लहानपणीच्या पावसाळ्याची आठवण मात्र शाळा संपली शिंगे फुटली कॉलेजला जायची वेळ आणि पावसात भिजून कॉलेजला जायची मजा आणि शाळेत असताना भिजायची मजा हे एकदम विरुद्ध,

     

 मित्र मित्र चालताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे मुलींना इम्प्रेस करण्यासाठी वेगळे शक्कल लढवायची. छत्री गोल गोल फिरवून शेजारच्या मुलीवर पाणी उडवायच. कधी चालताना एका छत्रीत चालायला भेटले तरी चालेल पण प्रेमाने छत्री शेअर करायचो. जसजसा मोठा होत गेलो आठवणी अजून आठवत राहतात कारण गेलेले बालपण परत येत नाही तो लहानपणीचा पावसाळा आता मोठा झाल्यावर अनुभवता येत नाही ना ओढ्यांना वाढलेल्या पाण्याचा कुतुहल राहिलय ना सुट्टी घेऊन घरी बसायचं अवधी आहे आता तो ओढाही इतक्या पावसाळ्यानंतर बदलला आहे तो वाहतोय छोट्या पाइपमधून.

        

लिहिण्याचं कारण असं की आजच्या मोबाईलग्रस्त लहान मुलांना पावसाबद्दल कुतूहल राहिलंच नाही, पावसाळी खेळ सुदधा आता त्यांना ठाऊक नाहीत. मोबाईल म्हणजे मुलांना घरी बसवण्याचं एक माध्यम झालंय. असो पण लहानपणीचा पावसाळा हा नुसता विचार मनात आला आणि मन खूप सुखावून गेलं.

कळते मोठं झाल्यावर, खूप बदललोय आपण... या लेखाच्या निमित्ताने माझ्या लहानपणीचा पावसाळा मला पुन्हा मनोमन अनुभवता आला.


Rate this content
Log in