STORYMIRROR

Sudip Guthe

Others

2  

Sudip Guthe

Others

लाल परी

लाल परी

2 mins
458

प्रिय लाल परी,


तुझ्याबद्दल काय बोलावं,कस बोलावं अन् कितीपण बोलावं तेवढं कमीच आहे.प्रत्येक गावाला जोडणारी लाल परी हे तुझ पहिलं रूप,व्होल्व्हो पेक्षा कमी किंमतीत प्रवाशाला आरामशीर घरी पोचवणारी तू "निमआराम", अवघड वळणाचा प्रवास करणारी नावाप्रमाणेच तू "शिवशाही - शिवनेरी", मोठ्यातला मोठा घाट सर करणारी "हिरकणी",अन् क्षणा क्षणाला आठवण करून देणारी तूच "विठाई" अशी अनंत रूपे घेऊन तू सर्वांच्या मनावर राज्य करते.तुझ्यातला एक चांगला गुण म्हणजे तू कधी कोणावर अन्याय केला नाही,मुंबई पुण्याच्या समृध्द रस्त्यांनी प्रवास करतानाच ज्या ठिकाणी कोणीच पोहचू शकत नाही अशा आडमार्गाच्या, घाटाच्या रस्त्याने अनंत वाटसरूंना तू इच्छित ठिकाणी पोहोचवतेस.गजबजलेल्या शहरापासून ते शासन - प्रशासन,मोबाईलचं नेटवर्क जिथे पोचत नाही तिथे पण तू पोचतेस.तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना सोबत घेऊन तर तू बऱ्याच वेळा प्रवास करतेच पण एका व्यक्तीसाठीपण काळजी घेऊन त्यासाठी प्रवास करणारी तू एकमेवच.आज तू ७३ वर्षांची आहे ,ह्या वर्षांमध्ये कित्येक वाटसरुंच्या मदतीला तू धावली कित्येक कामगार,नोकरी चाकरी करणारे लोक,विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या घडवून तू सेवा केलीस.दसरा,दिवाळी,गणपती अशा कित्येक सणांमध्ये खाजगी गाड्या खोऱ्याने पैसे ओढत असताना, तू आहे त्यातच समाधान मानलं हे तुझ खूप मोठेपण.तुझ्या प्रवासात जगातल्या सगळ्यात इमानदार व्यक्तींबरोबर तुला वेळ घालवता आला हे तुझ भाग्यच..हो तुझ्याकडे असलेली चालक वाहकाची जोडी म्हणजे राम लक्ष्मनाची जोडीच की..कोणाचा आपल्याकडे एक रुपया पण जास्त येऊ नये म्हणून गाडी थांबल्यावर सुट्टे करून देणारा वाहक आणि एखाद्या आडमार्गाला अडकून पडल्यास तुला घेऊन येणारा चालक म्हणजे देवच.परी तु ७३ वर्षांची तरुणी आहेस आजवर तू अनेक भार सहन केलेस,कित्येक आनंदाचे क्षण पाहिलेस. कोणावरही अन्याय न करणारी तू, पण तुझ्या अन् तुझ्या सोबत्यांवर होणारा अन्याय आज बघवत नाही.शासनाच्या इतर विभागांमध्ये लाखांमध्ये खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा निरपेक्ष, हजारो प्रवाशांचे जीव सांभाळून सगळ्यांपेक्षा कैक पटीने चांगले काम करणारे तुझे चालक वाहक व सोबती काही हजारांवर काम करत आहेत. इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच तुझ्या सोबत्यांना शासनाने वागणूक द्यावी हीच इच्छा.. तुझ्या भविष्यासाठी आभाळभर शुभेच्छा.. अन् इथून पुढे लोकांसोबत शासनाने पण तुझेच गीत गावे हीच आकांक्षा…

       "वाट पाहीन पण एस. टी.नेच जाईन"


Rate this content
Log in

More marathi story from Sudip Guthe