लेख
लेख
झोका म्हणलं की श्रावण आठवतो अन् श्रावण म्हणलं की पंचमी
श्रावणाची हिरवळ अन् माहिरवाशीण पोरींची हिरवळ याचा मिलाफ होऊन उंच- उंच झोके घेणा-या बायका ख-या अर्थानं निसर्गाच्या सौंदर्याचं स्वागत-गीत गातात की काय असा भास होतो.
असो झोका हा प्रगतीच्या अर्थानं घेतलेला शब्द तंतोतंत स्त्रियांच्या बाबतीत लागू पडलाय असं तरी मला वाटतं.
महात्मा फुलेंनी मुलींसाठी काढलेली पहिली शाळा खरं तर, त्यांच्या पत्नी श्रीमती सावित्रीबाई फुले यांनी चालवली. त्या काळातला समाजमान्य नसलेला पहिला झोका त
्या दांपत्यांनी घेतला आणि मुली ख-या अर्थानं शिक्षणाच्या झाडाला बांधलेल्या प्रगतीच्या झोक्यावर यशस्वी होऊ लागल्या हे सांगावसं वाटतय.
त्या काळापासून आज पर्यंत बदलत आलेली समाज व्यवस्था स्त्रियांविषय आज ही एक अदृश्य अढी पाळून आहे असं दिसत आहे. तरीही सगळ्याच अडचणींना तोंड देऊन यशो-शिखर गाठणा-या सर्वच महिलांना त्रिवार वंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
उंच तुझा झोका
अटकेपार जाऊ दे.
माते तुझे गोडवे
जगाला गाऊ दे...
७८४३०१४९२३