कथेचे शीर्षक-मला ही जगायचंय..
कथेचे शीर्षक-मला ही जगायचंय..
आता जीव गुदमरतोय माझा. श्वास कोंडत आहेत. किती राहायचं उभं मी खंबीर आणि किती जणांसाठी,
अगं आता बस! तुझ्या या अंधश्रद्धेपोटी माझा गळा आवळून जीव घेऊ करतेस तू माझा. "कशी सांगावी मी माझी आत्मकथा"आता नाही सहन होत हे...एखाद्या चोराला गुंडाळून बांधून ठेवावं तसं मला बांधत आहात तुम्ही
आणि वर नाव रीतीरिवाजाचं.... संस्कार संस्कार म्हणजे असतात तरी काय हो? निसर्गाला जसं गृहीतच धरत आहात तुम्ही लोक कधी पिंपळाला दिवे लावायचे कधी वडाला दोरे गुंडाळण्याचे...?
पण, आता नाही.. भगिनींनो हात जोडून नम्र विनंती करत आहे. मी तुमच्या पुढे आता मला जगू द्या. मोकळा श्वास घेऊ द्या.आयुष्य तुमचंही आणि आयुष्य माझंही ज्याप्रमाणे देवाने माणसाला जन्म दिला तेव्हा, देव हा दगडात नाही तर माणसात वसतो. आणि आपण जिवंत माणसाला क्षणाक्षणाला दुखावुन दगडापुढे नतमस्तक होतो. ज्या वृक्षांना जीवनदान देऊन माणसाला श्वास मिळणार आहेत. त्याच वृक्षांना उंच इमारती बांधण्यासाठी सरळ सरळ त्यांचा खून केला जातोय.. हीच का तुमची माणुसकी?
वर्षातला एक दिवस, "वटपोर्णिमा" आणि या दिवशी तुम्ही पिढीनुसार चालत आलेला मूर्खपणा करतात. निव्वळ अंधश्रद्धा. अरे मला दोरा गुंडाळून तुम्ही माझा जीव घेत आहात. हे तुमच्या लक्षात येत नाही का? आणि कितीतरी महिला केवळ आपल्या आधीच्या पिढीने सांगितले म्हणून वटपौर्णिमा साजरी करतात. त्यामागे ना कुठल्या भावना असतात ना कुठले संस्कार.. संस्कार जपायचे असतील.तर थोरामोठ्यांचा आदर करा आणि वृक्षारोपण करा निसर्ग वाचवा. वटपौर्णिमा साजरी करूनच पतीचे प्राण वाचले असते तर कोरोना काळात इतके संसार उध्वस्त झाले नसते.
"मी एक वटवृक्ष सांगतोय खंबीरपणे माझ्या भगिनींनो अरे! माझ्या भोवती दोरा गुंडाळून तुमच्या पतीचे प्राण नाही वाचणार. तर रोज या वटवृक्षाला पाणी घालून तुम्ही माझे आणि तुमचेही प्राण अधिक सुरक्षित कराल म्हणून सांगतो.. अंधश्रद्धेची नाही तर विज्ञानाची साथ द्या....... "मलाही जगायचय मला जगू द्या. आणि तुम्हीही जगा.....
