Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Milya Gavanang

Others


4.4  

Milya Gavanang

Others


कष्टाचे आश्रम

कष्टाचे आश्रम

2 mins 627 2 mins 627

एका दशकापूर्वी, रामनगरी गावाच्या वेशीवर एक गरीब कुटुंब राहत होतं. पंजोबा, आजोबा ते बाप जन्मापासून दारिद्र्य रेषेखाली जगत आलेल्या त्या कुटुंबाला आजचा दिवस सुखाचा कसा जाईल, ह्याच त्यांना नेहमी चिंताग्रस्त प्रश्न पडलेला असायचा.

कुटुंबात तीन मुलीच असल्यामुळे शेतकरी माय-बापाला आपल्या मुलींचे कसे होणार माझी लेकरं कोणाच्या तोंडाकडे बघणार असे सारे चिंताजनक प्रश्न हृदयी माय-बापाला अश्रू येईपर्यंत गस्त घालत असायचे. दिवसेंदिवस ते शेतकरी कुटुंब आपले उदारनिर्वाह करत करत दिवस काढत होते. गावातील काही घरे एका बाजूला तर,काही दुसऱ्या बाजूला होती. गावात सरपंच, गावकर, पाटील....असे मोठ्या रुबाबाची माणसे असून देखील काही कामाची नव्हती, उलट आपलेच खिस्से रोजच्या रोज भरतील याकडे त्यांचा कळ असायचा. एक दिवस ते कुटुंब एकत्र बसून स्थलांतराचा विचार करत बसले होते. पण, दुसऱ्या गावात आपल्याला जागा मिळेल की नाही ह्याची शास्वती कोणालाही नव्हती. त्या तीन मुलींचे विचार पुढील भविष्याचे तर माय-बापाचे जुन्याकालीन पध्दतीचे होते. मुली थोड्याफार शिकलेल्या होत्या. त्यामुळे, त्यांच्या डोक्यात ह्याच गावात राहून स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करायच,ह्या मतावर त्या ठाम होत्या. त्यांचं स्वप्न आपल्या आई-वडिलांचे अर्ध जिवन सुखाचे जावो हे त्यांना वाटत होते. आणि, ठरल्याप्रमाणे तिघी बहिणी तालुक्यात जाऊन स्वखर्चाने जेवढे जमेल तेवढे अनाथांसाठी सामान घेऊन यायच्या.

आईबाप रोज त्यांना विचारायचे परंतु, त्या तिघी अनाडी आईबापाला काहीच सांगत नव्हत्या. आणि, बघता बघता काही महिन्यांत त्यांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून सगळ काही आणून ठेवले. आणि, पुन्हा एकदा ते कुटुंब दुपारच्या वेळेस बसले. आईवडिलांनी त्यांना प्रश्न विचारले. पोरींनो, गेल्या काही महिन्यांत आम्ही काही तुम्हांला विचारत होतो, त्यांची उत्तर का बरं देत नव्हता. आपण गरीब आहोत, आपले कर्ज,धान्य....वगरे सावकराकडे गहाण जात, तरी सुद्धा तुम्ही तिघी आम्हाला ह्याची चटक न लागता अश्या छोट्या-मोठ्या वस्तू आणत होतात. अन, का? हे सगळं आणि कशासाठी?....मोठी मुलगी मोठ्या मनाने बोलली, आईबाबा आम्ही एक अनाथ आश्रम काढायचं ठरवलं आहे. भलेही आपण गरीब का ना असो, पण आम्हा तिघींना तुमची साथ हवी. अगदी कायमची. आपण सगळेजण मेहनत घेऊन छोटं का होईना पण अनाथ आश्रम बांधायचं. जेणेकरून, आमच्यासारखी मुलंबाळं व जे घरातल्यांपासून वंचीत आहेत, त्यांना आपण इथे आश्रय द्यायचा. आईबाबा आपण काहीतरी चांगली गोष्ट करायला जातोय ह्याची कल्पना सर्वाना यावी हेच आमचे ध्येय आहे. इथे जे येथील ते स्वतःकरिता आणि आपली अशी गरिबी एका क्षणार्धात संपून जाईल, तुम्ही विश्वास ठेवा. बस. ही गोड कल्पना त्यांना खूप आवडली. आणि स्वतः कष्ट करून गावाच्या हद्दीत आश्रम उभारले. लोक त्या शेतकरी कुटुंबाला मानू लागले. आणि त्या कुटुंबाचा आंनद गगनात मावेनासा झाला. गावातील मोठी लोक त्या आश्रमाला भेट वस्तू देत राहिले. अश्या संस्कारी मुलींनी जीवन म्हणजे काय ते अगदी विचारपूर्वक साधले. आणि काही दिवसात कर्जाचा डोंगर आपोआप उतरला.


*(तात्पर्य -माणूस कधीच गरीब नसतो किंवा कधीच श्रीमंत नसतो, गरीब असतात ते त्यांचे विचार.)*Rate this content
Log in